Maharashtra Budget 2026 CM Devendra Fadnavis 10 Big Announcement: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडत आहेत. या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भव्य स्मारक ते शेतकरी, तरुण युवा वर्गासाठी सर्वात मोठ्या घोषणा केल्या. जाणून घ्या आजच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा...
अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाच्या 10 घोषणा!
- अजित पवारांच्या सन्मानार्थ घोषणा: अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणार, अजितदादांचं भव्य स्मारक उभारणार
- तीर्थक्षेत्र विकास: संत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र विकास तसेच देहू विकास आराखड्याची घोषणा, महाड इथे चौदार तळे इथे पायाभूत सुविधानसाथी विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. 2026-27 हे वर्ष सामाजिक समता म्हणून साजरा करता येणार
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना: 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी योजना जाहीर: या योजनेनुसार जे शेतकरी कर्ज घेऊन नियमितपणे परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
- मेट्रो आणि द्रुतगती मार्ग: राज्यात १,२०० किमीचे मेट्रो जाळे आणि ६,००० किमीचे द्रुतगती मार्ग तयार केले जातील. मुंबई-पुणे भुयारी मार्गाच्या कामाला वेग येईल.
- तिसरी, चौथी मुंबई (वाढवण): वाढवण येथे चौथी मुंबई वसवली जाणार असून, यामुळे पालघर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलेल. तसेच तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले
- १० लाख घरे, बांबु विकास योजना: एमएमआर क्षेत्रात सामान्यांसाठी १० लाख नवीन घरांची निर्मिती केली जाईल. पन्नास हजार कोटींच्या गुंतवणुकीतून महाराष्ट्र बांबू विकास प्रकल्प राबवला जाईल.
- ग्रामसडक योजना टप्पा ३: ग्रामीण भागात २३ हजार किमीचे रस्ते आणि पूल बांधले जातील.
- बुलेट ट्रेन २०२७: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ५ स्थानके २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय आहे.
- ॲनिमेशन आणि गेमिंग हब: पुणे हे देशातील 'जीसीसी'साठी आवडीचे शहर ठरत आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात २९५पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ४ लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे
- शेतपाणंद रस्ते योजना: शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद योजना' सुरू होणार.
- पशूधन उद्योजक योजना: ग्रामीण भागात रोजगारासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजक योजना राबवली जाईल.
- ग्रीन फील्ड विकास: रायगड, पेण आणि नवी मुंबई विमानतळ परिसराचा 'ग्रीन फील्ड' म्हणून विकास होणार.