पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत दारूच्या बाटल्या, नेमकं प्रकरण काय?

Advertisement
Read Time: 2 mins
जळगाव:

सरकारी कार्यालयात दारुच्या बाटल्या आढळणे हे काही नवीन नाही. या आधीही अनेक सरकारी कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि वाचल्या आहेत. पण जळगावच्या जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेतलं प्रकरण थोडं वेगळं आहे. या प्रयोग शाळेत चक्क दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. धक्कादायक म्हणजे याच बाटल्यांमध्ये गुणवत्ता तपासण्यासाठी आणलेले पाणी ठेवले जात होते. या पाण्यासाठी प्रयोगशाळेतूनच दारूच्या बाटल्या दिल्या जात होत असल्याचा आरोप होत आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

जळगाव जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत दारूच्या बाटलीत पीण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी ठेवण्यात आले होते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते सूरज नारखेडे यांनी उघड केली आहे. शिवाय जर दारूच्या बाटलीत ठेवलेल्या पाण्याची काय गुणवत्ता तपासली जाणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. पावसाळा सुरू झाल्याने दूषित पाण्याद्वारे होणारे संसर्ग रोग टाळण्यासाठी  जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीचे आदेश दिले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - धक्कादायक! पोलीस भरती प्रक्रियेतील उमेदवाराकडे आढळले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन?

या आदेशानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग, ग्रामपंचायत त्यांच्याकडून गावातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र हे पाण्याचे नमुने दारूच्या बाटलीत साठवड्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दारूच्या बाटलीत जर पाणी ठेवले जाणार असेल. त्यानंतर त्याची गुणवत्ता तपासली जाणार असेल तर त्याची शुद्धता कशी तपासली जाणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली जात आहे.

ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंच्या मतदार संघात पोस्टर वॉर, मनसेच्या 'त्या' पोस्टरची चर्चा

जळगाव जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत समाजसेवक सुरज नारखेडे गेले होते.त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना दारूच्या बाटल्यांबाबत जाब विचारला. पण त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते. नारखेडे यांनीही पाण्याचे सॅम्पल आणले होते. पण त्यांना ते दारूच्या बाटलीत ठेवण्यास सांगण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकार दारूच्या बाटलीत सॅम्पल मागवत आहे.असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय याबाबत वरिष्ठांना फोनवरून ही नारखेडे यांनी विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळाल्याचा त्यांचा दावा आहे. 

Advertisement