राहुल कांबळे, नवीन मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या (NMMC) कोव्हीड-19 नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 5 जून 2025) रोजी शहरात 52 नागरिकांची कोव्हीड चाचणी करण्यात आली. त्यापैकी 4 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या वाढीव रुग्णसंख्येमुळे शहरातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. सध्या 16 रुग्णांनी कोरोनामुक्ती मिळवली असून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये चार हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वाढ तयार करण्यात आले आहेत.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार:
आर.टी.पी.सी.आर. चाचण्या: 36
एकूण आर.टी.पी.सी.आर. चाचण्या (आतापर्यंत): 24916
रॅपिड अँटिजन चाचण्या: 16
एकूण रॅपिड अँटिजन चाचण्या (आतापर्यंत): 46
आज 5जून पर्यंत एकूण कोव्हीड चाचण्या: 52
एकूण कोव्हीड चाचण्या (महापालिका व खासगी मिळून): 295
( नक्की वाचा : भारताचा जल प्रहार : वाढता उन्हाळा, सिंधूमधील पाणी कमी, पाकिस्तानवर येणार भयंकर संकट!)
कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाची काळजी:
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे
वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर
लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घेणे
लसीकरण पूर्ण असले तरी काळजी घेणे आवश्यक
या गोष्टी करु नका!
अफवा पसरवणे
लक्षणे असतानाही चाचणी टाळणे
मास्क शिवाय वावरणे
इतरांच्या संपर्कात येताना निष्काळजीपणा
( नक्की वाचा : भारताचा जल प्रहार : वाढता उन्हाळा, सिंधूमधील पाणी कमी, पाकिस्तानवर येणार भयंकर संकट!)
NMMC कडून जनजागृतीची मोहिम सुरू
दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पुढील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे महापालिका सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत असून, अधिकृत वेबसाईट, फेसबुक आणि ट्विटर हँडल्सवरून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी म्हटले की, "सद्यस्थितीत कोविडचा धोका कमी असला तरी नागरिकांनी गाफील राहू नये. आवश्यक काळजी घेतल्यास संसर्ग टाळणे शक्य आहे.