Sai Jadhav IMA Training: कोल्हापूरच्या लेकीने इतिहास घडवला! लष्करी संस्थेचा 93 वर्षांचा विक्रम मोडला

सईने मेरिट लिस्टमध्ये अव्वल स्थान मिळवून हे पद मिळवले.  सई सध्या  एमबीए करत आहे. तिने डिसेंबर २०२३ मध्ये टेरिटोरियल आर्मीची परीक्षा दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Sai Jadhav IMA Training:  भारतीय लष्कराच्या इतिहासात शनिवारी एका सुवर्णकाळाची नोंद झाली. तब्बल ९३ वर्षांची पुरुषी मक्तेदारी मोडीत काढत डेहराडून येथील भारतीय सैन्य अकादमीतून एका महिला अधिकाऱ्याने आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. हा बहुमान महाराष्ट्राच्या मातीतील कन्या सई जाधव यांना मिळाला असून, त्या 'प्रादेशिक सेना' विभागातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

सई जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून त्यांचे बालपण बेळगावमध्ये गेले. १९३२ मध्ये स्थापन झालेल्या आयएमएने आजवर केवळ पुरुष अधिकाऱ्यांनाच घडवले होते. मात्र, सई यांच्या जिद्दीने ही परंपरा आता बदलली आहे. त्यांनी १५७ व्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी होऊन लेफ्टनंट म्हणून पदभार स्वीकारला.

Shirdi Sai Baba: साईचरणी भक्तानं वाहिला सोन्याचा मुकूट; वजन आणि किंमत किती? वाचा सविस्तर

कोल्हापूरच्या कन्येची यशस्वी झेप!

सई जाधव यांना उत्तराखंडमधील पिथोरागड येथील कुमाऊं रेजिमेंटच्या १३० व्या प्रादेशिक सैन्य (पर्यावरणीय) बटालियनमध्ये कमिशन मिळाले आहे. टेरिटोरियल आर्मीमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी फक्त एकच जागा होती आणि सईने मेरिट लिस्टमध्ये अव्वल स्थान मिळवून हे पद मिळवले.  सई सध्या  एमबीए करत आहे. तिने डिसेंबर २०२३ मध्ये टेरिटोरियल आर्मीची परीक्षा दिली.

एमबीएच्या अभ्यासासोबतच तिने स्पर्धा परीक्षा आणि सैन्याची तयारीही केली. तिच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे तिला या पदापर्यंत पोहोचता आले. सईचे वडील मेजर संदीप जाधव यांनी स्पष्ट केले की, कुटुंबाच्या लष्करी पार्श्वभूमीने त्यांच्या मुलीला सैन्यात सामील होण्यास प्रेरित केले. ते म्हणाले, "पालक म्हणून, आम्हाला अभिमान आहे की आमच्या मुलीने तिचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे."

Advertisement

IB Career Opportunities: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी कशी मिळते? किती असतो पगार? जाणून घ्या

मुख्यमंत्री फडणवीसांनी केले कौतुक...

दरम्यान, त्यांच्या या यशाचे कौतुक करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मराठी मुलगी' असा उल्लेख करत सई यांचा गौरव केला आहे. ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोल्हापूरच्या या कन्येचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.