Marathwada Rain Damage Report: मागील पाच दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. १४ ते १९ ऑगस्ट या कालावधीत ११ जणांचा जीव गेला आहे. सोबतच ४ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून तब्बल ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील पाऊस थांबला असला असून, आता प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४९८ पशू दगावल्याची, ६०१ घरांची पडझड झाल्याची, ११५१ बाघित गावे, 438351 शेतकऱ्यांचे नुकसान, तर 358370 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी ४७५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यात १८७ मिमी पावसाची नोंद आहे. पावसाने ५८८ लोकांचा संसार उघड्यावर आला आहे.
IMD Rain Red Alert News: राज्यात पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर-उपनगरासह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
मराठवाड्यात झालेले जिल्हानिहाय नुकसान!
छत्रपती संभाजीनगर
जनावरांचा मृत्यू : 07
पडझड झालेली घर-गोठे : 66
बाधित गावं : 14
बाधित शेतकरी : 2194
शेती नुकसान : 1252 .67 हेक्टर
हिंगोली
मयत व्यक्ती :02
जनावरांचा मृत्यू : 34
पडझड झालेली घर-गोठे : 39
बाधित गावं : 36
बाधित शेतकरी : 58817
शेती नुकसान : 56806 हेक्टर
नांदेड
मयत व्यक्ती : 07
जनावरांचा मृत्यू : 126
पडझड झालेली घर-गोठे : 294
बाधित गावं : 949
बाधित शेतकरी : 324234
शेती नुकसान : 259789 हेक्टर
बीड
मयत व्यक्ती : 02
जनावरांचा मृत्यू : 03
पडझड झालेली घर-गोठे : 10
बाधित गावं : 07
बाधित शेतकरी : 3407
शेती नुकसान : 2045 हेक्टर
लातूर
जनावर मृत्यू-245
पडझड झालेली घर-गोठे : 83
बाधित गावं : 30
बाधित शेतकरी : 2937
शेती नुकसान : 2051 हेक्टर
धाराशिव
जनावरांचा मृत्यू : 53
पडझड झालेली घर-गोठे : 64
बाधित गावं : 55
बाधित शेतकरी : 15590
शेती नुकसान : 15326 हेक्टर
नक्की वाचा: Sangli News :लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय?)
परभणी
मयत व्यक्ती : 02
जनावरांचा मृत्यू : 21
पडझड झालेली घर-गोठे : 43
बाधित गावं : 63
बाधित शेतकरी : 31172
शेती नुकसान : 21091 हेक्टर
जालना
जनावरांचा मृत्यू : 09
पडझड झालेली घर-गोठे : 02