रेवती हिंगवे, पुणे:
Leopard Spotted in Pune Airport: गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विविध भागात बिबट्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरातील विविध भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशातच पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 9 महिन्यांपासून विमानतळ परिसरात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश आले आहे.
9 महिन्यानंतर बिबट्या सापडला!
समोर आलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यापासून पुणे विमानतळ परिसरात अधूनमधून दिसणारा एक प्रौढ नर बिबट्या पुणे वनविभागाच्या नेतृत्वाखाली, रेक्यू चॅरिटेबल ट्रस्ट, इंडियन एयर फोर्स आणि पुणे विमानतळ प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे सुरक्षितरीत्या बेशुद्ध करून पकडण्यात आला. या बिबट्याने विमानतळ परिसरातील भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी मानवी हालचाली असलेल्या भागांचा वापर करून आत-बाहेर हालचाल चालू ठेवली होती.
Kolhapuri Chappal: 'प्राडा'शी करार, कोल्हापुरी चप्पल भाव खाणार! एका जोडीची किंमत ऐकून चक्रावून जाल
विमानतळाचा विस्तृत आणि संवेदनशील परिसर लक्षात घेता, त्याला पकडण्याच्या प्रयत्नांना अनेक गंभीर तांत्रिक आणि सुरक्षा विषयक अडचणींचा सामना करावा लागला. कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे यांद्वारे सातत्याने निरीक्षण ठेवण्यात आले होते. बिबट्याचे सर्व संभाव्य बाहेर पडण्याचे मार्ग बंद व मजबूत करण्यात आले.
असे केले रेस्क्यू...
अतिरिक्त लाईव्ह निरीक्षण करणारे कॅमेरे बसवण्यात आले आणि बोगद्याच्या आतील हालचाली अधिक अचूकपणे समजण्यासाठी कॅमेरा ट्रॅपचे पुनर्स्थापन करण्यात आले.. 11 डिसेंबर रोजी सुमारे 30 सदस्यांच्या संयुक्त पथकाने बिबट्याला अंदाजे 80 फूट लांबीच्या बोगद्यात नेण्याची मोहीम आखली, जेणेकरून नियंत्रित परिस्थितीत बेशुद्ध करण्यात आले.
Mumbai News: मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार! राज्यमंत्री पंकज भोयर यांची मोठी घोषणा