15 hours ago

Maharashtra Live Bog: राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. 

Aug 06, 2025 20:49 (IST)

Live Update: पुणे महानगरपालिका कर्मचारी करणार काम बंद आंदोलन

पुणे महानगरपालिका कर्मचारी करणार काम बंद आंदोलन 

उद्या एक तास पुणे मनपा कर्मचारी आणि अधिकारी करणार काम बंद आंदोलन 

आज पुणे महानगरपालिकेच्या आवारात झालेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ करणार काम बंद आंदोलन 

आज पुणे मनपाच्या आयुक्तांची बैठक सुरू असताना मनसे कार्यकर्ते आत घुसले आणि अरेरावी केल्याचा आरोप पुणे मनपा आयुक्तांनी केला आहे 

तर दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे की पुणे मनपा आयुक्तांनी त्यांच्यावर दमबाजी केली  

मनसे कार्यकर्त्यांनुसार ते आज आयुक्त बंगल्यामध्ये झालेल्या कथित चोरीचा जाब विचारण्यासाठी आले होते

Aug 06, 2025 20:15 (IST)

Live Update: हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता होणार, भास्कर जाधवांनी केलं स्पष्ट

सरकार लवकरच आपलं येणार, मी मंत्री होणार असं भास्कर जाधव म्हणाले आहेत. शिवाय मंत्री जरी नाही झालो, तरी येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये विरोधी पक्षनेता होणार आहे असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. 

Aug 06, 2025 18:32 (IST)

ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांचा उपनेतेपदाचा राजीनामा

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत काल विठ्ठल मोरे यांनी उपस्थिती लावली होती त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी राजीनामा.

Aug 06, 2025 18:31 (IST)

जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत पाण्याची गळती

जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत पाण्याची गळती 

वेरूळमधील ३२ क्रमांकाच्या लेणीत पाण्याची गळती

पाण्याच्या गळतीमुळे नवव्य शतकातील पेंटिंग धोक्यात 

वेरूळ लेणी संकुल हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आहे

वेरूळमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध लेण्या पाहायला मिळतात

जैन लेणी क्रमांक ३२ मध्ये पाण्याची गळती

Advertisement
Aug 06, 2025 18:30 (IST)

Live Update: ठाकरे बंधूंची निवडणुकीसाठी पहिली युती जाहीर

ठाकरे बंधूंची निवडणुकीसाठी पहिली युती जाहीर, 18 ऑगस्टला बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र लढणार

Aug 06, 2025 11:09 (IST)

LIVE Updates: * नाशिकमध्ये किरकोळ कारणावरून भाजपच्या माजी नगरसेवकाची गुंडगिरी

* नाशिकमध्ये किरकोळ कारणावरून भाजपच्या माजी नगरसेवकाची गुंडगिरी 

* गाडीचा कट लागल्याने भाजपाचे माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी थेट पिस्तुल रोखल्याचा आरोप

* जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा दुचाकीचालक शिक्षकाचा आरोप

* पीडित शिक्षक तरुणाने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली दाखल 

- तपासाअंती पुढील कारवाई केली जाईल असे पोलीसांचे स्पष्टीकरण

Advertisement
Aug 06, 2025 09:46 (IST)

LIVE Updates: एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकाळी साडे बारा वाजता भेटण्याची शक्यता

अमित शाह यांना संसदेतील कार्यालयात भेटणार असल्याची सूत्रांची माहिती

पंतप्रधान यांच्या भेटीनंतर अमित शाह यांच्यासोबत होणार भेट

Aug 06, 2025 09:30 (IST)

LIVE Update: जैन समाजाचं आजचं कबुतरखाना परिसरात होणारं आंदोलन/सभा रद्द

जैन समाजाचं आजचं कबुतरखाना परिसरात होणारं आंदोलन/सभा रद्द

उद्या उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने सुनावणीनंतर भूमिका घेऊन सभा घेऊ 

जैन समाजातील नागरिकांची प्रतिक्रिया 

आम्ही कायद्याचे पालन करणार, जैन समाजातील नागरिकांची प्रतिक्रिया

Advertisement
Aug 06, 2025 09:10 (IST)

Kolhapur News: कोल्हापुरात गणेशोत्सवात लेसर लाइटच्या वापरावर बंदी

कोल्हापुरात गणेशोत्सवात लेसर लाइटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरच्या दरम्यान होत असलेल्या गणेशोत्सवात गणेशमूर्ती आगमन, घरगुती गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक, तसेच इतर कार्यक्रमांदरम्यान हा लेसर लाईटचा नियम लागू असेल. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा आदेश दिले असून, हा नियम मोडल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.लाइट्स आणि ध्वनियंत्रणा पुरविणाऱ्या संघटनेसही पोलिसांनी बंदी आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Aug 06, 2025 06:59 (IST)

LIVE Updates: नांदेडचे सर्व भाविक सुखरूप , प्रशासन संपर्कात

नांदेडहून उतराखंडला गेलेले सर्व भाविक सुखरूप असुन प्रशासन त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यानी दिली ... बिलोली तालुक्यातील दौंडगाव येथील तीन कुटूंब उतराखंडला गेलेले आहेत ... व्हिडियो पाठविणाऱ्या सचिन पत्तेवार सोबत प्रशासनाने संपर्क केला आहे ... सर्व जण सुरक्षित स्थळी आहेत .. उद्या त्यांचा प्रवास सूरू होणार आहे . रस्ते देखील खुले होणार आहेत .. चिंता करण्यासारखी परिस्तिथी नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले .

Aug 06, 2025 06:58 (IST)

LIVE Updates: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी इस्लामपुरात मुंडन आंदोलन

सांगलीच्या इस्लामपूर मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या मागणीसाठी मुंडन आंदोलन करण्यात आले आहे.अण्णाभाऊ साठेंचा जन्मगाव वाळवा तालुक्यातील वाटेगाव असून देखील तालुक्याचे मुख्य ठिकाणी असणाऱ्या इस्लामपूर येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे

Aug 06, 2025 06:58 (IST)

 नाशिकच्या अभोणा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे विहिरीत पडलेल्या तरुणाचा जीवदान मिळाल्याची घटना नाशिकच्या कळवणमध्ये दादा धुमसे यांच्या मालकीच्या विहिरीत सप्तशृंग गडावरील रहिवाशी रामदास सूर्यवंशी विहिरीत पडल्याची माहिती पोलिसात पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी वडाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने सूर्यवंशी यांना सुखरूप बाहेर काढले त्याला हाताला व डोक्याला दुखापत झाली आहे.जखमी तरुणावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Aug 06, 2025 06:57 (IST)

LIVE Update: अज्ञातांनी कांदा चाळीला लावली आग,नाशिकच्या निफाडमधील संतापजनक प्रकार

अज्ञात व्यक्तीने  शेतातील चाळ पेटवून दिल्याने  चाळीत साठवून 700 क्विंटल कांदा जळून खाक झाल्याचा संतापजनक नाशिकच्या निफाडमध्ये घडला.त्यामुळे शेतकरी गोपाळराव गाजरे यांना मोठा आर्थिक फटका बसला असून,

मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण तसेच सोसायटीच कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे शासनाने मदतीचा  देऊन आरोपीचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Aug 06, 2025 06:57 (IST)

LIVE Update: पोलिस स्थानकात दोन गट एकमेकाला भिडले

कळवणच्या अभोण्यात मागील भांडणाची कुरापतीवरून दोन गटात झालेल्या मारहाण व वाहनाच्या काचा फोडल्याच्या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी पोलिस स्थानकात आलेले दोन्ही गट पुन्हा एकामेकाला भिडले आणि चक्क पोलिस स्थानकात तुंबळ हाणामारी सुरू झाली. हाणामारीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.पोलिसांनी दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहे. 

Aug 06, 2025 06:56 (IST)

LIVE Update: पोलिस स्थानकातून पळाला संशयित चोर

मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेला नवनाथ पवार संशयित चोर चक्क पोलिस स्थानकातून फरार झाल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या छावणी पोलिस स्थानकात घडल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली.दरम्यान पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून फरार चोराला पुन्हा लोढा मार्केट परिसरातून ताब्यात घेतले.त्याच्यावर 10 ते 12 मोटारसायकल चोरी केल्याचा आरोप आहे... या घटनेने पोलिस ठाण्यातून चोर फरार झाल्याची मालेगावात जोरदार चर्चा सुरू होती..

Aug 06, 2025 06:55 (IST)

LIVE Update: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गोव्यात महाअधिवेशन

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे १० वे अधिवेशन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इन्डोअर स्टेडियम युनिव्हर्सिटी गोवा येथे ७ ऑगस्ट ला होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सह उद्घाटक आहेत, प्रमुख पाहुणे म्हणून हंसराज अहिर, चेअरमन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, नवी दिल्ली, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे महाराष्ट्र, ओबीसी मंत्री अतुल सावे  उपस्थित राहणार आहे. यासह विविध प्रलंबित मागण्या या अधिवेशनात करण्यात  ठराव  घेण्यात येतील. अधिवेशनाला ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केले आहे.

Aug 06, 2025 06:47 (IST)

LIVE Update: आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही: मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षण लढ्यातील विजया शिवाय फेटा बांधणार नाही मनोज जरांगे पाटील यांची भूमिका 

धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फेटा बांधण्याचा आग्रह, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून फेटा बांधण्यास नकार 

29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सक्रिय सहभाग घेणार 

मनोज जरांगे पाटील यांचा धाराशिवमध्ये गाठीभेटी दौरा , मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय सहभाग घेणार असल्याचं आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलं 

महाविकास आघाडी आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असेल आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलं

Aug 06, 2025 06:46 (IST)

LIVE Update: पोलिसांच्या तत्परता व धाडसाने वाचले तरुणाचे प्राण

नाशिकच्या अभोणा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे विहिरीत पडलेल्या तरुणाचा जीवदान मिळाल्याची घटना नाशिकच्या कळवणमध्ये दादा धुमसे यांच्या मालकीच्या विहिरीत सप्तशृंग गडावरील रहिवाशी रामदास सूर्यवंशी विहिरीत पडल्याची माहिती पोलिसात पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी वडाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने सूर्यवंशी यांना सुखरूप बाहेर काढले त्याला हाताला व डोक्याला दुखापत झाली आहे.जखमी तरुणावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Aug 06, 2025 06:44 (IST)

LIVE Update: पोलिस स्थानकात दोन गट एकमेकाला भिडले

कळवणच्या अभोण्यात मागील भांडणाची कुरापतीवरून दोन गटात झालेल्या मारहाण व वाहनाच्या काचा फोडल्याच्या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी पोलिस स्थानकात आलेले दोन्ही गट पुन्हा एकामेकाला भिडले आणि चक्क पोलिस स्थानकात तुंबळ हाणामारी सुरू झाली. हाणामारीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.पोलिसांनी दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहे. 

Aug 06, 2025 06:43 (IST)

LIVE Update: पोलिस स्थानकातून पळाला संशयित चोर, मालेगावच्या छावणी पोलिस स्थानकातील घटना

मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेला नवनाथ पवार संशयित चोर चक्क पोलिस स्थानकातून फरार झाल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या छावणी पोलिस स्थानकात घडल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली.दरम्यान पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून फरार चोराला पुन्हा लोढा मार्केट परिसरातून ताब्यात घेतले.त्याच्यावर 10 ते 12 मोटारसायकल चोरी केल्याचा आरोप आहे... या घटनेने पोलिस ठाण्यातून चोर फरार झाल्याची मालेगावात जोरदार चर्चा सुरू होती..

Topics mentioned in this article