Kalyan Dombivli Water Cut: कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. तुम्हीही पाण्याचा अपव्यय करत असाल तर आधी ही बातमी वाचा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत तसेच यांत्रिक उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
PCMC News: अखेर 'स्मार्ट सिटी'ला गाशा गुंडाळण्याचे आदेश! राज्य सरकारचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरूस्ती करावयाची आहेत. सदर देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकरिता येत्या मंगळवार २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत (१२ तास) पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
कोणकोणत्या भागात होणार परिणाम?
महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण (पूर्व व पश्चिम), कल्याण ग्रामीण विभाग (मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) व डोंबिवली (पूर्व व पश्चिम) परिसरास होणार पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केली आहे. तरी, सदर परिसरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून व पुरेसा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती ही करण्यात आली आहे.
दरम्यान, महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा व पाण्याचा जपून वापर करावा. तसेच दुरुस्तीच्या कामात सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी या संदर्भात अधिकृत प्रेस नोटद्वारे माहिती दिली आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पाणी भरून ठेवण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे.