Kolhapur Election: एकटे लढले, बलाढ्य महायुतीशी भिडले, एका वॉर्डाने कोल्हापुरचा निकाल फिरवला

मतदानानंतर महानगरपालिकेमध्ये आमचीच सत्ता येणार असं ठासून सांगणाऱ्या नेत्यांनाही एका वॉर्डच्या प्रलंबित निकालाने जीवाला हुरहुर लावून ठेवलेली होती. 

जाहिरात
Read Time: 3 mins

विशाल पाटील, कोल्हापूर:

 Kolhapur Election Result:  कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालामध्ये महायुतीने बहुमत मिळवत मोठा विजय मिळवला. मात्र महायुतीला काँग्रेस पक्षाने कडवी झुंज दिली. निकालाच्या अंतिम क्षणी महायुतीच्या नेत्यांचा हृदयाचा ठोका चुकवणारा क्षण राहिला. याचं कारण म्हणजे काँग्रेसने मिळवलेला विजय. निकालाच्या अंतिम आकडेवारीत एक वॉर्ड महायुतीसाठी निर्णायक ठरला. 

PMC Election Result: आंदेकर गँगचा मोठा विजय! सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर विजयी; धंगेकरांना धक्का

  कोल्हापुरात महायुतीची सत्ता, काँग्रेसची कडवी झुंज

 सकाळी दहा वाजता कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी  प्रक्रिया सुरू झाली. अंतिम निकाल हाती येण्यासाठी चार वाजले. या निकालामध्ये महायुतीने 45 जागा मिळवत बहुमत घेतले. भाजप 26, शिवसेना शिंदे 15, राष्ट्रवादी अजित पवार 4 अशा जागा महायुतीला मिळाल्या तर काँग्रेसला 34, शिवसेना 1 अशा जागा महाविकासआघाडीला मिळाल्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जागांवर फेरमतमोजणी झाल्यानंतर निकाल अंतिम झाला. अंतिम निकाल होईपर्यंत अनेक घडामोडी पहायला मिळाल्या. यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे महायुतीतील भाजप नेत्यांना हा निकाल हाती येईपर्यंत सत्ता येईल की नाही यावर विश्वास नव्हता. मतदानानंतर महानगरपालिकेमध्ये आमचीच सत्ता येणार असं ठासून सांगणाऱ्या नेत्यांनाही एका वॉर्डच्या प्रलंबित निकालाने जीवाला हुरहुर लावून ठेवलेली होती. 

महानगरपालिकेत आता महायुतीचीच सत्ता येणार या आनंदात दुपारी तीन वाजता भाजप नेत्यांनी जल्लोषाची तयारी केली. नेत्यांचा निरोप आल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालय गाठलं. खासदार धनंजय महाडिक विमानतळावरून थेट भाजप कार्यालय गाठलं. ढोल ताशाच्या गजरात आनंद उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. काही कार्यकर्ते गुलाल उधळत होते तर काही कार्यकर्ते फटाक्यांची आतिषबाजी करण्यामध्ये व्यस्त होते. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि इतर पदाधिकारी यांना मोठा हार देखील घालण्यात आलेला.

TMC Election 2026: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कुणी मारली बाजी? वाचा विजयी उमेदवारांची यादी

पण ऐन उत्साहात अचानक ढोल ताशाचा गजर थांबला. नेते, कार्यकर्तेही शांत झाले. याचं कारण होतं एका वॉर्डचा निकाल.. प्रभाग क्रमांक 18 चा निकाल अद्याप हाती आलेला. आणि याच वॉर्डात आमदार सतेज पाटील यांच्या जवळचे नेते भूपाल शेट्ये आणि इतर उमेदवार होते. त्यामुळे या वॉर्डात चारही जागा जर काँग्रेसला मिळाल्या असत्या तर महापालिकेतलं महायुतीचं बहुमत बदललं असतं. जल्लोष करणाऱ्या नेत्यांना हाच एक प्रभाग आपला विजय बदलू शकतो अशी माहिती मिळाली. यामुळे ऐन जल्लोषात सत्तेसाठीच्या फिगरची चर्चा सुरु झाली.

जल्लोष थांबला; नेते, कार्यकर्तेही शांत झाले

काँग्रेसने 34 जागा मिळवलेल्या होत्या.. जर एका प्रभागात काँग्रेसच्या चारही जागा विजयी झाल्या असत्या तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट मिळून 39 जागा असत्या. आणि जनसुराज्यचा पाठिंबा घेऊन 40 जागा घेऊन आघाडी होऊ शकते अशा चर्चा या जल्लोषादरम्यान होत्या.. पण प्रभाग क्रमांक 18 चा निकाल आला आणि काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली. महायुतीच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला.. महायुती 42 + फिगर मिळवण्यात यशस्वी ठरली यावर शिक्कामोर्तब झाला.. त्यानंतर सुरु करा रे असा आवाज आला आणि पुन्हा ढोल ताशा अन मिठाई वाटपाची लगबग सुरु झाली. 

Advertisement

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हा महायुतीच्या कार्यकर्त्यांना आनंद देणारा ठरला. पण त्याचबरोबर आहे ना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही हा निकाल एक आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला. महायुतीच्या मंत्री आणि आमदार नेत्यांसमोर  30 हुन अधिक जागा मिळवल्याने महापालिकेत एक नंबरचा पक्ष काँग्रेस राहिला आहे. त्यामुळेच आज सत्ता नसली तरी जागांमध्ये आम्हीच धुरंधर आहोत अशा भावना कार्यकर्त्यांच्या आहेत.

Topics mentioned in this article