कुणाल कामरा यांने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कवीतेमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. शिंदे सेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ज्या वेळी ही कवीता समोर आली त्यावेळी शिवसैनिकांनी कामराचा शो ज्या ठिकाणी शुट झाला होता त्या ठिकाणी तोडफोड केली. शिवाय कामराला फोन करून धमक्या ही देण्यात आल्या. आता तर त्या पुढे जावून जो कुणी कुणाला कामराला काळे फासेल त्याला एक लाखाचे बक्षिस दिले जाईल अशी घोषणाच करण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटणार अशी चिन्हे दिसत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अहिल्यानगर शहर शिवसेनेच्यावतीने कुणाल कामराचा निषेध करण्यात आला आहे. शिवाय त्याचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला आहे. त्याच्या तोंडाला जो कुणी काळं फासेल त्याला एक लाख रुपये बक्षीस जाहीर ही जाहीर करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द बोलणार्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असे शिवसेना नेते सचिन जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे, हे दाखवुन दिलेले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कोणाकडे गेला आहे, हे जनतेने ठरवलेलं आहे. असं ही जाधव या वेळी म्हणाले. कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह कवितेच्या माध्यमातून जे अपशब्द वापरले, ते राज्यातील जनतेला आवडले नाही, असं ही ते म्हणाले. त्यांचा निषेध म्हणून अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने कुणाल कामराचा पुतळा दहन करण्यात आला.
तर संपर्क प्रमुख दिलीप सातपुते यांनी कुणाल कामराचे शो कुठेही होवू देणार नाही असा इशारा दिला आहे. कामरा जिथे दिसेल तिथे त्याला काळे फासले जाईल, असे ही त्यांनी सांगितले. शिवाय एक लाखाचे बक्षिसही जाहीर केले आहे. कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारी कवीता सादर केली होती. त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले होते.