varun Sardesai: विधान भवन परिसरात वरुण सरदेसाईंना धक्काबुक्की, नीलम गोऱ्हेंसोबत बाचाबाची; नेमकं काय घडलं?

Varun Sardesai Vs Nilam Gorhe: शिंदे सेनेच्या नेत्या निलम गोरे यांच्या सुरक्षा रक्षकाकडून त्यांना धक्काबुक्की झाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Assembly Monsoon Session 2025:  राज्याच्या पावसाळी अधिवेशनातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. विधानभवन परिसरात ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांना धक्काबुकी झाल्याचे समोर आले आहे.  शिंदे सेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकाकडून त्यांना धक्काबुक्की झाली आहे. या प्रकारानंतर वरुण सरदेसाई यांनी संताप व्यक्त केला आहे.

Big News: मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं तर थेट बिल्डरवर कारवाई

नेमकं काय घडलं?

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) या बदलापूर प्रकरणावरुन पोडियमवर प्रतिक्रिया देत होत्या. प्रतिक्रिया देऊन निघाल्या असता वरुण सरदेसाई आणि त्या आमने-सामने आले. यावेळी निलम गोऱ्हे यांच्या अंग रक्षकाकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे. हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे असं म्हणत वरुण सरदेसाई यांनी संताप व्यक्त केला.

मात्र हा प्रकार मुद्दाम झालेला नाही. मी नम्रपणे सांगते हा काही जाणूनबुझून घडलेला नाही, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. मी हा प्रकार मुद्दामहून झालेला नाही, असं सांगत आहे. तरीही तुम्ही माझ्यासमोर खेकसतायं? ही कोणती संस्कृती आहे? असं म्हणत निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचेही पाहायला मिळाले. 

Anil Parab Vs Shambhuraj Desai: बाहेर ये तुला दाखवतो! शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यात तुफान राडा

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी निलम गोऱ्हे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना निलम गोऱ्हे येताच त्यांनी ५० खोके, मर्सिडिज ओके... अशी घोषणाबाजी केली होती. यावेळी निलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता वरुण सरदेसाईंसोबत धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने शिंदे गट-ठाकरे गटामध्ये जोरदार जुंपण्याची शक्यता आहे.

Advertisement