राज्याला मिळाले 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 तहसीलदार; तुमच्या तालुक्याचे नाव आहे का? एकदा वाचाच!

Maharashtra Cabinet Decision: राज्यातील महसूल विभागाचा वाढता व्याप आणि लोकसंख्येचा विचार करून राज्य मंत्रिमंडळाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Maharashtra Cabinet Decision: नवीन कार्यालयांची निर्मिती करताना सरकारने काही विशिष्ट निकष लावले आहेत.
मुंबई:

Maharashtra Cabinet Decision : राज्यातील महसूल विभागाचा वाढता व्याप आणि लोकसंख्येचा विचार करून राज्य मंत्रिमंडळाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत यासाठी राज्यात 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये आणि 69 अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची निर्मिती केली जाणार आहे. 

या निर्णयामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा किंवा तालुका मुख्यालयापर्यंत जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट कमी होणार असून, प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख होणार आहेत.

प्रशासकीय विकेंद्रीकरणावर भर

राज्यातील अनेक जिल्ह्यांचा भौगोलिक विस्तार मोठा आहे, तसेच काही तालुके जिल्हा मुख्यालयापासून अत्यंत दूर अंतरावर आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे महसूल विभागावर कामाचा मोठा ताण येत होता. हा ताण कमी करण्यासाठी महसूल विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. 

यामध्ये प्रामुख्याने पुणे विभागात 3 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे निर्माण केली जाणार असून, इतर विभागांमध्ये प्रत्येकी 1 पद असेल. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील बारामती येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, तर चाकण येथे अतिरिक्त तहसीलदार कार्यालय सुरू होणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : MHADA Lottery: लकी ड्रॉ नाही, आता डायरेक्ट घर! म्हाडाची मुंबईकरांसाठी मोठी ऑफर, 'या' पद्धतीनं करा लगेच बुक )

कार्यालय निर्मितीचे निकष

नवीन कार्यालयांची निर्मिती करताना सरकारने काही विशिष्ट निकष लावले आहेत. यामध्ये संबंधित क्षेत्रातील तालुक्यांची संख्या, एकूण लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, आदिवासी आणि दुर्गम भागातील जनतेची गरज यांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.

 जिल्हा मुख्यालयापासून प्रस्तावित कार्यालयाचे अंतर आणि तालुक्यातील सर्वात दूरच्या गावाची स्थिती लक्षात घेऊन हे निर्णय घेण्यात आले आहेत. अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांसाठी महसूल मंडळांची संख्या आणि गावांमधील अंतर यावर भर देण्यात आला आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: 100 कुटुंबांचा संसार उघड्यावर येणार? KDMC च्या एका चुकीच्या निर्णयामुळे डोंबिवलीत संतापाची लाट )
 

प्रस्तावित अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये

राज्यातील वेगवेगळ्या विभागांमध्ये खालील ठिकाणी ही नवीन कार्यालये सुरु होतील.

पुणे विभाग: बारामती (पुणे), फलटण (सातारा), पंढरपूर (सोलापूर).
कोकण विभाग: कल्याण (ठाणे), दापोली (रत्नागिरी).
नाशिक विभाग: चाळीसगाव (जळगाव).
छत्रपती संभाजीनगर विभाग: किनवट (नांदेड).
अमरावती विभाग: अचलपूर (अमरावती), पुसद (यवतमाळ), खामगाव (बुलडाणा).
नागपूर विभाग: कळमेश्वर (नागपूर).

Advertisement

महत्त्वाची अतिरिक्त तहसीलदार कार्यालये आणि गावे

राज्यात एकूण 69 अतिरिक्त तहसीलदार कार्यालये निर्माण होणार आहेत. ही सर्व कार्यालयं खालीलप्रमाणे आहेत. 

कोकण विभाग

ठाणे जिल्हा: ठाणे - नवीन मुंबई, कल्याण - डोंबिवली, भिवंडी - भिवंडी (ग्रामीण).
मुंबई उपनगर: कुर्ला - चेंबूर, बोरिवली - मालाड, अंधेरी - वांद्रे.
पालघर जिल्हा: डहाणू - कासा, वसई - विरार, पालघर - बोईसर.
रत्नागिरी जिल्हा: राजापूर - रायपाटण.

पुणे विभाग

पुणे जिल्हा: खेड - चाकण.
सातारा जिल्हा: फलटण - साखरवाडी, कराड - उंब्रज.
सोलापूर जिल्हा: उत्तर सोलापूर - वडाळा.
कोल्हापूर जिल्हा: चंदगड - नजरे कार्वे.

Advertisement

नाशिक विभाग

नाशिक जिल्हा: निफाड - लासलगाव, सिन्नर - सिन्नर, बागलाण - नामपूर.
जळगाव जिल्हा: जळगाव - जळगाव, जामनेर - शेंदुर्णी, चाळीसगाव - चाळीसगाव.
नंदूरबार जिल्हा: नंदूरबार - नंदूरबार, शहादा - शहादा, अक्कलकुवा - मोलगी.
धुळे जिल्हा: शिरपूर - शिरपूर शहर.
अहमदनगर जिल्हा: अकोले - राजूर, नेवासा - घोडेगाव.

छत्रपती संभाजीनगर विभाग

छत्रपती संभाजीनगर जिल्हा: सिल्लोड - अजिंठा.
बीड जिल्हा: बीड - नेकनूर, आष्टी - कडा.
जालना जिल्हा: जालना शहर आणि राजूर.
परभणी जिल्हा: परभणी - परभणी, जिंतूर - बोरी.
लातूर जिल्हा: लातूर - लातूर.
नांदेड जिल्हा: नांदेड - नांदेड, हदगाव - तामसा, मुखेड - मुक्रमाबाद, किनवट - इस्लापूर.

अमरावती विभाग

अमरावती जिल्हा: अमरावती - अमरावती (ग्रामीण).
अकोला जिल्हा: अकोला - अकोला (शहर).
यवतमाळ जिल्हा: पुसद - शेंबाळ पिंपरी, उमरखेड - ढाणकी.
बुलडाणा जिल्हा: सिंदखेड राजा - साखरखेडा, मेहकर - डोणगाव, खामगाव - लाखनवाडा.
वाशीम जिल्हा: वाशीम - अनसिंग, रिसोड - केनवड, कारंजा - कामरगाव.

नागपूर विभाग

नागपूर जिल्हा: नागपूर (ग्रामीण) - बुटीबोरी आणि हुडकेश्वर, हिंगणा - वानाडोंगरी, नागपूर - नागपूर (शहर), कामठी - वडोदा, सावनेर - खापरखेडा, काटोला - कोंढाळी, नरखेड - जलालखेडा, मौदा - कोदांमेढी, कुही - वेलतूर.
वर्धा जिल्हा: हिंगणघाट - अल्लीपूर, सेलू - सिंदी.
भंडारा जिल्हा: पवनी - अड्याळ.
गडचिरोली जिल्हा: चामोर्शी - आष्टी, कुरखेडा - मालेवाडा, आरमोरी - वैरागड, धानोरा - पेंढारी, सिरोंचा - आसरअल्ली, एटापल्ली - कसनसूर, अहेरी - जिमलगट्टा.