Maharashtra Live Updates: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. निवडणूका न झाल्यामुळे विकासकाम राखडल्याचे अनेक आमदारांच्या तक्रारी आहेत तर परिषदेत निधी न मिळाल्याची व्यथा थेट सभागृहात आमदार मांडणार आहेत. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
उद्धव ठाकरेंच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुखांनी पक्ष सोडला
चंद्रपुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई मध्ये प्रवेश.
LIVE Update: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड
प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव अनिल देशमुख यांनी मांडला.सर्वांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाला अनुमोदन दिल आहे.
LIVE Update: मुंबईत पावसाला सुरुवात, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली असून मध्यरेल्वेची वाहतूक विस्तळीत झाली आहे. नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूकीवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.
LIVE Updates: बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल
बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल
महामार्गावर घेतली होती 3 तास सभा
यवतमाळच्या महागांव पोलिसात बच्चू कडू सह बारा जणांवर गुन्हे दाखल,नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सातबारा कोरा पदयात्रेची समारोप सभा घेतल्याने तब्बल तीन तास दोन्ही बाजुची वाहतुक झाली होती ठप्प
माजी मंत्री बच्चू कडून सह 12 जणांवर महागाव पोलिसात राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरच सातबारा कोरा पद यात्रेचा समारोपीय सभा घेतल्याने दोन्ही बाजूची वाहतूक झाली होती ठप्प
LIVE Updates: देशात नवीन राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ जाहीर होणार
देशात नवीन राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ जाहीर होणार
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा धोरण जाहीर करतील
२४ जुलै ला नवी दिल्लीत हे धोरण जाहीर होईल.
सहकार क्षेत्राचा समग्र आणि जलद विकास यावर धोरण असेल.
पुढील १० वर्षांचा रोडमॅप मांडेल.
६ ध्येय स्तंभ, १६ उद्दिष्टे आणि ८२ धोरण उपाययोजनांचा या धोरणात समावेश असणार
ग्रामीण भारताच्या विकासासाठी हे धोरण महत्त्वाचं…
महाराष्ट्रासारख्या राज्याला या धोरणाचा मोठा उपयोग होणार
LIVE Updates: भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना मनसेकडून नोटीस
- भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना मनसेकडून नोटीस
- मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पाठवली मानहानीची नोटीस
- मनसेचे नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून दुबे याना वकीलामार्फत बजावण्यात आली नोटीस
- निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेले सगळे विडिओ तातडीने डिलीट करण्याची मागणी
- मराठी लोकांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी उर्दू,तामिळ आणि तेलगू भाषिकांना मारून दाखवण्याचे केले होते वक्तव्य
- 7 दिवसात नोटीसला उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाईचा देण्यात आला ईशारा
LIVE Updates: ऐन पावसाळ्यातही मराठवाडा तहानलेला, राज्यमंत्र्यांची कबुली
ऐन पावसाळ्यातही मराठवाडा तहानलेला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे पाणी टंचाई आणि दुसरीकडे ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असतांना पावसाचा खंड पडला आहे. धक्कादायक म्हणजे भर पावसाळ्यात जालना, छत्रपती संभाजीनगरला आठवड्यातून एकदा पाणी मिळत आहे. आशा परिस्थितीत मराठवाड्यात २१७ गावे आणि ४९ वाड्यांना ३४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेत पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मराठवाड्यातील टंचाईच्या स्थितीची कबुली दिली आहे.
Pune News: पुणे पोर्शे अपघात: आरोपी अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी
पुणे पोर्शे अपघात: आरोपी अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी, निर्णय आज येणार
पुण्यातील गाजलेल्या पोर्शे गाडीच्या अपघात प्रकरणात सरकारी वकिलांकडून आरोपी अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणावर किशोर न्याय मंडळ (JJB) आपला निर्णय आज १५ जुलै रोजी देणार आहे.
या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. आरोपी १७ वर्षीय मुलगा मद्यधुंद अवस्थेत पोर्शे चालवत होता, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेता आरोपीवर प्रौढांप्रमाणे खटला चालवावा, अशी मागणी सरकारी बाजूने करण्यात आली आहे.
LIVE Updates: सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा
- उद्धवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे याना मोठा दिलासा
- तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याने दोघांना दिलासा
- दोघांवर गुन्हे दाखल झाल्याने ऐनवेळी थांबला होता भाजप प्रवेश
- सुनिल बागुल आणि मामा राजवाडे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा
LIVE Updates: ई-बाईक टॅक्सीविरोधात आज मुंबईत आंदोलन; पुण्यातून दोन हजार चालकांचा सहभाग
ई-बाईक टॅक्सीविरोधात आज मुंबईत आंदोलन; पुण्यातून दोन हजार चालकांचा सहभाग
राज्य सरकारकडून ई-बाईक टॅक्सीला दिलेल्या परवानगीविरोधात पुण्यातील बघतोय रिक्षावाला' संघटनेच्यावतीने आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे
या आंदोलनात पुण्यातून ५०० कॅब्समधून दोन हजार चालक सहभागी होणार
ई-बाईकमुळे पारंपरिक रिक्षाचालकांचे उत्पन्न घटण्याची भीती आहे. तसेच अॅपवर शासनाने निश्चित केलेले दर न दर्शवता जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचा आरोप आहे. कंपन्यांना यापूर्वी निवेदने देऊनही दखल न घेतल्याने आता सरकारने कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे
LIVE Updates: आदिवासी व गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व छत्र्यांचे वाटप... महिलांना छत्र्यांचे वाटप
आपण समाजाचं काही तरी देणे लागतो. याच भावनेतून गेली अनेक वर्षापासून कांदळी येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू चंदे हे आपल्या जन्म दिनाचे औचित्य साधत आदिवासी, गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व महिलांना साड्यांचे व इतर चिज वस्तूंचे वाटप करत असतात. यंदा ही त्यांनी आपल्या जन्मदिनी परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व छत्र्यांचे वाटप केले. तसेच हजारो महिलांना छत्र्यांचे वाटप केले. यावेळी त्यांनी आदिवासी व गरीब गरजू विद्यार्थ्यांनं सोबत आपला वाढदिवस साजरा केला. या गरिब मुलांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य याच माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
Nandurbar News: नंदुरबार शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे पालिका प्रशासनाच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
नंदुरबार शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पालिका प्रशासनाच्या विरोधात ठाकरेंची शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले, ठीक ठिकाणी या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अनेक अपघात होत आहेत पालिका प्रशासनाचे सरेरास दुर्लक्ष होत असल्यामुळे नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात रस्त्यांवर असलेले खड्ड्यात ठाकरेंची शिवसेनेच्या वतीने तृतीयपंथीयांच्या हस्ते वृक्षारोपण करून पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
LIVE Updates: आयकर विभागाकडून देशभरातील सुमारे २०० ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी
आयकर विभागाकडून देशभरातील सुमारे २०० ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी
टॅक्स रिटर्नमध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून करचोरी होती सुरू
चार्टर्ड अकाउंट आणि टॅक्स प्रॅक्टिसनर्स यांच्याविरोधात कारवाई
राजकीय पक्षांच्या नावाने देणग्या स्वीकारून करचोरीच्या संशयावरून छापे
कारवाईत छत्रपती संभाजीनगर येथील सीए फर्मचा समावेश
संभाजीनगरच्या फर्मची १६ तास चौकशी
देणग्यांसाठी कराची सवलत असलेल्या कलम ८०जी अन्वये ३०० कोटींचा कर चुकवल्याचा संशय