KDMC News: कल्याण डोंबिवलीत मनसेला सत्तेची लॉटरी! शिवसेनेकडून बक्षीस; 3 समित्यांमध्ये स्थान

भाजपाचे वरुण पाटील यांची सभागृहनेतापदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर स्थायी, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan Dombivli News:  केडीएमसीच्या महासभेत स्थायी, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये शिवसेना शिव  आघाडीच्या घटक पक्ष म्हणून मनसेला सर्व समित्यांमध्ये प्रतिनिधीत्व दिले आहे. मनसेने शिंदे सेनेला  पाठिंबा दिल्याने त्यांना ही बक्षिशी मिळाली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचा प्रत्येकी एक या तिन्ही समित्यावर नियुक्त झाला आहे. कल्याण डाेंबिवलीच्या विकास प्रकल्पाकरीता चार हजार ८०० कोटी रुपयांचा निधी एमएमआरडीएकडून मंजूर करुन आणणारे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठरव मंजूर करण्यात आला आहे. 

कल्याण- डोंबिवली स्थायी समितीत मनसेला स्थान 

कल्याण डोंबिवली महापालिकेची पहिली महासभा सुरु आहे. या सभेत सुरु होण्यापूर्वी काही मिनिटापूर्वी मुख्यालयात पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. यावरुन नगरसेवकांनी प्रशासनाला चांगले धारेवर धरले. आम्ही चोर दरोडेखोर आहोत का? असा सवाल प्रशासनाला विचारला. पोलिसांकडून झडती असेल तर महापालिका सुरक्षा रक्षकांना कशासाठी कामावर ठेवले आहे असा जाब विचारला. यावरुन यापूढे योग्य ती काळजी घेतली जाईल असे प्रशासन स्पष्ट केले. भाजपाचे वरुण पाटील यांची सभागृहनेतापदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर स्थायी, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

Advertisement

VIDEO: किंकाळ्या, धडपड अन् वेदना; भटक्या कुत्र्यांनी 15 मिनिट लचके तोडले, महिलेचा तडफडून जागीच मृत्यू

स्थायी समितीमध्ये १६ सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये शिवसेना शिव आघाडी गटाकडून गजानन पाटील, महेश गायकवाड, जयंवत भोईर, विकास म्हात्रे, मल्लेश शेल्टी, नवीन गवळी, विजया पोटे आणि मनसेचे गणेश लांडगे, भाजपचे दीपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनिषा गायकवाड, मुकुंद पेंडणेकर, नंदू म्हात्रे, उपेक्षा भोईर, शिवसेना ठाकरे गटाचे विशाल गारवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

महिला बाल कल्याण समितीमध्ये ११ सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये शिवसेना शिव आघाडीचे  रेखा म्हात्रे, ज्योती मराठे, अस्मिता मोरे, सारिका जाधव, मनसेकडून रसिका पाटील,  भाजपकडून मेघाली खेमा, पूजा गायकवाड, सराेज राय, सुनिता पाटील, रविना माळी, शिवसेना ठाकरे गटाच्या तेजश्री गायकवाड यांचा समावेश आहे. शिक्षण समिती सदस्य पदी ११ सदस्यांची निवड करण्यात आहे. शिवसेना शिव आघाडीचे प्रतिक पेणकर, अनघा देवळेकर, शालीनी वायले, दीपाली पाटील, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, भाजपकडून अभिजीत थरवळ, जतीन प्रजापती, कविता म्हात्रे, श्यामल गायकर, रसिका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे अर्पण भाेईर यांचा समावेश आहे.

(नक्की वाचा-  Shocking News: हृदयद्रावक! मेकॅनिकचा एक सल्ला अन् अख्ख कुटुंब उद्ध्वस्त; 3 नातवांसह आजोबांचा झोपेतच मृत्यू)