Maharashtra Education Board Press Conference: इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागातून विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये यंदा राज्याचा निकाल 91.88 टक्के इतका लागला असून यामध्ये कोकण विभाग सर्वाधिक म्हणजेच 96. 74 टक्क्यांवर आहे. तसेच लातूर विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 89. 46 टक्के इतका लागला आहे. राज्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिक्षण मंडळाची महत्त्वाची पत्रकार परिषद!
उच्च माध्यमिक म्हणजेच 12 वीच्या परीक्षेत चार माध्यमांतून फेब्रुवारी- मार्चमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्याआधी तोंडी परी झाली तसेच खेळाडू वर्गातील मुलांचे गुण क्रिडा मंडळाकडून घेण्यात आले. यावर्षी शिक्षणमंत्री, शासकीय निर्देशनानुसार कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. तसेच जगजागृती सत्पाह राबवण्यात आला होता. 11 फेब्रुवारी 2025 रोजी व्हिसीद्वारे बारावी परीक्षेबाबत चर्चा करण्यात आली तसेच कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मदत करावी असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते.
बारावीच्या परीक्षा निकोप वातावरणात पार पडण्यासाठी मागील पाच वर्षात परीक्षा केंद्रांवरील केद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या थेट शिक्षकांमधून करण्यात आली होती. तसेच ज्या केंद्रांवर गैरप्रकार होतील त्याची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर्षी 124 परीक्षा केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली असून त्यांनी मान्यता रद्द करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Rahul Gandhi: 'त्यावेळी मी नव्हतो, पण...', शिख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य
राज्यात 11 फेब्रुवारी ते मंगळवार,18 मार्च 2025 या कालावधीत बारावी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. एकूण 10550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी 3373 मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यावर्षी कोकण विभाग सर्वात अधिक, तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण तिची टक्केवारी 94. 58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 आहे म्हणजे मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्के ने जास्त आहे. यंदा निकालात घसरण झाली असून फेब्रुवारी 2024 चा निकाल 93.37% होता गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल 1.49 टक्क्यांनी कमी आहे.
दरम्यान, यंदा झालेल्या बारावी परीक्षेत 3373 केंद्रांपैकी 123 केंद्रावर गैरप्रकार आढळल्याने त्यांची चौकशी होणार आहे. या चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. परीक्षा काळात पुण्यात 2 संभाजीनगर 7 मुंबई 2 अशा 11 कॉपी प्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आल्या होत्या.
(नक्की वाचा- हळदही सुकली नव्हती... नवरदेवाने नवरीच्या मांडीवर जीव सोडला, मन सुन्न करणारी घटना!)
त्याचबरोबर नऊ विभागांमध्ये पुणे 45, नागपूर ३३ छत्रपती संभाजी नगर 214 मुंबई 9 कोल्हापूर 7 अमरावती 17 नाशिक 12 लातूर 37 एकूण 374 कॉपी प्रकार उघडकीस आले आहेत. यापैकी 124 केंद्रांची चौकशी करून कारवाई होणार आहे. त्याचबरोबर 2027 -28 मध्ये बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.