राकेश गुडेकर, प्रतिनिधी
कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल 26 तासांनतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरु झाली आहे. मांडवी एक्स्प्रेस मुंबईकडं रवाना झालीय. गेल्या काही दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकणातील मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे हाल सुरु आहेत.रविवारी 14 जुलै रोजी खेड-दिवाण खवटी दरम्यान रेल्वे रूळावर दरड कोसळली. यानंतर कोकण रेल्वे ठप्प झाली होती. अखेर 26 तासांच्या परिश्रमानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आलंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोकण रेल्वेच्या वाहतूकीत मोठा बदल करण्यात आला आहे.
रद्द करण्यात आलेल्या रेल्वे...
दिवा-रत्नागिरी गाडी रद्द
इतर मार्गे वळविण्यात आलेल्या रेल्वे
पाटणा - वास्को द गामा एक्स्प्रेस ही जिते येथून माघारी घेऊन ती कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा-मडगाव मार्गे वळविण्यात आली
लोकमान्य टिळक टर्मिनस- मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेस ही गाडी रोहा येथून माघारी घेऊन ती कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर मार्गे वळविण्यात आली आहे
गांधीधाम- नगरकोइल जंक्शन एक्स्प्रेस ही विन्हेरे येथून माघारी घेऊन कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे
हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम एक्स्प्रेस काल माणगाव येथे होती, ती गाडी माघारी घेऊन कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू मार्गे वळविण्यात आली आहे
लोकमान्य टिळक -तिरूवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस करंजाडी येथे होती, ती गाडी माघारी घेऊन कल्याण लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू जंक्शन - एर्नाकुलम मार्गे वळविण्यात आली आहे.
( नक्की वाचा : कोकणाला मुसळधार पावसाने झोडपलं; अनेक नद्यांना पूर, रस्ते वाहतुकीवर परिणाम )
वेळेत बदल
काल रात्री 9.54 सुटणारी मुंबई सीएसएमटी- मंगळुरु जं. एक्सप्रेस रात्री 2 वाजता सोडण्यात आली आहे.
रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी सुटणारी सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल