Maharashtra Assembly Monsoon Session LIVE Updates: आजपासून विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होत आहे. 2025- 26 च्या पुरवणी मागण्यावरती चर्चेचा उद्या पहिला दिवस असणार आहे. या आठवड्यात काही महत्त्वाचे विधेयक पटलावर ठेवण्यात येणार आहे. यासोबतच या आठवड्यातच विशेष सुरक्षा विधेयकावर चर्चेत सुरुवात होणार आहे. उद्याचा दिवस कृषी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची करण्यात येत असलेली फसवणूक यावरून विरोधक आक्रमक होणार आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील सभेत दिलेल्या जय गुजरातच्या घोषणेवरुन आज वादंग रंगण्याची शक्यता आहे.
LIVE Update: संतोष देशमुख खून प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जुलै रोजी होणार
संतोष देशमुख खून प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जुलै रोजी होणार
वाल्मीक कराडसह इतर आरोपींच्या प्रॉपर्टी जप्तीबाबतच्या अर्जावर झाला युक्तिवाद
वाल्मीक करायला दोष मुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर 22 जुलै रोजी न्यायालय निर्णय देणार
वाल्मीक कराड याचे अकाउंट सील करण्याची कारवाई रद्द करावी अशी आरोपीच्या वकिलाची मागणी
Kolhapur Dam Water: कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे 87 टक्के भरली
जुलैच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील धरणे सरासरी 87 टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख 17 धरणांतमध्ये 72.13 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणात 37.62 टीएमसी इतका पाणीसाठा होता तर धरणे सरासरी 55.8 टक्के भरली होती. यावर्षी तुलनेत 31.25 टक्के जादा पाणीसाठा आहे. राधानगरी धरण 77 टक्के भरलं आहे. धरण क्षेत्रांमध्ये पावसाची संततधार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा आवाहन करण्यात येत आहे.
LIVE Updates: एमआयएमचा बिहार विधानसभा निवडणुकीत 'महाराष्ट्र पॅटर्न'
एमआयएमचा बिहार विधानसभा निवडणुकीत 'महाराष्ट्र पॅटर्न'
एमआयएमने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या महाआघाडीत सहभागी होण्याची केली बइच्छा व्यक्त
बिहारचे एमआयएम प्रदेशाध्यक्ष अख्तरुल ईमान यांनी लिहले लालूप्रसाद यादव यांना पत्र
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील एमआयएमने महाविकास आघाडीसोबत जाण्याची इच्छा केली होती व्यक्त
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी लिहले होते महाविकास आघाडीला पत्र
महाराष्ट्रातील विधानसभा पॅटर्न एमआयएमकडून बिहारमध्ये राबवला जातोय
एमआयएममुळे भाजपला फायदा होत असल्याचा आरोप खोटा ठरवण्यासाठी असदुद्दिन ओवेसिंची खेळी
LIVE updates: पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या बसला अपघात, 30 भाविक जखमी
पंढरपूर वरून परतणाऱ्या एसटी बसचा आज पहाटे दोन वाजता भीषण अपघात झाला.. एस टी बस डिव्हायडरला धडकून पलटली..अपघातात बस क्षतिग्रस्त झाली आहे..अपघात झाला त्यावेळी बसमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाून परतणारे 52 वारकरी होते..एम एच 40, वाय 5830 क्रमांकाची खामगाव आगाराची बस पंढरपूर वरून येत होते.. पहाटे दोन वाजेच्या सुमारास मेहकर फाटा ते चिखली दरम्यान असलेल्या महाबीज कार्यालयासमोर बस डिव्हायडरला धडकली..
LIVE Updates:मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची बैठक
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांची बैठक बोलवली.
रात्री वर्षा निवासस्थानी बैठक होणार
आगामी काळात निवडणूक तसच पावसाळी अधिवेशन संदर्भात चर्चा होणार
देवेंद्र फडणवीस सर्व मंत्र्यांची कार्यपद्धती यावरून मार्गदर्शन करणार याकडे लक्ष आहे
LIVE Updates: बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण करून फडणवीसांनी पुण्याईचं काम केलं: आमदार सदाभाऊ खोत
दोन भाऊ एकत्र यावेत ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करून पुण्याचे काम केले आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस घर फोडत नाहीत,तर घर जोडतात. पण काही लोक घरात लई त्रास होतो,म्हणून घर सोडतात,अश्या शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना खोचक टोला लागवला आहे,राजाने उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरून सदाभाऊ खोत यांनी हा खोचक टोला लगावला आहे,ते सांगलीच्या जत मध्ये बोलत होते.
Dharashiv News: कर्नाटकातून चोरून आणलेल्या 5 दुचाकी जप्त
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील मस्सा येथून कर्नाटकातून चोरून आणलेल्या एका दुचाकीसह पाच मोटरसायकलसह आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना मस्सा येथे महादेव उर्फ गगन शिंदे याने मोटरसायकल चोरून आणून त्या पत्र्याचे शेडमध्ये लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या ठिकाणी पोहोचत पोलिसांनी या मोटरसायकल सह आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच मोटरसायकल एकूण दोन लाख 60 हजार रुपये किमतीच्या जप्त करून पुढील कारवाईसाठी आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
LIVE Updates: इतिहासात प्रथमच दुष्काळी जत तालुक्यात बोटिंगच्या स्पर्धा
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यात इतिहासात प्रथमच बोटिंगच्या स्पर्धा भरवण्यात आल्या. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून या स्पर्धा घेण्यात आले आहेत. तलावामध्ये या राज्यस्तरीय कयाकिंग बोटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होते. तर आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले आहे. या स्पर्धा दुष्काळ भागात प्रथमच पाहण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
Nandurbar News: क्कलकुवा-धुळे मार्गावर एसटी बसला गळती, प्रवाशांचे हाल
अक्कलकुवा ते धुळे मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसला मुसळधार पावसामुळे अक्षरश गळती लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बसच्या छतातून पाणी झिरपत असल्याने विशेषत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ओल्या जागेवर बसूनच प्रवास करण्याची वेळ आली. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या अनेक बसगाड्यांची दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. संबंधित बसच्या छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळत होते ज्यामुळे बसमधील अनेक जागा ओल्याचिंब झाल्या होत्या. इतकेच नाही तर बसच्या खिडक्यांचे पत्रे निघालेले होते आणि अनेक सीट तुटलेल्या अवस्थेत होत्या. अशा धोकादायक परिस्थितीतून नागरिकांना प्रवास करावा लागल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Pune News LIVE Updates: पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
रविवारी रात्री पुणे रेल्वे स्थानकाबाहेर एका तरुणाने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. भगवी वेशभूषा परिधान केलेल्या या व्यक्तीने पुतळ्याच्या पायथ्याशी चढून शस्त्राचा वापर करून त्याचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि कोणतेही नुकसान होण्यापूर्वीच हे कृत्य रोखले. आरोपीला तात्काळ अटक करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे.