Siya Goyal: पोलीस कोठडीतही माज! सियाचे अश्लील हावभाव; कॅमेऱ्यासमोर केलं असं कृत्य; संतापजनक VIDEO

पोलिसांच्या गराड्यात असतानाही सियाने माध्यमांना पाहताच कॅमेऱ्यासमोरच मिडल फिंगर दाखवले. हा व्हिडिओ माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Ketan Agrawal Murder Case: पुण्यातील सिया अग्रवाल हत्या प्रकरणाने सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक करण्यात आली आहे. केतनची हत्या करण्यासाठी सिया आणि चेतनने क्रुरतेचा कळस गाठल्याचे नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. अशातच आता पोलीस कोठडीत असतानाही सियाचा माज काही उतरत नसल्याचे दिसत असून तिचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. माध्यम प्रतिनिधींना पाहून सियाने अश्लील हावभाव केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 

Mumbai Rain LIVE: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग! वाहतुकीवर मोठा परिणाम; वाचा LIVE अपडेट

जेलमध्ये जाऊनही माज उतरेना, सियाचा धक्कादायक VIDEO 

केतन अग्रवाल हत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरीचा सध्या हत्येसंबंधी विविध मार्गाने तपास सुरु आहे. सिया आणि चेतनला घटनेशी संबंधित विविध ठिकाणी घेऊन जात सखोल चौकशी करत आहेत. गुरुवारी सियाला तिच्या घरी चौकशीसाठी नेण्यात आले होते. यावेळी घरातून बाहेर पडताना सियाने अत्यंत संतापजनक कृत्य केले. पोलिसांच्या गराड्यात असतानाही सियाने माध्यमांना पाहताच कॅमेऱ्यासमोरच मिडल फिंगर दाखवले. हा व्हिडिओ माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Advertisement

दरम्यान, केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज दुपारी २.३० वाजता वडगाव न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींच्या अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. तपासातील उर्वरित पुरावे आणि चौकशी पूर्ण करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची विनंती न्यायालयात केली जाणार आहे. दुसरीकडे, दोन्ही आरोपींच्या वकिलांकडून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. सुनावणीत न्यायालय अतिरिक्त पोलीस कोठडी मंजूर करते की न्यायालयीन कोठडी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune School: विद्यार्थी, पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचं! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; पाहा नवे वेळापत्रक