3 days ago

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. आज 15 डिसेंबर रोजी एकूण 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी अनेक मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटातीलही अनेक मोठ्या नावांना पुन्हा मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही. उद्या 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 

Dec 15, 2024 20:57 (IST)

Live Update : माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने भुजबळाचे कार्यकर्ते नाराज

माजी मंत्री छगन भुजबळ यांना आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अजित पवार गटाच्या ओबीसी संघटनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आल्या.  भुजबळांच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनासमोर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.  

Dec 15, 2024 20:16 (IST)

Live Update : हा एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खातेवाटप होईल. नागपुरकर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं अभिनंदन. कमी वयात ते महापौर झाले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री. आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत. यापूर्वीही ते पुन्हा येईन असं म्हणाले आणि ते पुन्हा आले. 

महायुतीची नवी इनिंग सुरू. प्लेयर तेच विरोधक तेच  पण मॅच नवीन आहे. आम्ही अडीच वर्षे टीम म्हणून काम केलं. आम्ही दोघं मिळून दोनशे आमदार निवडून आणू असं म्हणालो होतो. महायुतीचे 237 आमदार निवडून आले. 

विदर्भाला अडीच वर्षात न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले. आमचं मिशन एकच... समृद्ध महाराष्ट्र. मविआने थांबवलेल्या विकासकामांना आम्ही चालना दिली. एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना याची सांगड घातली. लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिली. आणि देदीप्यमान असा विजय मिळवून दिला. देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला. 

हा एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. आम्ही टीम म्हणून काम करणार. 

Dec 15, 2024 20:14 (IST)

Live Update : पुढील काही दिवसात खातेवाटप जाहीर केलं जाईल - अजित पवार

गेल्या काही वर्षात हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला विरोधकांकडून बहिष्कार घालण्याचा पायंडा पडला आहे. त्यामुळे यापुढे चहापाण्याचा कार्यक्रम ठेवायचा की नाही याचा विचार करावा लागेल. 

पुढील काही दिवसात खातेवाटप जाहीर केलं जाईल. 

विरोधक संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पुढे आले तर त्याची उत्तरं दिली जातील. आम्हाला प्रचंड बहुमत आहे, म्हणून सभागृह रेटून चालवलं जाणार नाही. विरोधक कमी संख्येने आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही याची ग्वाही देतो. 

अजित पवार, उपमुख्यमंत्री

Dec 15, 2024 19:53 (IST)

Live Update : फडणवीस सरकारची पहिली पत्रकार परिषद थोड्याच वेळात

फडणवीस सरकारची पहिली पत्रकार परिषदेला थोड्याच वेळात सुरू होणार...

Advertisement
Dec 15, 2024 19:05 (IST)

Live Update : महायुतीचा चहापाण्याचा कार्यक्रम पार पडला

Dec 15, 2024 18:59 (IST)

Live Update : मंत्रिपदाचा पत्ता कट, दीपक केसरकरांची साईदरबारी धाव

महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकीकडे शपथविधी सोहळा सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर शिर्डीत साईचरणी पोहोचले. मंत्रिपदाचा पत्ता कट झाल्यानंतर केसरकरांनी साईदरबारी धाव घेतली आहे. 

Advertisement
Dec 15, 2024 18:57 (IST)

Live Update : शपथविधीनंतर नाशिक जिल्ह्यात भाजपमध्ये नाराजीचा सूर

नाशिक जिल्ह्यात भाजपमध्ये नाराजीचा सूर 

- मंत्रिपदाच्या यादीत नाशिकमधून भाजपच्या एकालाही संधी नाही 

- राहुल आहेर, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे या तिघांच्या नावांची चर्चा होती 

- चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना भर प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता

Dec 15, 2024 18:41 (IST)

Live Update : चहापाण्याच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापाण्याच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. त्यामुळे विरोधकांपैकी कोणीच यावेळी उपस्थित नव्हते. थोड्याच वेळात कॅबिनेट बैठकी सुरुवात होईल.

Advertisement
Dec 15, 2024 18:18 (IST)

Live Update : थोड्याच वेळात रामगिरी बंगल्यावर सरकारचा चहापानाचा कार्यक्रम होणार

थोड्याच वेळात रामगिरी बंगल्यावर सरकारचा चहापानाचा कार्यक्रम होणार 

Dec 15, 2024 18:09 (IST)

Live Update : आज कोण कोणत्या मंत्र्यांनी घेतली शपथ?

१)चंद्रशेखर बावनकुळे  

२)राधाकृष्ण विखे पाटील 

३) हसन मुश्रीफ 

४)चंद्रकांत पाटील 

५)गिरीश महाजन 

६) गुलाबराव पाटील 

७) गणेश नाईक 

८) दादा भुसे 

९) संजय राठोड  

१०) धनंजय मुंडे 

११) मंगलप्रभात लोढा 

१२)उदय सामंत 

१३) जयकुमार रावल 

१४)  पंकजा मुंडे

१५) अतुल सावे 

१६) अशोक उईके  

१७) शंभूराज देसाई  

१८) आशिष शेलार 

१९)  दत्तात्रय भरणे 

२०) आदिती तटकरे 

२१) शिवेंद्रराजे भोसले

२२) माणिकराव कोकाटे 

२३) जयकुमार गोरे 

२४) नरहरी झिरवाळ

२५)संजय सावकारे 

२६) संजय शिरसाट 

२७) प्रताप सरनाईक 

२८) भरत गोगावले 

२९) मकरंद पाटील 

३०) नितेश राणे 

३१) आकाश फुंडकर

३२) बाबासाहेब पाटील 

३३) प्रकाश आबिटकर 

३४) माधुरी मिसाळ 

३५) आशिष जैस्वाल 

३६) पंकज भोयर 

३७)मेघना बोर्डीकर

३८)इंद्रनील नाईक 

३९)योगेश कदम

Dec 15, 2024 17:57 (IST)

Live Update : आतापर्यंत 35 जणांचा शपथविधी पार पडला


१ चंद्रशेखर बावनकुळे

२ राधाकृष्ण विखे पाटील

३ हसन मुश्रीफ

४ चंद्रकांत पाटील

५ गिरीश महाजन

६ गुलाबराव पाटील

७ गणेश नाईक

८ दादा भुसे

९ संजय राठोड

१० धनंजय मुंडे 

११ मंगल प्रभात लोढा

१२ उदय सामंत

१३ जयकुमार रावल

१४ पंकजा मुंडे

१५ अतुल सावे

१६ शंभुराज देसाई

१७ आशिष शेलार 

१८ दत्तात्रेय भरणे

१९ आदिती तटकरे 

२० शिवेंदराजे भोसले

२१ माणिकराव कोकाटे

२२ जयकुमार गोरे

२३ नरहरी झिरवाळ

२४ संजय सावकारे

२५ संजय शिरसाट

२६ प्रताप सरनाईक

२७ भरत गोगावले

२८ मकरंद जाधव पाटील

२९ नितेश राणे

३० आकाश फुंडकर

३१  बाबासाहेब पाटील

३२ प्रकाश आबिटकर

३३ माधुरी मिसाळ

३४ आशिष जैस्वाल

३५ पंकज भोयर

Dec 15, 2024 17:46 (IST)

Live Update : दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच इंदापुरात आनंदोत्सव

इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर पुण्याच्या इंदापूर शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. नागरिकांनी लाडू वाटप करीत गुलालाची उधळण करीत फटाके फोडत हा आनंदोत्सव साजरा केला. इंदापूर शहरातील बाबा चौकात मोठ्या एलईडी स्क्रीनवर हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी इंदापूरकरांनी मोठी गर्दी केली होती

Dec 15, 2024 17:40 (IST)

Live Update : आतापर्यंत 27 जणांचा शपथविधी पार पडला

१ चंद्रशेखर बावनकुळे

२ राधाकृष्ण विखे पाटील

३ हसन मुश्रीफ

४ चंद्रकांत पाटील

५ गिरीश महाजन

६ गुलाबराव पाटील

७ गणेश नाईक

८ दादा भुसे

९ संजय राठोड

१० धनंजय मुंडे 

११ मंगल प्रभात लोढा - संस्कृतमधून शपथ

१२ उदय सामंत

१३ जयकुमार रावल

१४ पंकजा मुंडे

१५ अतुल सावे

१६ शंभुराज देसाई

१७ आशिष शेलार 

१८ दत्तात्रेय भरणे

१९ आदिती तटकरे 

२० शिवेंदराजे भोसले

२१ माणिकराव कोकाटे

२२ जयकुमार गोरे

२३ नरहरी झिरवाळ

२४ संजय सावकारे

२५ संजय शिरसाट

२६ प्रताप सरनाईक

२७ भरत गोगावले

Dec 15, 2024 17:23 (IST)

Live Update : उदय सामंत पुन्हा एकदा मंत्री झाल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साह

रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी नागपूरमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर रत्नागिरीमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ या ठिकाणी सामंत यांचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्रित येत फटाके फोडले. तसंच किरण सामंत आणि उदय सामंत यांच्या नावाच्या  घोषणा देखील दिल्या. उदय सामंत पुन्हा एकदा मंत्री झाल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. 

Dec 15, 2024 17:17 (IST)

Live Update : अखेर पंकजा मुंडेंना संधी, मंत्रिपदाची शपथ घेताना समर्थकांकडून एकच जल्लोष

मंगल प्रभात लोढा 

उदय सामंत

जयकुमार रावल

पंकजा मुंडे

अतुल सावे

शंभुराज देसाई

Dec 15, 2024 17:13 (IST)

Live Update : NCP पक्षाचे नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान नाही

NCP पक्षाचे नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान नाही

Dec 15, 2024 17:06 (IST)

Live Update : मंगल प्रभात लोढा यांनी संस्कृतमधून घेतली शपथ

मंगल प्रभात लोढा यांनी संस्कृतमधून घेतली शपथ

Dec 15, 2024 17:06 (IST)

Live Update : हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष 

कागलच्या गैबी चौक येथे डीजेच्या तालावर ठेका 

 मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांकडून साखर पेढे वाटून आंनद साजरा

Dec 15, 2024 17:01 (IST)

Live Update : संजय राठोड यांनाही मिळालं मंत्रिपद...

संजय राठोड यांनाही मिळालं मंत्रिपद...

Dec 15, 2024 16:58 (IST)

Live Update : संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्यानं भावना गवळी समर्थक नाराज

संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्यानं भावना गवळी समर्थक नाराज

वाशिम जिल्ह्यातील सगळे शिवसेना पदाधिकारी राजीनामा देणार

Dec 15, 2024 16:57 (IST)

Live Update : आतापर्यंत दहा मंत्र्यांनी घेतली शपथ

आतापर्यंत दहा मंत्र्यांनी घेतली शपथ

११ चंद्रशेखर बावनकुळे

२ राधाकृष्ण विखे पाटील

३ हसन मुश्रीफ

४ चंद्रकांत पाटील

५ गिरीश महाजन

६ गुलाबराव पाटील

७ गणेश नाईक

८ दादा भुसे

९ संजय राठोड

१० धनंजय मुंडे 

Dec 15, 2024 16:42 (IST)

Live Update : चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ, अखेर चर्चेला विराम

बावनकुळेंना मंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा सुरू असताना पहिल्यांचा त्यांनी शपथ घेतली. 

Dec 15, 2024 16:37 (IST)

Live Update : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णनही शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचले

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णनही शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचले

Dec 15, 2024 16:35 (IST)

Live Update : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही मंचावर उपस्थित

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही मंचावर उपस्थित

Dec 15, 2024 16:29 (IST)

Live Update : शपथविधी घेणारे मंत्री मंचावर पोहोचले

शपथविधी घेणारे मंत्री मंचावर पोहोचले, थोड्याच वेळात शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. 

Dec 15, 2024 16:25 (IST)

Live Update : थोड्याच वेळात मंत्रिपदाच्या शपथविधीला सुरुवात

थोड्याच वेळात मंत्रिपदाच्या शपथविधीला सुरुवात

Dec 15, 2024 15:51 (IST)

Live Update : 38 वर्ष पक्षात केलेल्या संघर्षाची पावती मला मिळाली, गुलाबराव पाटील नागपुरात पोहोचले

गुलाबराव पाटील नागपुरात पोहोचले 

नागपुरात पोहोचताच मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया 

पक्षाचा असलेला विश्वास आणि जनतेच्या भरोशावर आज मी शपथ घेतोय गुलाबराव पाटलांचे विधान 

38 वर्ष पक्षात केलेल्या संघर्षाची पावती मला मिळाली, आज माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण 

सर्वसाधारण कुटुंबाच्या माणसाला चौथ्या वेळेस मंत्रिपदाची शपथ घेण्याचा मान मिळतो आणि तेही 33 वर्षानंतर 

माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणार

Dec 15, 2024 15:45 (IST)

Live Update : मंत्रिपदाचं वचन न पाळल्याने नरेंद्र भोंडेकरांचा शिवसेना उपनेते, विदर्भ समन्वयकपदाचा राजीनामा

महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना शिवसेनेचे नेते तीनदा आमदार म्हणून निवडून आलेले भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळात कुठेही स्थान न मिळाल्याने भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज आहेत की काय अशा चर्चेला आता उधान येत आहे

Dec 15, 2024 14:36 (IST)

Live Update : मतदारांनी महायुतीवर विश्वास दाखवला - अजित पवार

राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, मतदारांनी महायुतीवर विश्वास दाखवला. पक्षाने नेहमी संघाने विश्वास ठेवला. 

Dec 15, 2024 13:46 (IST)

Bhusaval News: स्वामी ऋषी स्वरूप दास यांची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ मधील श्री स्वामीनारायण गुरुकुल मध्ये सचिव पदावर कार्यरत असलेले स्वामी ऋषी स्वरूप दास यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे स्वामीनारायण संप्रदायामध्ये एकच खळबळ उडाली आहे.  दरम्यान स्वामी ऋषी स्वरूप दास यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वामी ऋषीस्वरूप दास हे गुजरात मधील वडताल येथे जाणार असल्याची माहिती समोर आली असून मात्र जाण्यापूर्वीच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने स्वामीनारायण संप्रदाय मध्ये मात्र शोक व्यक्त केला जात आहे.

Dec 15, 2024 13:45 (IST)

Pune Crime: 100 रुपयासाठी हत्या, जुन्नरमधील घटना

दारू पिण्यासाठी उसने दिलेले १०० रुपये परत करण्याच्या वादातून बाळू पोखरकर या ४१ वर्षीय व्यक्तीचा खून झाला आहे...ही घटना आहे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मधली...या गुन्ह्याची नोंद नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून आता याविषयीचा अधिक तपास हे नारायणगाव पोलीस करताहेत.

व्हिओ - नारायणगाव पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्यात ह्या घटनेसंदर्भात अशी माहिती दिली आहे की बाळू महादेव पोखरकर याने राहुल भाऊसाहेब गुळवे याला दारू पिण्यासाठी एक आठवड्यापूर्वी १०० रुपये दिले होते.हे पैसे तो राहुल गुळवे यास वारंवार मागत होता.मात्र हे पैसे परत न दिल्याने बाळू पोखरकर याने राहुल गुळवे यास नारायणगाव बस स्थानकात मोठमोठ्याने शिवीगाळ केली.याचा राग मनात धरून राहुल गुळवे याला काल रात्री नारायणगाव बस स्थानकाच्या जवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत हाताने ओढत नेऊन दांडक्याने मारहाण केली आणि डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली...केवळ १०० रुपये साठी झालेल्या या हत्येची मात्र तालुक्यासह जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

Dec 15, 2024 12:42 (IST)

CM Devendra Fadnavis Nagpur: CM देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात जंगी स्वागत, मिरवणुकीला सुरुवात

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर आल्यानंतर त्यांनी माझ्या परिवाराकडून स्वागत होत आहे, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, आशिष जयस्वाल, चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके रथावर आहेत. तर इतर स्थानिक नेते खाली चालत आहेत. 

Dec 15, 2024 12:17 (IST)

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे नगर विकास आणि गृहनिर्माण हे दोन्ही महत्त्वाची खाते असतील. गेले अनेक दिवस महायुतीमध्ये मंत्रिपदावरुन वाद सुरु होता. प्रामुख्याने नगर विकास आणि गृहनिर्माण खात्यावरून  रस्सीखेच होती. यामध्ये एकनाथ शिंदेंनी बाजी मारली असून दोन्ही खाते आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. 

Dec 15, 2024 12:09 (IST)

सोलापूरसह जालना जिल्हा मंत्रिपदापासून वंचित, एकाही आमदाराला फोन नाही

सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला अद्याप फोन आलं नसल्याची माहिती समोर आली आहे.  मागील पाच वर्षात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी देखील सोलापूरला मंत्रीपदपासून वंचित ठेवलेल होतं. 

मात्र 2014 साली महायुती सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्याला सुभाष देशमुख यांच्या रूपाने एक कॅबिनेट तर विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने एक राज्यमंत्रिपद होते.  आमदार विजयकुमार देशमुख सलग 5 वेळा आमदार तर सुभाष देशमुख सलग 3 वेळा आमदार आहेत.

तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रशासनावर असलेली पकड आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख आहे. त्यामुळे या तीन आमदारांची नावे यंदा मंत्रीपदासाठी चर्चेत होती. मात्र तरीही सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. 

त्याचबरोबर जालना जिल्ह्यालाही मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. जालन्यातील 5 पैकी एकाही आमदाराला मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अद्याप फोन आलेला नाही. 

Dec 15, 2024 12:09 (IST)

सोलापूर जिल्हा पुन्हा वंचित, मंत्रिपदासाठी कोणालाही फोन नाही

सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला अद्याप फोन आलं नसल्याची माहिती समोर आली आहे.  मागील पाच वर्षात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी देखील सोलापूरला मंत्रीपदपासून वंचित ठेवलेल होतं. 

मात्र 2014 साली महायुती सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्याला सुभाष देशमुख यांच्या रूपाने एक कॅबिनेट तर विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने एक राज्यमंत्रिपद होते.  आमदार विजयकुमार देशमुख सलग 5 वेळा आमदार तर सुभाष देशमुख सलग 3 वेळा आमदार आहेत.

तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रशासनावर असलेली पकड आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख आहे. त्यामुळे या तीन आमदारांची नावे यंदा मंत्रीपदासाठी चर्चेत होती. मात्र तरीही सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. 

Dec 15, 2024 11:07 (IST)

Ravindra Chavan New BJP Chief: मोठी बातमी! भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष ठरले?

भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्यानंतर आता नवे प्रदेशाध्यक्ष कोण असणार? याबाबत उत्सुकता असतानाच महत्वाचे नाव समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाकडून रविंद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  मंत्रिपदावरुन पत्ता कट झाल्यानंतर आता रविंद्र चव्हाण यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. 

Dec 15, 2024 11:01 (IST)

Sanjay Savkare News: आमदार संजय सावकारे यांना मंत्री पदासाठी फोन, कार्यकर्त्यांचा जल्लोष

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय सावकारे यांना मंत्रिपदासाठी फोन आला असून भुसावळ मध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे  दरम्यान संजय सावकारे यांना फोन येताच संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे व त्यांचे कुटुंबीय हे नागपूरकडे रवाना झाले आहेत. मंत्री पदासाठी सावकारे यांना फोन आल्याची माहिती स्वतः त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी दिली आहे.

Dec 15, 2024 11:00 (IST)

Satara News: शिवेंद्रराजेंना मंत्रिपदासाठी फोन; साताऱ्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रीपदाचा फोन आल्यानंतर साताऱ्यात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा ल्लोष साजरा करण्यात येतोय. साताऱ्यातील ऐतिहासिक अशा गांधी मैदानालगत मोती चौकात काही कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व भाजपचा झेंडा फडकावून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भाजपचे नितीन जांभळे, गौरव शिंदे, मनोज पवार सागर कुंभार, गोरख जाधव आदी उपस्थित होते

Dec 15, 2024 11:00 (IST)

Nitesh Rane: नितेश राणेंना मंत्रिपद, कणकवलीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

आमदार नितेश राणे यांना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर कणकवली शहरातील पटवर्धन चौकामध्ये कार्यकर्त्यांनी फटाके लावून आनंद व्यक्त केला  बरेच दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता आणि हा विस्तार आता आज सायंकाळी होत आहे आणि त्यासाठी आमदार नितेश राणे यांना  मंत्रीपदासाठी फोन आल्याने कणकवली मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हात प्रत्येक तालुक्यात चौका चौकात फटाके लावून आनंद उत्सव साजरा करत आहेत. 

Dec 15, 2024 10:16 (IST)

CM Devendra Fadnavis Rally nagpur: मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला नागपूरकर सज्ज

नागपुरात राज भवन येथे आज दुपारी चार वाजता शपथविधी आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या पासून सुरू होणार त्यापूर्वी मंत्री मंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाची घोषणा आज होणार आहे. त्या निमित्ताने राजकीय नेते नागपुरात पोहोचण्यास आरंभ झाला आहे. विविध पक्षांचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते नागपुरात पोहोचत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस 12 वाजता तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक वाजता नागपुरात दाखल होणार आहेत.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 12 वाजता पोहोचणार आहेत. भाजपचे कार्यकर्ते विमानतळावर स्वागत करणार आहेत. त्यांच्या स्वागताला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच कित्येक खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मिरवणुकीने त्यांना त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. यावेळी मार्गात त्यांचे वैशिष्टयपूर्ण पध्द्तीने स्वागत करण्याची कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे.

Dec 15, 2024 10:14 (IST)

Pankaj Bhoyar Profile: आमदार पंकज भोयार यांना मंत्रिपदासाठी फोन

आमदार पंकज भोयर यांना मंत्रीपदासाठी फोन 

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती

 पंकज भोयर हे वर्धा मतदारसंघाचे आहेत आमदार

सलग तीन वेळा आमदार म्ह्णून निवडून येण्याचा बहुमान

तरुण आमदार म्हणून ओळख

शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी

Dec 15, 2024 09:04 (IST)

BJP Minister List: फोन फिरले, मंत्रिपदाची लॉटरी लागली; भाजपकडून नेत्यांना संपर्क

नागपूरमध्ये आज राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून आता नव्या मंत्र्यांना शपथविधीसाठी फोन केले जात आहेत. भाजपकडून नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, शिवेंद्रराजे भोसले यांना फोन करुन शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. 

Dec 15, 2024 08:51 (IST)

Nagpur Crime: बेपत्ता पोलीस शिपायाचा मृतदेह सापडला

बेपत्ता जी आर पी पोलिस शिपाई 36 वर्षीय रोशन गिरीपुंजे याचा मृतदेह नागपूर उमरेड मार्गावर सापडला आहे. मृतदेह विहीरगावाजवळ झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली आहे. रेल्वे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात कामावर असलेला आणि गेल्या आठवड्यात अचानक बेपत्ता झालेल्या रोशन याच्या मोबाईल फोनचे अखेरचे लोकेशन मध्य प्रदेशात आढळल्याने तपासाची चक्रे त्या दिशेने फिरली असताना आता मृतदेह सापडल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Dec 15, 2024 08:37 (IST)

Shivsena Shinde Group Minister List: शिंदेंसेनेचे 8 मंत्री ठरले! अंतिम यादी समोर; तिघांचा पत्ता कट?

शिवसेना शिंदे गटाच्या आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची फायनल यादी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे,  उदय सामंत, संजय राठोड, संजय शिरसाट,  भरत गोगावले, शंभुराजे देसाई यांच्यासह  राज्यमंत्री म्हणून आशिष जैस्वाल , योगेश कदम शपथ घेणार आहेत. या यादीमध्ये, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांची नावे नाहीत, त्यामुळे या तिघांचा पत्ता कट झाल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. 

Dec 15, 2024 08:33 (IST)

Bhandara News: भंडाऱ्या जिल्ह्यात वर्षभरात रेतीचोरीचे 286 गुन्हे

जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा,चुलबंद, बावणथडी आणि सूर या नद्यांमधील दर्जेदार आणि चमकदार रेतीचे रेतीतस्करांना मोठे आकर्षण आहे. या रेतीच्या दर्जामुळे विदर्भाबाहेर आणि लगतच्या राज्यातही मोठी मागणी आहे. यातूनच फोफावलेल्या रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या ११ महिन्यांच्या काळात राबविण्यात आलेल्या मोहिमेत ५८३ आरोपींविरुद्ध २८६ रेतीचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. रेती आणि वाहनांसह ४८ कोटी ४४ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान ही मोहीम पुन्हा अधिक कडक केली जाणार असल्याचा निर्धार पोलिस विभागाने व्यक्त केला आहे.

Dec 15, 2024 08:32 (IST)

Washim News: संजय राठोड यांच्या मंत्रीपदासाठी महंतांची महत्त्वपूर्ण बैठक

पोहरादेवी येथील धर्मपीठावर आमदार संजय राठोड यांच्या मंत्रीपदासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत बंजारा समाजाचे संत, महंत, आणि धर्मगुरू मोठ्या प्रमाणावर उपस्थित असून, त्यांच्या मागणीला बळ देण्यासाठी सर्व एकवटले आहेत.

बैठकीत धर्मगुरू बाबुसिंग महाराज, जितेंद्र महाराज, कबीरदास महाराज आणि इतर महत्त्वाचे महंत सहभागी झाले आहेत.आज महंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद देण्याची ठाम मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Dec 15, 2024 08:31 (IST)

Bhandara News: धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आ. परीणय फुके यांच्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोर्टलवरील नोंदणीसाठी दि. १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नोंदणी केंद्रावरील गर्दीमुळे नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. शेतकरी धान खरेदी नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी आमदार परीणय फुके यांनी मागणीची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिवांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शेतकरी नोंदणीकरीता मुदतवाढ देण्यात आली.

Dec 15, 2024 08:30 (IST)

NIA Raid: अमरावतीमधील NIAची चौकशी संपली

NIA च्या पथकाकडून अमरावतीमधील त्या २३ वर्षीय संशयित युवकाची तीन दिवसांपासून सुरू असलेली चौकशी अखेर संपली..

NIA चं पथकाने त्या संशयित युवकाला कल रात्री सोडून दिल.

तीन दिवसांपासून संशयित युवकाची एनआयएच्या पथकाकडून सुरू होती कसून चौकशी...

देश विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांशी संशयित युवकाचा फोन कॉल करून संबंध आल्याच्या संशयावरुन NIA नं घेतलं होतं ताब्यात....

गुरुवारच्या मध्यरात्री अमरावतीच्या छाया नगरातून घेतलं होतं या तरुणाला ताब्यात..

एकाच दिवशी एनआयएने राज्यात छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि भिवंडीमध्ये टाकल्या होत्या धाडी...