MSBSHSE HSC Result 2025 : शेवटचे काही तास शिल्लक, आज बारावीचा निकाल; कधी आणि कुठे पाहाल?

Maharashtra Board HSC Result 2025: 11 फेब्रुवारी ते 11 मार्च यादरम्यान बारावीच्या विविध शाखेतील परीक्षा पार पडल्या होत्या. यावेळी दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अखेर प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजेदरम्यान HSC चा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे. निकालापूर्वी सकाळी बोर्डाची पत्रकार परिषद पार पडेल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. यानुसार 5 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल लागल्यानंतर गुणांची पडताळणी, उत्तर पत्रिका मिळण्याबाबत, पूनर्मूल्यांकनासंबंधित माहिती हवी असल्याने अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज करता येईल. यासाठी 6 मे ते 20 मे हा कालावधी देण्यात आला आहे. याशिवाय पुढील काही दिवसात म्हणजे 15 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

नक्की वाचा - Pune Traffic : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! सर्वात वर्दळीचा परिसर 'वाहतूक कोंडीमुक्त' होणार!

21 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत...

यंदाच्या वर्षी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान दहावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. यावेळी 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी परीक्षेला बसले. यामध्ये तब्बल 8 लाख मुलं, 7 लाख मुली आणि 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थी होते. तर 11 फेब्रुवारी ते 11 मार्च यादरम्यान बारावीच्या विविध शाखेतील परीक्षा पार पडल्या होत्या. यावेळी दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला बारावीच्या परीक्षेचा निकाल लागेल त्यानंतर दहावीचे निकाल समोर येतील.  

या संकेत स्थळांवर पाहता येईल निकाल:

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com

 mahresult.nic.in