How To Find Your Name In Voter List: तुमचे नाव मतदार यादीत आहे का ? या वेबसाईटवर मिळेल सगळी माहिती

Local Body Elections 2025: मतदार यादीत नाव तपासण्यासाठी, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत) मतदान करणार असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या निवडणुकांसाठीची प्रारूप मतदार यादी आता प्रसिद्ध झाली असून, त्यात तुमचे नाव तपासणे खूप सोपे झाले आहे.राज्य निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबर 2025 रोजी ही प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीतील तुमचे नाव तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तपासता येईल. ऑनलाईन पद्धतीने नाव तपासता यावे यासाठी https://mahasecvoterlist.in/  या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता. 

नक्की वाचा: जिल्हा परिषद आरक्षण सोडतीची तारीख जाहीर, तुमच्या पंचायत समितीची सोडत कुठे होणार ? वाचा संपूर्ण यादी

मतदार यादीत नाव तपासण्याची प्रक्रिया

राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी केला जात आहे. त्या आधारे तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय; तसेच नगरपरिषद/ नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची लिंक (दुवा) राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahasec.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. 

मतदार यादीत ऑफलाइन नाव कसे तपासाल ? 

जिल्हा परिषद  व पंचायत समितीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध असेल. त्याचबरोबर नगरपरिषद व नगरपंचायतीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतीच्या कार्यालयात उपलब्ध असेल. जिल्हा परिषद/ पंचायत समित्या, नगरपरिषदा/ नगरपंचायती इत्यादींच्या मतदार यादीसाठी प्रतिपृष्ठ दोन रुपयेप्रमाणे शुल्क भरावे लागेल.

नक्की वाचा: PCMC च्या अंतिम प्रभाग रचनेला आयोगाची मान्यता, वाचा 3 महत्त्वाचे बदल

मतदार यादीची पीडीएफ कशी मिळवाल ?

प्रारूप आणि अंतिम मतदार यादीची विनाछायाचित्राची पीडीएफ प्रत तुम्हाला https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist या संकेतस्थळावर मोफत डाउनलोड करता येईल.