आता इमर्जन्सीमध्ये रक्तासाठी धावाधाव करावी लागणार नाही, 'संजीवनी' अ‍ॅप दूर करेल सगळा मनस्ताप

Maharashtra Blood Donor App: अपघात, शस्त्रक्रिया, गरोदर माता, थॅलेसेमिया, कर्करोग आणि अन्य गंभीर आजार झालेल्या रुग्णांना अनेकदा रक्ताची तातडीची गरज भासते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Maharashtra Blood Donor App: अपघातात, शस्त्रक्रियेत किंवा गंभीर आजारांमुळे अनेकवेळा रक्ताची तातडीची गरज भासते. पण वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे अनेकांच्या जीव संकटात सापडतो.  निरपराध जीव धोक्यात येतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एका ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. रक्ताची गरज असणारे, रक्तपेढ्या आणि रक्तदाते यांच्यात समन्वय साधण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे.  या ॲपमध्ये अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे रक्ताची गरज असलेल्यांना थेट मदत होते. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या ॲपचा शुभारंभ करण्यात आला. 

नक्की वाचा: एका सेकंदात बनेल तुमचं ट्रेंडिंग 3D मॉडेल, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

हे ॲप कसे काम करते?

या ॲपसोबत महाराष्ट्रातील बहुसंख्य ब्लड बँकां जोडल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय या ॲपशी राज्यभरातील बरेच रक्तदाते संलग्न होत असून, या रक्तदात्यांनी ॲपमध्ये आपल्या नावाची नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे. एखाद्याला रक्ताची गरज भासल्यास, तो हे ॲप वापरू शकतो. यासाठी त्याला लॉग इन करण्याची गरज नसते. ‘गेस्ट' म्हणून ते ॲपचा वापर करून आपली रक्ताची गरज सांगू शकतात. मागणी आल्यानंतर, ती सगळ्या ब्लड बँकना नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येते. रक्त उपलब्ध असल्यास ब्लड बँक लगेचच त्याचा पुरवठा करतात. नसल्यास, डोनर्सना नोटिफिकेशन जाते. ब्लड ग्रुप आणि डोनरच्या उपलब्धतेनुसार, तो आपली इच्छा प्रकट करतो आणि त्याचे रक्त घेऊन गरजूंपर्यंत पोहोचवले जाते.

या ॲपसाठी फी द्यावी लागते का ?

अपघात, शस्त्रक्रिया, गरोदर माता, थॅलेसेमिया, कर्करोग आणि अन्य गंभीर आजार झालेल्या रुग्णांना अनेकदा रक्ताची तातडीची गरज भासते. रक्तदाता आणि ब्लड बँका यांच्यात अनेकदा संपर्क होऊ शकत नाही ज्यामुळे अनेकवेळा वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही, ज्यामुळे रुग्णांचे प्राण कंठाशी येतात.  या समस्येवर मात करण्यासाठीच हे ॲप एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. हे ॲप ‘गुगल प्ले'वरून ‘संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री ॲप' (SANJIVANI BLOOD GROUP REGISTRY APP) या नावाने उपलब्ध असून ते निशुल्क असल्याची माहिती देण्यात आली आहे.  

नक्की वाचा: दूध आणि मध एकत्रित प्यायल्यास काय होईल? शरीरातील या समस्यांमध्ये दिसेल का फरक

आरोग्यमंत्र्यांनी केले कौतुक

या ॲपच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी म्हटले की,  “एनजीओ आणि सीएसआर यांची मदत घेऊन सामाजिक कार्य कसे बळकट होऊ शकते, याचा एक उत्तम आदर्श या उपक्रमाद्वारे घालून देण्यात आला आहे. राज्यातील 18 ते 65 वयोगटातील जास्तीत जास्त लोकांनी रक्तदाते म्हणून पुढे यावे आणि या ॲपवर आपले नाव नोंदवावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. या ॲपची संकल्पना ‘वोक्हार्ट फाऊंडेशन'ची आहे. एलआयसी हौसिंग फायनान्सने या ॲपला अर्थबळ दिले आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article