59 seconds ago

Maharashtra Local Body Election LIVE Updates: महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांसाठी आज मतदान पार पडेल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. या मतदानासाठी 17 हजार 367 कंट्रोल युनिट आणि 34 हजार 734 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही बळकट करावी, असं आवाहन निवडणूक आयोग तसेच राज्य सरकारने केले आहे.

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. (Nagar Parishad Nagar Panchayat Election 2025)  संपूर्ण निवडणूक प्रकियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आली आहे असे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. त्यात एकूण 17 हजार 367 कंट्रोल युनिट; तर 34 हजार 734 बॅलेट युनिटचा समावेश आहे.  सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात होईल, संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Dec 02, 2025 10:32 (IST)

Sambhajinagar Election LIVE Updates: छत्रपती संभाजीनगरमधील मतदानाची आकडेवारी समोर

संभाजी नगर मतदान टक्केवारी 7.30 to 9.30

कन्नड 9.88

सिल्लोड 12.96 

पैठण 8.26

वैजापूर 6.85

खुलताबाद 10.38 

गंगापूर 7 % 

जिल्ह्याची सरासरी  9.05 टक्के

Dec 02, 2025 10:30 (IST)

Pandharpur Election LIVE Updates: नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांनी बजावला मतदानाचा हक्क

पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रणिता भगीरथ भालके यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके पुत्र भगीरथ भालके त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पंढरपुरातील नगराध्यक्ष पदाच्या विजयाचा दावाही भालके यांनी केला आहे.

Dec 02, 2025 10:29 (IST)

Akluj Election LIVE Updates: आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

अकलूजमध्ये भाजपविरुद्ध मोहिते पाटील असा नगरपालिकेच्या निवडणुकीत संघर्ष आहे. या संपूर्ण निवडणुकीपासून अलिप्त राहणारे भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह पॅनल असूनही पक्षापासून रणजीतसिंह मोहिते पाटील दूर आहेत.  लोकसभा निवडणुकीनंतर आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील  भाजपात जरी असले तरी स्थानिक राजकारणात मात्र कुठेही ते सक्रिय होत नाहीत. परिणामी अकलूज मध्ये राम सातपुते विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष रंगत आला आहे.

Dec 02, 2025 10:26 (IST)

Yavatmal Local Body Election LIVE Updates: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान

 लोकशाहीतील कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत नवरदेवाने विवाहसोहळ्यापूर्वी नगर परिषद निवडणुकीत मतदान केल्याच यवतमाळच्या घाटंजी शहरात पहावयास मिळाली.नवरदेव नवनीत अनिल ढोणे यांनी प्रभाग क्रमांक एक मधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. नवरदेव नवनीत ढोणे हा बुक डेपो व्यवसायिक असून आज त्यांचा विवाह आहे. सुपूनाथ मंगलम घाटंजी येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान करीत नवरदेवाने दाखवलेली जागरूकता कौतुकास्पद ठरत आहे.

Advertisement
Dec 02, 2025 10:24 (IST)

Alandi Local Body Election LIVE Updates: आळंदीमधील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी

आळंदी नगरपरिषदेसाठी सर्वच पक्ष स्वबळावर लढत असून भारतीय जनता पक्षाने प्रशांत  कुऱ्हाडे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रकाश कुऱ्हाडे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली होती, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे, शिवसेना शिंदे गटाचे अतुल काळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Dec 02, 2025 10:22 (IST)

Akkalkot Election LIVE Updates: अक्कलकोट नगर परिषद निवडणूकीसाठी मतदाराजांचा उस्फुर्त प्रतिसाद

अक्कलकोट नगर परिषद निवडणूकीसाठी सकाळपासून मतदाराजांचा उस्फुर्त प्रतिसाद 

अक्कलकोटमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांनी बजावला मतदानाचा हक्क 

मिलन कल्याणशेट्टी यांनी प्रभाग क्रमांक 6 मध्ये बजावला मतदानाचा हक्क

Advertisement
Dec 02, 2025 10:21 (IST)

Solapur Local Body Election LIVE Updates: अक्कलकोटमध्ये मतदार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद

अक्कलकोट मध्ये मतदार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद 

अक्कलकोट मधील श्रीमंत राणी नित्मालाराजे कन्या प्रशालेत झाला वाद 

मतदान झाल्यानंतर मतदान केंद्र परिसरात थांबाण्यावरून सुरु होता वाद 

पोलीस संबंधित महिलेला मतदान केंद्रावरून बाहेर काढत असताना झाली वादाला सुरुवात

Dec 02, 2025 10:19 (IST)

Sindhudurga Local Body Election 2025 Update: सिंधुदुर्गात सकाळी 9.30पर्यंत 13.42% मतदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात सावंतवाडी नगरपरिषदसाठी 12.17 टक्के, मालवण 15.18 टक्के, वेंगुर्ला 10.51 टक्के आणि कणकवलीमध्ये 15.84 टक्के मतदान झाले आहे. तर या दोन तासात सरासरी 13.42 टक्के मतदान झाले आहे. 

Advertisement
Dec 02, 2025 10:15 (IST)

Jalgaon Local Body Election 2025 Update: जळगाव जिल्ह्यात 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 6.01 % मतदान

जळगाव जिल्ह्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान यावलमध्ये तर सर्वात कमी मतदान पाचोरामध्ये. 

Dec 02, 2025 10:14 (IST)

Pune Nagar Parishad Election 2025 Update: पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 8.37%मतदान

पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषद ,3 नगरपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात एकूण 8.37%मतदान

Dec 02, 2025 10:12 (IST)

Pandharpur Local Body Election 2025: पंढरपूर नगर पालिका निवडणुकीसाठी 5.35% मतदान

पंढरपूर नगर पालिका निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत 5.35 टक्के मतदान

Dec 02, 2025 10:10 (IST)

Solapur Local Body Election 2025: सोलापूर जिल्ह्यातल दूधनी येथे सर्वाधिक मतदान

  1. अक्कलकोट - 8.16%
  2. दूधनी -  13.13%
  3. मैंदर्गी - 11.27% 
  4. बार्शी - 7.34%
  5. मोहोळ - 9.32% 

Dec 02, 2025 10:09 (IST)

Sangli Local Body Election 2025: सांगलीत सकाळी 9.30 पर्यंत 9.48 टक्के मतदान

सांगली जिल्ह्यातील सहा नगरपरिषद व दोन नगरपंचायतीसाठी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत 9.48 टक्के मतदान झाले आहे. सांगली जिल्ह्यात उरुण ईश्वरपूर, विटा, तासगाव, आष्टा, पलूस, जत तर आटपाडी आणि शिराळा या ठिकाणी नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडत आहे.

Dec 02, 2025 10:08 (IST)

Lonavala Nagar Parishad Election Update: सकाळी 9.30 पर्यंत 9.68 टक्के मतदान

लोणावळा नगरपरिषदेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होत असून सकाळी 9.30 वाजेपर्यंत 9.68 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. 

Dec 02, 2025 10:04 (IST)

Wardha Local Body Election LIVE Updates: नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला

जिल्ह्यात विविध ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला

आपल्या परिवारासह उमेदवार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर उपस्थित होते

शिवसेना शिंदे गटाचे वर्धा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रावीकांत बालपांडे, काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर पांगुळ तसेच  भाजपचे निलेश किटे, शिवसेना शिंदे गटाच्या आर्वी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दीपाली।देशमुख यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 

Dec 02, 2025 10:02 (IST)

palghar local Body Election LIVE Updates: राजेंंद्र गावित यांनी बजावला मतदानाचा हक्क

 पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी भगिनी समाज  माध्यमिक विद्यालयामध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी आमदार राजेंद्र गावित यांनी मतदारांना घराबाहेर पडून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. त्याच सोबत जिल्ह्यात तीन नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीमध्ये आमच्याच पक्षाचे उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. 


Dec 02, 2025 09:58 (IST)

Dhule Local Body Election LIVE Updates: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानकेंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, शिरपूर नगरपरिषद आणि शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  या निवडणुकीत तीन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकूण 1 लाख 8 हजार 816 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. 

मतदानासाठी 129 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत मंत्री जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल आणि आमदार मंजुळा गावित यांच्या राजकीय प्रतिष्ठेचीही मोठी कसोटी लागली असल्याने संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीची चांगलीच चर्चा आहे.

Dec 02, 2025 09:56 (IST)

Badlapur Election LIVE Updates: बदलापुरमध्ये शिंदे गट- भाजप आमनेसामने

बदलापुर मध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा आमने-सामने आल्याचा पाहायला मिळालं,बदलापूर पश्चिमच्या बस डेपो परिसरात कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची पोलिसांच्या मध्यस्थीने  कार्यकर्त्यांना पांगवण्यात आले.

Dec 02, 2025 09:55 (IST)

Jalna Local Body Election LIVE Updates: दानवे कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदान बजावल आहे. भोकरदन मधील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं.आमदार संतोष दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे यांनी देखील भोकरदन नगरपरिषद निवडणुकी साठी मतदानाचा हक्क बजावला यावेळी रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप उद्या राज्यात नंबर एकचा पक्ष असेल, असं ते म्हणाले. 

Dec 02, 2025 09:54 (IST)

Lonavala Nagar Parishad Election Update: लोणावळ्यात शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

लोणावळ्यातील प्रभाग क्रमांक 13 येथे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. वादाचे कारण अद्याप अस्पष्ट.

Dec 02, 2025 09:52 (IST)

Rohit Pawar News: सरकारकडून प्रचंड पैशाचे वाटप, रोहित पवार यांचा आरोप

बीड येथील नगरपरिषद निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना एका गाडीमध्ये पैसे आणि काही शासन आढळले आहेत, यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून महायुती सरकारकडून या निवडणुकीमध्ये प्रचंड पैसे आणि वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे. जामखेड येथे देखील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडून मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर सुरू आहे मात्र सामान्य जनता ही अशा भूलथापांना आणि दहशतीला बळी पडणार नाही असे देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

Dec 02, 2025 09:50 (IST)

Tasgaon Nagat Parishad Election LIVE Updates: तासगावमध्ये आमचा विजय निश्चित: आमदार संजय काका पाटील

सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये आमचा विजय निश्चित आहे. विरोधक निवडणुकीत जिंकण्यासाठी गुंडागर्दीचा वापर करीत आहेत. सहानुभूती दाखवून आम्हाला बदनाम करून चुकीचा मेसेज पाठवत होते. विरोधकांनी दिलेल्या उमेदवाराच्या धंदे काय आहेत ते संपूर्ण तासगावला माहित आहे. या निवडणुकीत विरोधक सातत्याने संभ्रम निर्माण करत होते. आमच्यावर खोटे नाटे आरोप केले. पण तासगावची जनता दूधखुळी नाही. आता जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे. हे उद्याच्या निकालावरून स्पष्ट होईल, असा दावा माजी खासदार संजय काका पाटील यांनी केला.

Dec 02, 2025 09:48 (IST)

Yavatmal Local Body Election 2025 Update: आर्णी येथील मतदान केंद्रावरील मशीन बिघडले

यवतमाळमधील आर्णीतील मतदान केंद्र क्रमांक 9 वर मधल्या खोली क्रमांक 3 मधील कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्याने मतदान 20 मिनिटे उशिराने सुरू झाले.  

Dec 02, 2025 09:43 (IST)

Akkalkot Local Body Election LIVE Updates: अक्कलकोटमध्ये EVM मशिन बंद

सोलापुरच्या अक्कलकोटमध्ये पुन्हा एकदा ईव्हीएम मशिन बंद पडले आहे. अक्कलकोट मधील नगर परिषद मुला - मुलींची उर्दू शाळेतील EVM मशीन बंद पडली. मतदान केंद्र क्रमांक 9 वरील 2 नंबर खोली मधील मशीन तब्बल अर्ध्या तासापासून बंद आहे,  त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान करायला आलेल्या मतदारांची तारांबळ उडाली.

त्याचबरोबर मोहोळमध्ये जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 मधील आणखी मशीन बंद पडल्या आहेत. 

 

अर्धा तासापासून मशीन बंद पडल्याने खोलंबा

Dec 02, 2025 09:42 (IST)

Nagar Parishad, Nagar Panchayat Election 2025: शिवसेना (UBT) नेते, खासदार संजय राऊत यांची X पोस्ट

शिवसेना (UBT) नेते, खासदार संजय राऊत यांची X पोस्ट. एकनाथ शिंदे यांनी मालवणात येताना बॅगेतून काय आणले ? विचारला सवाल

 

Dec 02, 2025 09:41 (IST)

Akluj Local Body Election LIVE Updates: शोलेमधील गब्बरसिंगच्या पेहरावात येऊन मतदानाचा हक्क बजावला

शोले चित्रपटाची चाहते आजही देशभरात पाहायला मिळतात. अशाच शोले चित्रपटातील गब्बर सिंगचा अकलूज मधील एक चाहता असणाऱ्या मतदाराने गब्बरसिंगच्या पेहरावात येऊन मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे शोले चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून  दत्तात्रय सूर्यवंशी हे गब्बरसिंग सारखा पोशाख परिधान करत आले आहेत.

Dec 02, 2025 09:33 (IST)

Talegaon Nagar Parishad Election LIVE Updates: 95 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मतदारांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून, तब्बल 95 वर्षांच्या आज्जीबाईंनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

Dec 02, 2025 09:33 (IST)

Kagal Nagar Parishad Election 2025: कागलमध्ये तृतीयपंथी आणि पोलिसांत बाचाबाची

कागल नगर परिषदेसाठी होत असलेल्या मतदानाच्यावेळी तृतीयपंथी उमेदवार जावेद पिंजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. उमेदवारांना कल्पना न देता रातोरात EVM मशीन बदलल्याचा आरोप. पोलीस पक्षपातीपणे वागत असल्याचा केला आहे. 

Dec 02, 2025 09:32 (IST)

Akluj Local Body Election LIVE Updates: अनवाणी पायाने बजावला मतदानाचा हक्क

अकलूजच्या मतदान केंद्रावर देवाची पूजा झाल्यानंतर सोवळ परिधान करतच ठीक आहे काय व्यक्तीने अनवाणी येत मतदानाचा हक्क बजावला आहे.. विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीतही अनवाणी आणि सोवळ परिधान केलेला मतदार अकलूज येथे आढळून आला.

Dec 02, 2025 09:30 (IST)

vadgaon Local Body Election LIVE Updates: वडगाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

वडगाव मधील नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अबोली ढोरे व भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल माळसकर यांनी देखील सकाळी मतदानाचा हक्क बजावला. वडगाव नगरपंचायतीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे वडगाव नगरपंचायतीमध्ये मावळचे आमदार सुनील शेळके व भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

Dec 02, 2025 09:29 (IST)

Washim Local Body Election LIVE Updates: वाशिममध्ये EVM बंद, पथकाकडून दुरुस्ती

वाशिम जिल्ह्यातील कारंजा आठवडी बाजार मतदान केंद्र प्रभाग 4 मधील काही मिनिटांसाठी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता मशीन बंद पडताच मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र तांत्रिक पथकाने तत्काळ दुरुस्तीची कामे पूर्ण केल्यानंतर ईव्हीएम पुन्हा सुरु करण्यात आली असून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली आहे.

Dec 02, 2025 09:27 (IST)

Maharashtra Local Body Election LIVE Updates: बोलल्यावर चढण्याआधी नवरदेवाने केले मतदान

 आधी मतदान करणार आणि नंतर बोहल्यावर चढणार असा निश्चय भद्रावती येथील कार्तिक लुले यांनी बांधला आणि तसं करत बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आहे. कार्तिक यांचं लग्न आधी ठरलं आणि तारीख निघाली पण नेमकं त्याच दिवशी मतदान आलं. त्यामुळे मतदान करुन कार्तिक आपल्या वरतीला निघाले, भद्रावती शहरातील नाग मंदिराजवळ असलेल्या लोकमान्य शाळेत मतदान केले. 

Dec 02, 2025 09:21 (IST)

Dhule Local Body Election LIVE Updates: धुळ्यात शत-प्रतिशत भाजपा.. मंत्री जयकुमार रावल यांना विश्वास

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर आणि पिंपळनेर या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडत असून सकाळपासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे... शिंदखेडा नगरपंचायतीत राज्याचे पणन मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या ठिकाणी महायुतीतच काटे की टक्कर पाहायला मिळत आहे... विजय आमचाच होणार असल्याचा दावा मंत्री जयकुमार अमोल मंत्री जयकुमार रावल यांनी NDTV मराठी शी व्यक्त केला आहे... महाविकास आघाडीचे डिपॉझिट देखील वाचणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले आहे.

Dec 02, 2025 09:17 (IST)

Buldhana Bogus Voter: बुलढाण्यात पकडले बोगस मतदार

बुलढाण्यातील प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळा येथे बोगस मतदान करताना दोघांना पकडण्यात आलं आहे. दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्याचा करत होते प्रयत्न. दोघेही ग्रामीण भागातील असल्याची माहिती. 

Dec 02, 2025 09:15 (IST)

Hingoli Local Body Election LIVE Updates: आमदार संतोष बांगर यांच्या मतदान केंद्रात संशयास्पद हालचाली

हिंगोली नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे त्यातच एक महिला मतदान करत असताना बांगर यांनी त्या महिलेला मतदान कसं करायचं असा समजून सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तर बांगर यांनी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रात घोषणाबाजी देखील केली आहे, बांगर यांच्या संशयास्पद हालचालीवरून मतदान केंद्रातील कोणत्याही निवडणूक अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला नसल्याचे दिसून येत आहे.. दरम्यान निवडणुक विभाग काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..

Dec 02, 2025 09:13 (IST)

Satara Local Body Election LIVE Updates: मंत्री गोरेंच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यास मारहाण

 म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीच्या सुमारास गाडी तपासणी केल्याच्या कारणातून भाजपचे कार्यकर्ते आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते समोरासमोर भिडले...

मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार गटाचे डॉक्टर सौरभ सावंत यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप, पोलिसांसमोरच मध्यरात्री मारहाणीचा प्रकार 

Dec 02, 2025 09:11 (IST)

Malegaon Nagar Panchayat Election 2025 Update: नवी EVM आल्याने मतदानाला पुन्हा सुरूवात

वाशिमच्या मालेगाव नगर पंचायत निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली असून, नाना मुंदडा शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 10 मधील ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले होते. नवी ईव्हीएम मशीन आल्याने मतदानाला पुन्हा सुरूवात झाली आहे.  

Dec 02, 2025 09:10 (IST)

yavatmal Local Body Election LIVE Updates: कडाक्याच्या थंडीतही मतदारांचा उत्साह; मतदार केंद्रांवर गर्दी

 यवतमाळ जिल्ह्यात नव नगरपरिषद आणि एका नगरपंचायत साठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.जिल्हातील नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या 10 नगराध्यक्ष पदासह 293 सदस्य पदांकरिता मतदान होत आहे. तीन लाख 29 हजार 672 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानासाठी 390 मतदान केंद्र सज्ज ठेवण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदासाठी 77 तर सदस्य पदासाठी 1 हजार 83 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.दरम्यान मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Dec 02, 2025 09:08 (IST)

Akluj Election LIVE Updates: अकलुजमध्ये 1 तासांपासून EVM बंद, मतदारांचा खोळंबा

कलूज मधील ईव्हीएम मशीन हे एक तासाहून अधिक काळ बंद पडले. यानंतर जयसिंग मोहिते पाटील यांनी अकलूज मधील ईव्हीएम मशीन भाजपचे राम सातपुते आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून बंद पाडले गेले असल्याचा आरोप केला आहे. मात्र या सर्वांमध्ये कडाक्याच्या थंडीत रांगा लावून उभे राहिलेले मतदार मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ईव्हीएम सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Dec 02, 2025 09:07 (IST)

Sillod EVM Machinne: सिल्लोडमधल्या एका मतदान केंद्रावरील EVM बंद पडले

Sillod EVM Machine: सिल्लोडमधल्या एका मतदान केंद्रावरील EVM बंद पडले

Dec 02, 2025 09:04 (IST)

Jalna Local Body Election LIVE Updates: अंबड नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल, आमदार नारायण कुचेंना विश्वास

जालन्यातील अंबड नगर परिषदेत पुन्हा भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास भाजप आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केला आहे.विकासाच्या मुद्द्यांवर भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा कुचेंनी व्यक्त केला आहे.

Dec 02, 2025 09:01 (IST)

Akluj Local Body Election LIVE Updates:राम सातपुतेंनी EVM मशिन्स बंद पाडले, मोहिते पाटलांचा आरोप

अकलूजमधील ईव्हीएम मशीन बंद प्रकरण:

भाजपाचे रामभाऊ सातपुते यांच्या लोकांनी जाणीवपूर्वक मशीन बंद पाडले, असा गंभीर आरोप जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे. गेल्या  एक तासाहून अधिक काळ मशीन बंद पाडले गेले, असा आरोप मोहिते पाटील यांनी केला आहे.

Dec 02, 2025 09:01 (IST)

Malegaon Nagar Panchayat Election Update: बारामती तालुक्यातील माळेगांव नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरूवात.

नगराध्यक्षपदासह अठरा जागांसाठी पार पडतंय मतदान.  सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात. सकाळी थंडी जास्त असल्याने मतदान केंद्रांवर फार गर्दी नाही. थंडीचा कडाका कमी झाल्यानंतर मतदारांचा प्रतिसाद वाढण्याची शक्यता. 

Dec 02, 2025 08:57 (IST)

Jalgaon Local Body Election LIVE Updates: मतदान केंद्रावर पिंक बूथ वेधतोय लक्ष; महिलां मतदारांसाठी खास कल्पना

पाचोरा येथील एम एम कॉलेज मतदान केंद्रावर पिंक बूथ उभारण्यात आले असून महिला मतदारांना सुलभ मतदान प्रक्रियेत सहभाग घेता यावा यासाठी हे पिंक बूथ मतदान केंद्र उभारण्यात आले आहे तसेच या पिंक बुथच्या माध्यमातून महिला अत्याचार व महिलांच्या सुरक्षतेबाबत जनजागृती देखील करण्यात आली असून मतदानासाठी आलेल्या महिला मतदारांचा पुष्प देऊन या पिंक बूथ वर स्वागत देखील केले जात आहे.

Dec 02, 2025 08:57 (IST)

Beed Nagar Parishad Election Update: महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारींनी केले मतदान

बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांनी सहकुटुंब मतदान केले. आंबेवेस भागातील बाळ संस्कार केंद्रात केले मतदान इथे पद्मश्री धर्माधिकारी वि.राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख असा मुकाबला होत आहे.  

Dec 02, 2025 08:56 (IST)

Nandurbar Local Body Election LIVE Updates: नंदुरबारध्ये मतदानाला सुरुवात, भाजप उमेदवाराने बजावला मतदानाचा हक्क

नंदुरबार नगरपरिषद मतदानाला सुरुवात झाली असून भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी यांनी सहपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रचारादरम्यान शहरवासीयांकडून मिळालेल्या प्रतिसाद पाहता आमच्या विजय निश्चित होणार असं विश्वास भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी यांनी व्यक्त केले आहे.

Dec 02, 2025 08:53 (IST)

Buldhana Election 2025 Update: बुलडाण्यातील खामगावमधील एका मतदान केंद्रावर EVM बंद पडले

बुलडाण्यातील खामगावमधल्या प्रभाग क्रमांक 8 मधील EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबले.  

Dec 02, 2025 08:53 (IST)

Jamkhed Nagar parishad Election LIVE Updates: मतदारांना 5- 5 हजारांचे वाटप, रोहित पवार यांचा आरोप

राज्यात आज नगर परिषदेच्या निवडणुका पार पडत असून जामखेड या ठिकाणी देखील नगरपरिषदेचे पार पडत आहे. "लोकशाहीचा उत्सव असो प्रशासकाच्या माध्यमातून कोणतीही कामे होत नव्हती पालकमंत्री सांगतील सत्तेतला नेता सांगेल त्या पद्धतीने काम होत होती सामान्य लोकांचे कामे रखडली होती.  चांगला निकाल जामखेड नगर परिषदेचा लागेल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

  तसेच "समोरच्या पक्षांकडून पाच-पाच हजार रुपये मतदारांना देण्यात आल्याचा आरोप देखील आमदार रोहित पवार यांनी केला. आमच्याकडून सामान्य लोकांना संधी देण्यात आले आहे तर भाजपकडून गुंडांना सावकारांना मटका खेळणाऱ्यांना संधी देण्यात आले असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटल आहे. नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा होणार तर 18 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणार असल्याची खात्री आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवली!

Dec 02, 2025 08:50 (IST)

बुलडाण्यातील शिंदखेडा येथील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा आक्षेप

शिंदखेडा येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नसल्याचा आक्षेप. उमेदवारांच्या प्रतिनिधीने आक्षेप नोंदवत निवडणूक आयोग आणि स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची केली मागणी.  

Dec 02, 2025 08:49 (IST)

Akluj Local Body Election LIVE Updates: अकलुजमध्येही ईव्हीएम मशिन्स पडले बंद, मतदारांच्या रांगा

अकलूज मतदान केंद्रावर गेल्या 50 मिनिटांपासून ईव्हीएम पडले बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.  आयोगाच्या वतीने तंत्रज्ञ आणि तज्ञांकडून ईव्हीएमची तपासणी होत आहे. 

Dec 02, 2025 08:48 (IST)

Ratnagiri Local Body Election LIVE Updates: नवरी पोहचली मतदान केंद्रावर, लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क

लग्नाआधी नवरीने बजावला मतदानाचा हक्क.  रत्नागिरीतील सखी मतदान केंद्रावर समृद्धी अनिल सुर्वे  या तरुणीने मतदान केले. आज समृद्धीचे लग्न आहे. लग्नापूर्वी तिने आपला मतदानाचा हक्क बजावला. 

Dec 02, 2025 08:47 (IST)

नागपूर जिल्ह्यातील वाडी इथे तरूण जोडप्याचे गुलाबाचे फूल देऊन मतदारसंघावर स्वागत

Dec 02, 2025 08:45 (IST)

लातूर जिल्ह्यातही मतदानाला सुरूवात

लातूर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर आणि उदगीर या नगर परिषदांसाठी मतदानाला सुरुवात. औसा येथे 23, अहमदपूरमध्ये 25 आणि उदगीरमध्ये 37 नगरसेवक पदांसाठी मतदानाला सुरूवात. तिनही ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठीही नागरिक मतदान करणार आहेत. औसा येथे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अफसर शेख यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उदगीरमध्ये माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या तर अहमदपूरमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Dec 02, 2025 08:45 (IST)

Solapur Local Body Election LIVE Updates: सोलापुरात तब्बल 1 तासापासून EVM मशिन बंद

 मोहोळ तालुक्यातील नेताजी हायस्कूल येथे मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्याने गोंधळ उडाला आहे. तब्बल एका तासापासून हे मशिन बंद पडले आहे. नेताजी हायस्कूल येथील चार मतदान केंद्रावरील दोन नंबरची मशीन बंद पडल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. 

Dec 02, 2025 08:42 (IST)

माळेगाव नगर पंचायतीसाठी मतदानाला सुरूवात

Dec 02, 2025 08:42 (IST)

दौंड नगर परिषदेसाठी मतदानाला सुरूवात, महिला मतदारांमध्ये मोठा उत्साह

Dec 02, 2025 08:40 (IST)

Satara Local Body Election LIVE Updates: साताऱ्यात EVM मशिन बंद, मतदारांमध्ये गोंंधळ

साताऱ्यात मतदान सुरू होताच वोटिंग मशीन पडली बंद..

सातारा शहरात मतदानाला सुरुवात होताच, वोटिंग मशीन पडली बंद 

साताऱ्यातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये घडला प्रकार....

अचानकपणे मतदान मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण...

सातारा शहरातील प्रभाग क्रमांक 16 येथील बुज क्रमांक 2 वरती आझाद कॉलेजच्या मतदान केंद्रावर घडला प्रकार...

वोटिंग मशीन ला ऑपरेशन इन वॉलिड एरर आल्यामुळे, वोटिंग मशीन बदलली

मतदानाच्या प्रक्रियेच्या वेळेत उशीर झाल्यामुळे मतदारांकडून संध्याकाळी वीस मिनिटे वाढवून देण्याची मागणी...

Dec 02, 2025 08:38 (IST)

Pune Saswad Local Body Election LIVE Updates: सासवडमध्ये मतदानाला सुरुवात, भाजप नेते संजय जगपात यांनी बजावला हक्क

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपंचायतीसाठी आज मतदान पार पडत आहे. भाजपचे नेते माजी आमदार संजय जगताप यांच्या मातोश्री आनंदी जगताप या भारतीय जनता पार्टी कडून नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत.आज सकाळी मतदान केंद्रावर जात माजी आमदार संजय जगताप आणि त्यांच्या मातोश्री नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदी जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Dec 02, 2025 08:38 (IST)

बदलापूरमध्ये मतदानाला सुरुवात, नगराध्यक्षपदासाठी बहुरंगी चुरस

बदलापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात. नगराध्यक्षपदासह 43 जागांसाठी होतंय मतदान. बदलापुरातल्या गांधी चौकातील मराठी शाळेत मतदारांची मोठी गर्दी केली आहे.  नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून वीणा म्हात्रे, भाजपकडून रुचिता घोरपडे, ठाकरे गटाकडून प्रिया गवळी, अपक्ष संगीता चेंदवणकर आणि आस्था मांजरेकर निवडणुकीच्या रिंगणात  

Dec 02, 2025 08:37 (IST)

Dhule Local Body Election LIVE Updates: मतदान केंद्रांवर लाडक्या बहिणींची गर्दी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणीचा मुद्दा चांगला चर्चेचा विषय ठरला होता. या योजनेबाबत महायुतीतील तीनही पक्षांकडून प्रचारावर भर देण्यात आला होता.. आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शिरपूर आणि पिंपळनेर या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडत असून शिंदखेडा येथील मतदान केंद्रावर महिलांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी मतदानासाठी महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर असल्याचे पाहायला मिळाले

Dec 02, 2025 08:36 (IST)

कणकवलीत EVM मध्ये बिघाड झाल्याचा आरोप

कणकवलीच्या प्रभाग क्र.8 मध्ये अपक्ष उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबले जात नसल्याचा आरोप. 

Dec 02, 2025 08:36 (IST)

Jalgaon Nagar Parishad Election LIVE Updates: तृतीयपंथी मतदाराने केलं पहिलं मतदान

जळगाव जिल्ह्यातील चोपडा नगरपरिषद निवडणुकीत तृतीयपंथी मतदाराने पहिल्या मतदानाचा हक्क बजावला असून भुरी जान असे तृतीयपंथी मतदाराचे नाव आहे. मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा उत्सव असून त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन तृतीयपंथी मतदार भुरी जान यांनी केले आहे..

Dec 02, 2025 08:33 (IST)

Nagpur Local Body Election LIVE Updates:

नागपुरमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे.  नव मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदान केंद्र सजविण्यात आले आहे.  मतदान केंद्रावर तरुण आयकॉन्सचे फोटो लावण्यात आले आहेत. तसेच सेल्फी पॉइंट्सही उभारले आहेत. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण- तरुणींचे गुलाब देऊन स्वागत केले जात आहे. 

Dec 02, 2025 08:30 (IST)

Hingoli Local Body Election LIVE Updates: हिंगोलीत तब्बल 1 कोटींची रक्कम जप्त

  • हिंगोलीत भरारी पथकाकडून 1 कोटी जप्त
  • चारचाकी गाडीत आढळली रक्कम
  • हिंगोलीच्या मंगळवारा भागात मतदानाच्या 12 तास अगोदर मोठी कारवाई

Dec 02, 2025 08:28 (IST)

Nashik Local Body Election LIVE Updates: अरेरे... उमेदवाराचेच नाव सापडेना, मतदान केंद्रावर गोंधळ

नाशिकमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी मतदान याद्यांचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. नाशिकमधील  भगुरच्या नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान उमेदवाराचेच नाव सापडत नसल्याने गोंधळ झाला. भाजप उमेदवार शीतल शेटे यांचं नाव सापडत नसल्याने हा प्रकार घडला. 

Dec 02, 2025 08:20 (IST)

Beed Local Body Election LIVE Updates: बीडमध्ये दुचाकीवरुन पैसे वाटप होत असल्याचा आरोप

नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान रात्रीतून दुचाकी घेऊन पैसे वाटप करत असलेल्याचा आरोप करत दोन व्यक्तींना बीड शहरातील पेठ बीड भागातील सोनार गल्लीत काही तरुणांनी पकडले. त्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. स्कुटीच्या डिक्कीत काही रक्कम आणि राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह असलेले काही पोस्टर देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

  तरुणांना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.. 

Dec 02, 2025 08:19 (IST)

Ratnagiri Local Body Election LIVE Updates: लग्नाआधी मतदान, नवरदेवाने बजावला हक्क

रत्नागिरी नगर परिषद निवडणूक.. 

मतदानासाठी पोहोचला चक्क नवरदेव 

लग्नाच्या आधी नवरदेव मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 

राहुल शिवलकर असं नवरदेवाचे नाव

Dec 02, 2025 08:18 (IST)

Hingoli Election LIVE Updates: हिंगोलीत मतदानाला सुरुवात, आमदार संतोष बांगर यांनी केलं मतदान

हिंगोली नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे, शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, आज सकाळी हिंगोली शहरातील मंगळवार भागातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे..

Dec 02, 2025 08:17 (IST)

Kolhapur Local Body Election LIVE Updates: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात

कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपालिकासाठी आज मतदान प्रक्रिया सुरु झालीये. 10 नगरपरिषदा व 3 नगरपंचायतींमध्ये एकूण 2 लाख 55 हजार 775 मतदार असून जिल्ह्यातील एकूण 318 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. सकाळी साडे सात वाजता ही मतदान प्रक्रिया सुरु झालीये. निवडणूक यंत्रणेने पूर्ण तयारी केली असून, सर्वच ठिकाणी अटीतटीच्या लढती असल्याने पोलिस यंत्रणाही सतर्क आहे.

Dec 02, 2025 08:16 (IST)

Sangli Election LIVE Updates: सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी होणार मतदान

सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी होणार मतदान

उरुण ईश्वरपूर, आष्टा,तासगाव, पलूस,विटा व जत,या सहा नगरपरिषदेसाठी आणि शिराळा व आटपाडी या दोन नगरपंचायतीसाठी पार पडतंय मतदान.

8 नगराध्यक्ष पदासाठी 49 उमेदवार 181 नगरसेवक पदासाठी 514 उमेदवार रिंगणात

2 लाख 58 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मतदानासाठी 291 मतदान केंद्रांची नियुक्ती

मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 780 कर्मचाऱ्यांची नियुक्ती.

या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Dec 02, 2025 08:16 (IST)

Indapur Nagar Parishad Election LIVE Updates: इंदापुरात चुरशीची लढत, मतदानाला सुरुवात

पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील अत्यंत चुरशीची लढत म्हणून इंदापूरच्या नगर परिषदेकडे पाहिला जातेय. कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांच्यात ही लक्षवेधी लढत होतेय. या लढतीत विजयाचा गुलाल आम्हीच उधळू असा दावा कृष्णा भीमा विकास आघाडीचे प्रदीप गारटकर यांनी केला आहे

Dec 02, 2025 08:15 (IST)

Akola Election LIVE Updates: अकोल्यात मतदानाला सुुरुवात

अकोला जिल्ह्यामध्ये आज नगरपरिषद नगरपंचायत सकाळी साडेसात वाजता पासून सुरुवात झाली असून हे मतदार सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होणार आहे. यामध्ये जिल्हाभरातील 204 मतदान केंद्रावर 122 जागेसाठी 1 लाख 81 हजार 741 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. या दरम्यान जिल्हाभरातील अकोट, मुर्तीजापुर, तेल्हारा, हिवरखेड नगरपरिषद आणि एकमेव नगरपंचायत बार्शीटाकळी  साठी एकूण 33 नगराध्यक्ष उमेदवार रिंगणात आहेत तर 595 नगरसेवक सुद्धा आपलं भाग्य आजमावणार आहेत.

Dec 02, 2025 08:14 (IST)

Jalgaon Election LIVE Upates: जळगाव जिल्ह्यात 16 नगरपरिषद व दोन नगरपंचायतीसाठी होणार मतदान

जळगाव जिल्ह्यात 16 नगरपरिषद व 2 नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत 77 नगराध्यक्ष पदाचे व 1555 नगरसेवक पदाचे उमेदवार हे रिंगणात आहेत. एकूण 977 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून 8 लाख 89 हजार 914 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

या मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 26 केंद्राध्यक्ष 3 हजार 488 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस बंदोबस्तासह अतिरिक्त गृहरक्षक दल व संवेदनशील भागात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Dec 02, 2025 08:13 (IST)

Maharashtra Local Body Election 2025 Live:भोर नगर परिषदेसाठी आज मतदान, राष्ट्रवादी भाजपमध्ये थेट लढत

पुण्यातील भोर नगर परिषदेसाठी आज मतदान

भोर मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये थेट लढत

भोर नगरपालिकेच्या 20 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा एकूण 21 जागांसाठी आज निवडणूक होत आहे

22 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार

 भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे महायुतीतलेच दोन पक्ष या निवडणुकीत आमने-सामने आहेत

भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.. तर राष्ट्रवादीकडून रामचंद्र आवारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

 मागचे अनेक वर्ष भोर नगरपालिकेवर संग्राम थोपटे यांची सत्ता होती.. मागच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असताना संग्राम थोपटे यांनी सर्वच्या सर्व जागा जिंकत नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवला होता..

 मात्र आत्ताच्या विधानसभा निवडणुकांमध्ये संग्राम थोपटे यांचा राष्ट्रवादीच्या शंकर मांडेकर यांच्याकडून पराभव झाला.. त्यानंतर कालांतराने संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाचा हात सोडून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे..

 सध्या संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांच्यासाठी ही नगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.. दोघांनाही आपापल्या पक्षाचा झेंडा हा नगरपालिकेवर फडकवायचा आहे

 राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी स्वतः अजित पवार यांनी सभा घेतली तर भाजपच्या उमेदवारांसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोरमध्ये  सभा घेतली आहे.. या सभेदरम्यान दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका एकमेकांवर केलेल्या आहेत.. त्यामुळे आता निकाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे..

Dec 02, 2025 08:12 (IST)

12 हजार 316 मतदान केंद्रांवर मतदार बजावणार मतदानाचा हक्क

राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात.

Dec 02, 2025 08:11 (IST)

Maharashtra Election LIVE Updates: कोणत्या शहरात कुणाची प्रतिष्ठा पणाला? वाचा...

नाशिक जिल्ह्यात अकरा नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील येवला, नांदगाव, सिन्नर, भगूर, त्र्यंबकेश्वर, ईगतपुरी या महत्वाच्या निवडणूक असून छगन भुजबळ, सुहास कांदे, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जळगाव  जळगाव जिल्ह्यात आज 16 नगरपरिषद व दोन नगरपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

छत्रपती संभाजीनगरचा विचार केल्यास 6 नगर परिषदांसाठी निवडणूक होत आहे. प्रामुख्याने सिल्लोड नगर परिषदकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिल्लोडमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर रिंगणात असणार आहेत. 

धाराशिव जिल्ह्यातील  ८ नगरपालिकांसाठी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.  महायुतीकडून पालकमंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री तानाजी सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड ज्ञानराज चौगुले, भाजपाचे आमदार राणा  जगजितसिंह सिंह पाटील , माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत

Dec 02, 2025 08:10 (IST)

Maharashtra Local Body Election LIVE Updates: राज्यात आज मतदानाचा धुरळा

राज्यातील २६४ नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार असून या मतदानाची मतमोजणी ३ तारखेला सकाळी १० वाजेपासून सुरु होईल.