Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीतून 94 हजार नावे वगळली; तुमचं नाव यादीत आहे का? 'या' पद्धतीनं करा चेक

Maharashtra Farmer Loan Waiver Eligible List: शेतकरी कर्जमाफी योजनेत तुमचं नाव आहे की नाही? हे कसं चेक करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Maharashtra Farmer Loan Waiver Eligible List: तुमचं नाव या यादीत आहे की कट झालंय, हे वेळेत तपासणं आवश्यक आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Maharashtra Farmer Loan Waiver Eligible List: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची छाननी पूर्ण केली असून यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कडक तपासणीनंतर तब्बल 94 हजार शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरवत थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दुसरीकडे, पात्र ठरलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. तुमचं नाव या यादीत आहे की कट झालंय, हे वेळेत तपासणं आता प्रत्येकासाठी गरजेचं बनलं आहे.

सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 (Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojna 2026) अंतर्गत पात्र ठरलेल्या 16.94 लाख शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 7000 कोटी रुपयांची अवाढव्य रक्कम 4 ऑगस्ट रोजी वर्ग केली जाणार आहे. ही रक्कम जमा होताच शेतकऱ्यांचं जुनं थकीत कर्ज पूर्णपणे माफ होणार असून, त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज मिळण्याचा मार्ग अगदी सोपा होणार आहे.

Advertisement

94 हजार शेतकरी का ठरले अपात्र?

 राज्य सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या सर्व अर्जदार शेतकऱ्यांची माहिती थेट प्राप्तिकर (Income Tax) विभागाकडे पडताळणीसाठी पाठवली होती. या प्रक्रियेत सुमारे 94 हजार शेतकरी नियमितपणे इन्कम टॅक्स भरत असल्याचं समोर आलं. योजनेच्या नियमानुसार करदाते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकत नाहीत. त्यामुळे पारदर्शकता राखण्यासाठी या सर्वांची नावे लाभार्थी यादीतून थेट वगळण्यात आली आहेत.

( नक्की वाचा : आता शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् कर्ज चुकवण्याची अटही संपली; वाचा नव्या निर्णयाची A to Z माहिती )

योजनेचा लाभ कोणाला आणि किती मिळणार?

राज्यातील गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमुक्तीचे निकष स्पष्ट केले आहेत. त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पूर्ण कर्जमाफी दिली जात आहे. तसेच, जे शेतकरी वेळेवर आणि नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करत आहेत, त्यांना प्रोत्साहन म्हणून 50000 रुपये दिले जाणार आहेत. 

एखाद्या शेतकऱ्यावर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असेल, तर 2 लाख रुपयांवरील अतिरिक्त रक्कम बँकेत भरताच सरकार आपल्या वाट्याचे 2 लाख रुपये खात्यात जमा करून कर्ज पूर्णपणे माफ करेल.

लाभार्थी यादीत असं तपासा तुमचं नाव ( How to check farmer loan waiver list )

सरकारने पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी सहकार विभाग आणि महाआयटी (MahaIT) पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. यादीत नाव आहे की नाही, हे पाहण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करता येईल.

( नक्की वाचा : तुकाराम मुंढेंच्या FDA चा दुटप्पीपणा कोर्टात उघडा! दुटप्पी कारभारावर उच्च न्यायालयाचा चाबूक, काय झाली चूक? )
 

ऑनलाईन नाव कसं चेक करणार? (How to check farmer loan waiver list online)

  • सर्वात आधी राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या किंवा MahaIT च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
  • होमपेजवर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लाभार्थी यादी या लिंकवर क्लिक करा.
  • तुमच्या क्षेत्रांनुसार जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  • तुमचं नाव टाकून सबमिट करा, त्यानंतर संपूर्ण गावाची यादी स्क्रीनवर दिसेल.

ऑफलाइन पद्धत अशी आहे (How to check farmer loan waiver list offline)

  • ज्या राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून कर्ज घेतले होते, तिथे जाऊन फलकावर लावलेली गावाची यादी पाहू शकता.
  • जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा CSC सेंटरवर जाऊनही नावाची पडताळणी करता येईल.
  • कर्जमाफीची ही रक्कम थेट डीबीटी (DBT) द्वारे बँक खात्यात पाठवली जाणार आहे. यासाठी बँक खात्याचे आधार ई-केवायसी (Aadhaar EKYC) आणि एग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण असणे बंधनकारक आहे.