विष्णू बुरगे
नीट पेपरफुटी प्रकरणात आता आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आरसीसीच्या स्पेशल बॅचमधील एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तिने काही धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे स्पेशन बॅचमध्ये काय-काय व्हायचे हे आता स्पष्ट झालं आहे. विद्यार्थिनीने यात सांगितले आहे की जे क्लासमध्ये सांगतलं जात होतं तसेच्या तसे प्रश्न नीटच्या पेपरमध्ये येत होते. पण हे असं कसं होत होतं याचाच प्रश्न आम्हाला पडत होता असं ही तिने सांगितलं आहे.
पुढी ती विद्यार्थिनी सांगते की पेपरच्या चार ते पाच दिवस अगोदर सरांसोबत लाईन टू लाईन प्रश्नांची चर्चा होत होती असा दावा तिने केला आहे. जशास तसे प्रश्न आणि उत्तरांचा रट्टा मारून घेतला जात होता. असं ही तिने या व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे. नीटची प्रत्यक्ष परीक्षा देताना आपण आरसीसीची मॉक टेस्टच देतोय असं वाटत असल्याचं ही या विद्यार्थिनीने सांगितलं आहे. चार-पाच दिवसांपूर्वी जे डिस्कस केलं तेच मुख्य परीक्षेत कसं आलं याचाच विचार आम्ही विद्यार्थी करायचो असा धक्कादायक दावा तिने केला आहे.
किती ही शिकवलं, रट्टा मारला तरी हे अपेक्षित नव्हतं असंही ती म्हणते. सर्वच जसंच्या तसं कसं पेपरमध्ये आलं हा आम्हाला ही पडलेला प्रश्न आहे असं ती म्हणाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. सीबीआयच्या हाती अशा प्रकारचे अनेक पुरावे लागल्याची चर्चा सुरू आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मात्र शिवराज मोटेगावकर याच्या अडचणीत नक्कीच वाढ होणार आहे. स्पेशल बॅचमध्ये असलेल्या काही विद्यार्थ्यांची ही चौकशी सीबीआयमार्फत केली जात आहे. नीट पेपर फुटी प्रकणानंतर शिवराज मोटेगावकर याला अटक करण्यात आली आहे. अजून काही प्राध्यापकांनाही अटक झाली आहे.
देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'गॉड' नावाचा व्यक्ती ही आता सीबीआयच्या जाळ्यात अडकला आहे. या कारवाईनंतर आता अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या 13 वर पोहोचली आहे. नीट तपासादरम्यान सीबीआयच्या हाती मनिषा हवालदारचा मोबाईल लागला होता. या मोबाईलमध्ये 'गॉड' या नावाने एक मोबाईल नंबर सेव्ह होता. हा 'गॉड' नेमका कोण? असा प्रश्न तपास यंत्रणांना सतावत होता. अखेर सीबीआयने या नावामागचा चेहरा शोधून काढला आहे. पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीमध्ये फिजिक्सचा शिक्षक असलेला तेजस हर्षदकुमार शाह हाच तो 'गॉड' असल्याचं तपासात समोर आलं आहे.