Navratrotsav 2025 Traffic Changes In Kalyan: नवरात्रोत्सव अवघ्या दिवसांवर आला आहे. मुंबई, पुण्यामध्ये नवरात्रोत्सवाची जोरदार आणि जय्यत तयारी करण्यात येत आहे. कल्याणमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यानिमित्त नवरात्रौत्सव व दसरा माण दुर्गामाता मंदिर, दुर्गाडी किल्ल्यावर मोठा उत्सव असतो. या उत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेत कल्याणमध्ये वाहतूकीत मोठे आणि महत्त्वाचे बदल करण्यात आले करण्यात आले आहेत. जाणून घ्या हे महत्त्वाचे बदल आणि पर्यायी मार्ग
कल्याण शहरात दि. २२/०९/२०२५ ते दि. ०२/१०/२०२५ या कालावधीन नवरात्रौत्सव व दसरा माण दुर्गामाता मंदिर, दुर्गाडी किल्ला, कल्याण पश्चिम येथे साजरे होणार आहेत. सदर कालावधीत जनसमुदाय रस्त्यावर येवून सण साजरा करीत असतात. सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहणे आम जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे.
त्याअर्थी, पंकज शिरसाट, पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर माणून मला महाराष्ट्र शासन गृह विभाग क. एम.व्ही.ए.-११६/सीआर/३७/टीआर, दि. २७/०९/१९९६ चे अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (अ) (ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुढीलप्रमाणे अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Traffic Diversion In Kalyan)
हे आहेत बंद असलेले आणि पर्यायी मार्ग (These Road Are Closed Road And Alternative Routes)
1. प्रवेश बंद: नवी मुंबई, पनवेल, महापे पाईपलाईन, मुद्रा मार्गे कल्याण नाका येथून कल्याण दिशेने पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात प्रवेश करून नाशिक मुंबई हायवे, भिवंडी कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या ६ चाकी, जड, अवजड, मल्टिएक्सल वाहनांना मुंब्रा वाहतूक उप विभाग हद्दीतील कल्याण नाका येथे प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग: सदर वाहने मुद्रा बायपास मार्गे खारेगाव टोलनाका, नाशिक मुंबई महामागनि इच्छीत स्थळी जातील.
2. प्रवेश बंद: तळोजा बायपास मार्गे खोणी निसर्ग ढाबा कडून कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या ६ चाकी, जड, अवजड, मल्टिएक्सल वाहनाना कोळसेवाडी वाहतूक उप विभाग हद्दीतील खोणी निसर्ग ढाबा येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग: सदर वाहने बदलापूर अंबरनाथ व काटई बदलापूर चौक लोढ़ा पलावा कल्याण फाटा मार्गे इच्छीत स्थळी जातील.
3. प्रवेश बंद: नेवाळी नाका (विठ्ठलवाडी वाहतूक उप विभाग) कडून मलग रोडने चक्कीनाका कल्याण शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या ६ नाकी, जड, अवजड, मल्टिएक्सल वाहनांना नेवाळी पत्रीपूल मार्गे नाका येथे प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग: सदर वाहने बदत्यपुर अंबरनाथ हायवे मार्गे इच्छित स्थळी जातील.
4.प्रवेश बंद - श्रीराम चौक (विठ्ठलवाडी वाहतूक उप विभाग) कडून कोळसेवाडी वाहतूक उप विभाग हद्दीत जाणाऱ्या सर्व प्रकारच्या ६ नाकी, जड, अवजड, मल्टिएक्सल वाहनाना श्रीराम चौक येथे प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग: सदर वाहने श्रीराम चौक कडून उल्हासनगर, शहाड, अंबरनाथ मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद: शहाड प्रेम ऑटो दुर्गामाता चौक कोनगाव, भिवंडी कडे जाणान्या सर्व प्रकारच्या ६ चाकी, खाजगी बसेस, जड-अवजड, मल्टिएक्सल वाहनांना आधारवाडी चौक (कल्याण वाहतूक उप विभाग) येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
5. पर्यायी मार्ग: सदर वाहने आधारवाडी चौक येवून उजवीकडे वळून गंधारी ब्रिज बापगाव सोनाळे मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद: रांजनोली नाका (कोनगाव वाहतूक उप विभाग) कडून कोनगाव मार्गे कल्याण दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या ६ चाकी खाजगी से मल्टिएक्सल वाहनाना रांजनौली नाका येथे प्रवेश बंद'
(नक्की वाचा: पोलिसांना अखेर जाग झाली; कोपरी, घोडबंदर रोडसह ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय)