2 months ago

Maharashtra Live Updates: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईमध्ये सुरु आहे. या अधिवेशनात शेतकरी प्रश्नांवरुन राज्य सरकार आणि विरोधकांध्ये जोरदार घमासान सुरु आहे. सोमवारी मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने खरेदी केलेल्या हॉटेलवरुन अंबादास दानवे यांनी शिरसाटांची कोंडी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या आंदोलनावरुन जोरदार वातावरण तापले आहे. पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड केल्यानंतर नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

Jul 08, 2025 14:39 (IST)

मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका

मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना पाहाटे अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही मोर्चा निघाला. सुटका झाल्यानंतर अविनाश जाधव मोर्चात सहभागी झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  

Jul 08, 2025 14:38 (IST)

MNS Morcha LIVE Updates: हो आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

हो आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही, आम्ही हिंदू मराठी आहे असं वक्तव्य मीरारोड मोर्चा वेळी संदीप देशपांडे यांनी केलं. या मोर्चात सहभागी झालेल्या मुस्लीमांचेही त्यांनी यावेळी स्वागत केले. 

Jul 08, 2025 13:37 (IST)

MNS Morcha Live: आंदोलकांचा आक्रमक पवित्रा, प्रताप सरनाईक यांनी काढता पाय घेतला

प्रताप सरनाईक हे मनसेच्या मोर्चात सहभागी  व्हायला आले होते, मात्र प्रताप सरनाईक यांना पाहताच आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून त्यांनी काढता पाय घेतला.

Jul 08, 2025 13:25 (IST)

MNS Morcha News: अविनाश जाधव यांच्या सुटकेसाठी मनसैनिकांचा ठिय्या

मीरा-भाईंदर मराठी मुद्द्यावरून वाद चिघळलेला आहे या वेळेला मीरा-भाईंदर पोलिसांनी अविनाश जाधव मनसे नेते यांना नोटीस बजावली होती परंतु आज सकाळी पहाटे पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना मांडवी  पोलीस ठाणे येथे आणण्यात आलेला आहे गुन्हे शाखा येथे बसवण्यात आलेले आहे.

या वेळी मीरा भाईंदर येथे काही आंदोलन करताना सोडण्यात आलेले आहे यावेळी अविनाश जाधव यांना सोडण्यात येते की नाही हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे

Advertisement
Jul 08, 2025 13:11 (IST)

मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी

मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी

मीरारोड स्टेशन परिसरात मराठी माणसांची मोठी गर्दी

मोर्चात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Jul 08, 2025 13:09 (IST)

राज ठाकरे यांची मनसे नेत्यांसोबत शिवतीर्थावर बैठक सुरु

राज ठाकरे यांची मनसे नेत्यांसोबत शिवतीर्थावर बैठक सुरु

बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई या नेत्यांसोबत बैठक

Advertisement
Jul 08, 2025 12:52 (IST)

मनसेच्या मीरा-भाईंदरमधील मोर्चाला अखेर परवानगी मिळाली

मनसेच्या मीरा-भाईंदरमधील मोर्चाला अखेर परवानगी मिळाली

थोड्याच वेळात मोर्चाची सांगता होणार

Jul 08, 2025 12:00 (IST)

MNS Morcha News: मोर्चाला जाणार, अडवून दाखवा.. मंत्री प्रताप सरनाईक यांचे आव्हान

शिवसेना शिंदे गटाचे नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आजच्या मीरा भाईंदरमधील मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मीरा भाईदरमध्ये मोर्चात जात आहे, पोलिसांनी अडवून दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी दिले आहे. 

Advertisement
Jul 08, 2025 11:18 (IST)

MNS Morcha Live Updates: मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख पोलिसांच्या ताब्यात

मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काशिमीरा पोलीस ठाण्यात आणले

याअगोदर अविनाश जाधव यांनाही ताब्यात घेऊन आणलं आहे काशिमीरा पोलीस ठाण्यात

Jul 08, 2025 11:16 (IST)

LIVE Updates: सुशील केडियांचे ऑफिस फोडणारे मनसैनिक राज ठाकरेंच्या भेटीला

मराठी बोलणार नाही म्हणणारऱ्या सुशील केडीयाचं ऑफिस फोडणारे मनसे सैनिक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहचले

सुशील केडियाचं ऑफिस फोडणारे मनसे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासोबत मनसे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ इथे भेट घेणार

Jul 08, 2025 11:13 (IST)

MNS Morcha News: राज्यभरातून मनसेनिक मीरा भाईंदरमध्ये पोहोचण्याच्या तयारीत

राज्यभरातून मनसैनिक मिरारोड भाईंदरमध्ये पोहोचण्याच्या तयारीत

मिरारोडमधील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता मुंबईसह महाराष्ट्रातील मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता

Jul 08, 2025 10:21 (IST)

MNS Morcha: मनसे नेते घेणार राज ठाकरेंची भेट

मिरा रोड येथील मोर्चाची होणारी दडपशाही याबाबतची माहिती देण्यासाठी काही मनसेचे नेते राज ठाकरे यांची भेट घेणार. 

थोड्याच वेळात मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेणार आणि मोर्चाची पुढील भूमिका जाहीर करणार.

Jul 08, 2025 09:08 (IST)

LIVE Updates: काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंची तक्रार

काँग्रेस आमदारांमधील नाराजी नाट्य पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे

काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार नाना पटोले यांच्यावर काही आमदार नाराज असल्याची माहिती विश्वानीय सूत्रांनी दिली आहे

सभागृहात नेमकं कोणत्या मुद्यानवर चर्चा करायची यासाठी आमदारांना विश्वासात घेतलं जात नाही

पायऱ्यांवर देखील आंदोलन होत त्याचा काय विषय असतो या सगळ्याची माहिती दिली जात नाही

या सगळ्या कारणांमुळे काही आमदार या दोन नेत्यांवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे

Jul 08, 2025 09:06 (IST)

LIVE Updates: मिरारोड परिसरात पोलिसांचा चोख सुरक्षा बंदोबस्त

 मनसेच्या माध्यमातून आज मीरा रोड भागात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  मात्र कालपासूनच महाराष्ट्र सैनिकांना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांना पोलिसांकडून नोटीसी बजावल्या जात आहे.  कायदा आणि सूव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

Jul 08, 2025 09:05 (IST)

LIVE Updates: मोकाट कुत्र्यांची दहशत, सहाव्या मजल्यावरून पडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू


नागपूरच्या कलमना भागातील ही घटना असून दहा मजली  इमारतीतील पाचव्या माळ्यावर राहणाऱ्या कुटुंबातील जयेश बोकडे नामक मुलाचा घरी परत जात असताना सहाव्या मजल्यावरील जिन्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

नागपूरच्या पावनगाव येथील देव हाईट्स या नवीन असलेल्या सदर इमारतीत अद्याप निर्माण कार्य सुरू असून जिन्यात असलेल्या गॅप मधून मुलगा खाली पडल्याचे बोलले जाते.

Jul 08, 2025 09:05 (IST)

LIVE Updates: खडकवासला धरण साखळी पावसाची संततधार सुरूच

खडकवासला धरण साखळी  पावसाची संततधार सुरूच

सकाळी खडकवासला धरणातून ४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू 

खडकवासला, वरसगाव ,पानशेत आणि टेमघर या चार धरणात एकूण ६६ टक्के पाणीसाठा 

खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात गेल्या वर्षी च्या तुलनेत तीन पट पाणीसाठा जास्त 

तर पुणे शहराचा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट

Jul 08, 2025 09:04 (IST)

LIVE Updates: नाशिक जिल्हा परिषदेतच महिला असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर

- नाशिक जिल्हा परिषदेतच महिला असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर

- एका विभागीय अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ 

- 20 हून अधिक महिलांनी विशाखा समितीकडे केली तक्रार 

- पुराव्यानिशी तक्रारी प्राप्त झाल्या असून विशाखा समितीकडून तपास सुरू

Jul 08, 2025 06:21 (IST)

LIVE Updates: छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ बालगृह प्रकरणाची केंद्रीय महिला आयोगकडून दखल

छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ बालगृह प्रकरणाची केंद्रीय महिला आयोगकडून दखल 

पॉक्सो कायद्यांतर्गत जबाबदार अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश 

पीडितांचे त्वरित पुनर्वसन  करण्यासाठी केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे महाराष्ट्राच्या डीजीपींना पत्र

Jul 08, 2025 06:19 (IST)

LIVE Updates: लाडकी बहीण योजनेमुळे नंदुरबारमधील बँकांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी

 राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. पैसे काढण्यासाठी महिलांनी बँकांसमोर लांबच लांब रांगा लावल्या होत्या ज्यामुळे त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. नंदुरबार शहरातील प्रमुख बँकांच्या शाखांबाहेर महिलांची पैसे काढण्यासाठी बँकेचे बाहेर गर्दी दिसून आली.

Jul 08, 2025 06:19 (IST)

LIVE Updates: नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी

नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रागांमध्ये सुरु असलेल्या संततधारीमुळे नदी नाल्याना पुर आला असून सातपुड्यातील नदी आणि धबधबे ओसांडून वाहत आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातील वाल्हेरीचा धबधबा गेल्या दोन तीन दिवसांपासून धोकादायक पद्धतीने वाहत असून त्यात पर्यटक धोकादायक पद्धतीने आनंद घेतांना दिसून येत आहे. मुळातच वाल्हेरी धोकादायक पद्धतीने वाहत असतांना जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने आनंद घेण हे जीवावर बेतण्यासारख असून याबाबत प्रशासनाने बंदोबस्त ठेवल्यानंतर नागरीक अशा घटना टाळतील का असा प्रश्न वाल्हेरीच्या परिस्तीथी वरुन समोर येतांना दिसून येत आहे.