2 days ago

Maharashtra Assembly Monsoon Session LIVE Updates: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस.  अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. नाना पटोले यांच्या निलंबनाने कालचा चांगलाच गाजला. आजही अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Jul 02, 2025 22:45 (IST)

LIVE Updates: शुबमन गिलची सलग दुसरी सेंच्यूरी, एजबस्टनमध्ये केली झुंजार खेळी

शुबमन गिलने दुसऱ्या कसोटी सामन्यात सलग दुसरी  सेंच्यूरी केली आहे.  एजबस्टनमध्ये त्याने आपल्या झुंजार खेळीने संघाला चांगल्या स्थितीत नेले आहे. शुबमन गिल हा चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे ज्याने कर्णधार म्हणून पहिल्या दोन कसोटी सामन्यात शतक झळकवण्याचा पराक्रम केला आहे. या आधी विजय हजारे, सुनिल गावस्कर आणि विराट कोहली यांनी कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात शतक झळकवले होते. त्या पंगतीत शुबमन गिल जावून बसला आहे.   

Jul 02, 2025 21:36 (IST)

LIVE Updates: औरंगाबाद विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ईमेल

औरंगाबाद विमानतळावर शनिवारी सकाळी बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या. विविध सुरक्षा यंत्रणांनी मिळून ईमेलचा नेमका कुठून आला याचा शोध सुरू केला आहे.

२९ जून रोजी सकाळी १०.१५ वाजता kyoandrokill@atomicmail.io या ईमेल आयडीवरून विमानतळा परिसरात बॉम्ब ठेवल्याचा मेल आला. या ईमेलमध्ये, विमानतळ परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी तसेच विमानांमध्ये बॉम्ब असलेल्या बॅग्स ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

Jul 02, 2025 19:46 (IST)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंढरपूर दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंढरपूर दौऱ्यावर 

आषाढीसाठी प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधांच्या पाहणीसाठी एकनाथ शिंदे पंढरपूरला...

एकनाथ शिंदे साधणार वारकऱ्यांशी संवाद

विठ्ठलाची दर्शन रांग, 65 एकर आणि चंद्रभागा वाळवंटाची उपमुख्यमंत्री करणार पाहणी

मुख्यमंत्री असतानाही एकनाथ शिंदे वारी पूर्वी येत होते पाहणी दौऱ्यावर...

Jul 02, 2025 18:09 (IST)

LIVE Updates: पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी

पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी 

कॉलेजमध्येच विद्यार्थ्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करत राडा 

हाणामारीत तरुण गंभीर जखमी, विद्यार्थ्यावर ICU मध्ये उपचार सुरू

एका नामांकित महाविद्यालयात निकाल पाहण्याच्या वादातून विद्यार्थ्यावर हल्ला 

१० ते १५ जणांच्या टोळक्याकडून विद्यार्थाला जबर मारहाण 

मारहाणीचा प्रकार CCTV मध्ये कैद 

पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Advertisement
Jul 02, 2025 17:21 (IST)

LIVE Updates: विधानसभेत जोरदार राडा, 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब

बबनराव लोणीकर यांनी सभागृहात माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली होती.  त्यावर माझ्या नावाचा उल्लेख केला गेला.  मी शेतकऱ्यांबद्दल वाईट बोललो नाही. मी शेतकरी आहे.  फक्त राजकारण केलं जात आहे. असं ते म्हणाले. यावेळी विरोधकांनी माफी मागा घोषणा दिल्या.  भावना दुखावल्या असतील तर त्यांनी माफी मागितली आहे असं शंभूराज देसाई म्हणाले. त्यात योगेश सागर यांनी देशाच्या ऑपरेशन सिंदूर संशय व्यक्त करतात ते विरोधक देशद्रोही आहेत. असं वक्तव्य केलं त्यानंतर सभागृहात गोंधळ झाल. शेवटी विधानसभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

Jul 02, 2025 13:43 (IST)

LIVE Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा लवकरच पुणे दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा 

४ जुलै रोजी अमित शहा पुणे दौऱ्यावर 

पुण्यात अनेक कार्यक्रमांना केंद्रीय मंत्री अमित शहा लावणार हजेरी 

NDA मधील श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अमित शहा यांच्या हस्ते होणार उद्घाटन 

तर अमित शहा यांच्या उपस्थितीत  बैठक देखील पुण्यात होण्याची शक्यता 

यासह इतर तीन कार्यक्रमांना अमित शहा ४ जुलै रोजी लावणार हजेरी

३ जुलै ला पुण्यात दुपारी दाखल पुण्यात असणार मुक्कामी तर ४ जुलै ला लावणार विविध कार्यक्रमांना उपस्थिती

Advertisement
Jul 02, 2025 08:42 (IST)

LIVE Updates: पुण्यात पुन्हा ड्रॅग्सची विक्री

पुण्यात पुन्हा ड्रॅग्सची विक्री 

पुणे शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक 

आरोपीकडून मेफेड्रॉन ड्रग्स पोलिसांनी केले जप्त 

आकिब अशफाक शेख अस अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव 

आरोपी पुणे शहरातील मध्यवर्ती भागात करत होता मेफेड्रॉन या अमली पदार्थांची विक्री 

आरोपीकडून 4 लाख रुपयांचे ड्रग्स पुणे पोलिसांनी केले जप्त

Jul 02, 2025 08:42 (IST)

LIVE Updates: पुणे पोलिसांकडून 140 पिस्तूल परवाने रद्द तर नवे 400 अर्ज फेटाळले

 पुणे पोलिसांकडून 140 पिस्तूल परवाने रद्द तर नवे 400 अर्ज पोलिसांनी फेटाळले

गेल्या दीड वर्षात पुणे पोलिसांनी केली कारवाई 

पिस्तूल परवाना मिळविण्यासाठी पोलिसांकडे येणाऱ्या अर्जांमध्येही मोठी घट

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जानेवारी 2024 पासून जून 2025 अखेर आलेल्या अर्जांवर तातडीने कारवाई करत 572 अर्जांपैकी केवळ 28 अर्जांना परवानगी दिली आहे

मागील काही वर्षांत काही जणांनी शस्त्र परवाना चुकीच्या पद्धतीने मिळविल्याचे समोर आले असल्याने पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उचलला आहे

Advertisement
Jul 02, 2025 06:38 (IST)

LIVE Updates: संतापजनक! 67 वर्षाच्या म्हाताऱ्याचे कुत्रीसोबत अश्लील चाळे

67 वर्षाच्या म्हाताऱ्याचे कुत्रीसोबत अश्लील चाळे

घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आर्वी पोलीसात गुन्हा दाखल

वर्ध्याच्या आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

कुत्रीसोबत अश्लील चाळे करत असतांनाचा प्रसंग व्हिडीओ मध्ये असल्याचा तक्रारीत उल्लेख

प्राणीमित्र संघटनेने आरोपीवर कठोर कार्यवाहीची केली मागणी

Jul 02, 2025 06:37 (IST)

LIVE Updates: मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरळी डोम येथे करणार पाहणी

मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज सकाळी 11 वाजता वरळी डोम येथे करणार पाहणी...

पाच जुलै रोजी वरळी डोम येथे होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या तयारीच्या अनुषंगाने दोन्ही पक्षाचे नेते करणार पाहणी...

मनसे कडून संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब  उपस्थित असतील...