Kolhapur News: अंत्यविधीची तयारी अन् तात्या पुन्हा जिवंत, सिनेमालाही लाजवेल अशी स्टोरी; कोल्हापूरमध्ये अजब घडलं

 हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेला व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत झाल्याची घटना कोल्हापूरच्या कसबा बावडामध्ये घडली. काय आहे हे प्रकरण? वाचा

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर: देव तारी त्याला कोण मारी ही म्हण अनेकदा ऐकली असेल. मात्र या म्हणीचा प्रत्यय क्वचितच कोणाला येतो. परंतु कोल्हापूरमध्ये ही म्हण तंतोतत खरी ठरेल असा चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेला व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत झाल्याची घटना कोल्हापूरच्या कसबा बावडामध्ये घडली. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत होते. हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर उलपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले. अंत्यविधीची तयारीही सुरु झाली. दुसरीकडे त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणला जात होता. याचवेळी रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला अन् पांडुरंग तात्यांच्या शरिराची हालचाल सुरु झाली. 

नक्की वाचा - Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार, शोध सुरू

त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले, उपचार झाले आणि पांडुरंग तात्या स्वतःच्या पायांनी घरी पोहोचले. ज्या व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणला जात होता, तीच व्यक्ती स्वतःच्या पायाने चालत घरी पोहोचले. या चमत्काराची सध्या संपूर्ण पंचक्रोशित होत आहे. दुसरीकडे ही सर्व पांडुरंगाची कृपा असल्याचं त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. 

Advertisement