MPSC Paper Leak: एका लव्ह स्टोरीतून एमपीएससी घोटाळ्याचा कसा झाला पर्दाफाश? वाचा सविस्तर

MPSC Paper Leak Scam: या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका 'लव्ह स्टोरी' आणि त्यातून झालेल्या ब्रेकअपमुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

MPSC Paper Leak Scam: एमपीएससी (MPSC) द्वारे घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) भरती परीक्षेत झालेला एक मोठा घोटाळा अखेर समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात मोठी कारवाई करत एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका 'लव्ह स्टोरी' आणि त्यातून झालेल्या ब्रेकअपमुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला. कोर्टाने सर्व आरोपींना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ब्रेकअप अन् भांडणामुळे उघड झालं सत्य

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका प्रेमी जोडप्याच्या वादातून झाली. परीक्षार्थी ऋतुजा पाटील हिचे वडील अमृत पाटील यांनी नंदुरबार येथील कोचिंग क्लास संचालक आणि पेपर लीकचा मुख्य सूत्रधार प्रवीण पाटील याच्याकडून प्रश्नपत्रिका विकत घेतली होती. ऋतुजाने ही प्रश्नपत्रिका तिचा प्रियकर गौरव पाटील यालाही दिली. मात्र, निकाल आल्यानंतर ऋतुजा उत्तीर्ण झाली आणि गौरव नापास झाला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि त्यांचा ब्रेकअप झाला.

Advertisement

या वादानंतर गौरव पाटीलने थेट एमपीएससीला ई-मेल पाठवून पेपर लीकची तक्रार केली. नंतर त्याने तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत चौकशीचे चक्र फिरले होते. या प्रकरणात गौरवलाही आता अटक झाली आहे.  

एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक

मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात कारवाई करत 6 जणांना गजाआड केले आहे. यामध्ये एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी (ASO) गोपाळ मराठे, assistant सेक्शन ऑफिसर विश्वेश्वर नकाते, पेपर लीकचा मुख्य सूत्रधार व कोचिंग संचालक प्रवीण पाटील, परीक्षार्थीचा बाप अमृत पाटील आणि या सिंडिकेटमधील आणखी एका आरोपीचा समावेश आहे.

एमपीएससी औषध निरीक्षक भरती अन् घोटाळ्याचा घटनाक्रम

एमपीएससीने 29 जुलै 2025 रोजी अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट-ब) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 22 मार्च 2026 रोजी राज्यातील 6 विभागीय मुख्यालयांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली. 

या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर झाला, ज्यामध्ये 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. 1 ते 22 जुलै 2026 दरम्यान झालेल्या मुलाखतींमध्ये 488 उमेदवार सहभागी झाले होते.

Advertisement

मात्र, तक्रारींचे गांभीर्य पाहून एमपीएससीने 27 जुलै 2026 रोजी मुंबई पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. जुलै 2026 च्या शेवटी गुन्हे शाखेने सादर केलेल्या अहवालात किमान एका उमेदवाराला परीक्षेपूर्वी पेपर मिळाल्याचे स्पष्ट झाले. या अहवालानंतर, 25 ऑगस्ट 2026 रोजी एमपीएससीने औषध निरीक्षक गट 'ब' ची संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याची मोठी घोषणा केली.
 


Topics mentioned in this article