Islampur is now Ishwarpur: राज्यातील आणखी एका शहराचं नाव बदललं, इस्लामपूर झाले ईश्वरपूर

Islampur is now Ishwarpur: सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर या गावाचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
Islampur is now Ishwarpur: फडणवीस सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतची घोषणा केली.
मुंबई:

Islampur is now Ishwarpur: सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर या गावाचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे आता इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर झाले आहे. 

राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला असून याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडं मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करावे ही हिंदुत्ववादी संघटना तसंच त्या शहरातील नागरिकांची सातत्यानं मागणी होती. ती मागणी सरकारनं मान्य केली आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये शहराचं नाव बदलण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे ठेवण्यात आले. तसंच उस्मानबादचे नाव धाराशिव आणि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर ठेवण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Awhad Vs Padalkar: विधीमंडळातील राड्याचे सभागृहात पडसाद, विधानसभा अध्यक्षांनी दिला मोठा आदेश! )

Topics mentioned in this article