विशाल पुजारी, कोल्हापूर: कोल्हापूरला देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार असल्याने भाविकांसाठी दर्शन बंद राहणार आहे. दोन दिवसाच्या कालावधीत भाविकांना देवीच्या उत्सवमूर्ती व श्रीकलशाचे दर्शन घेता येईल, असं मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार असल्याने उद्या सोमवार आणि मंगळवारी देवीचे दर्शन बंद राहणार आहे.. या कालावधीमध्ये भाविकांना देवीच्या उत्सवमूर्ती व श्रीकलशाचे दर्शन घेता येईल. भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला कळवले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व विभाग यांच्यावतीने श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी व आवश्यक नियमित संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितलं आहे.
करवीन निवासिनी अंबाबाई हे कोल्हापूर शहराचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैभव आहे. गेल्या अनेक शतकांपासून या देवीची मूळ मुर्ती ही भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मुर्तीला सुस्थितीत ठेवण्यासाठी आता संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. यादिवशी गाभाऱ्यामध्ये फक्त तज्ज्ञांनाच प्रवेश दिला जाईल. श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी राहील. काळात शांतता व सुव्यवस्थेचे सहकार्य करावे, असे आवाहनही मंदिर प्रशासनाने केली आहे.
Shirdi Sai Baba: शिर्डीतील ‘साईंच्या नऊ नाण्यां'वरून नवा वाद पेटला, चक्क साईबाबांच्या डीएनएची मागणी