Rain Alert: सावधान! पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, धो-धो बरसणार, आज कुठे कुठे अलर्ट? वाचा...

हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर राज्य प्रशासन सतर्क झाले असून सखोल भागातील नागरिकांना आणि प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Rain IMD Alert News: महाराष्ट्रामध्ये मान्सूनने पुन्हा एकदा सक्रिय होत जोरदार मुसळधार पाऊस सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, आगामी तीन दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर राज्य प्रशासन सतर्क झाले असून सखोल भागातील नागरिकांना आणि प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Akola News: वंचित बहुजन आघाडीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, लोकशाही पद्धतीने नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड

राज्यात पुन्हा मुसळधार.. हवामान विभागाचा अलर्ट

​हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज ३ ऑगस्ट रोजी कोकण आणि गोवा पट्ट्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, तसेच विदर्भातील अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट घोषित केला आहे.

Advertisement

विशेषतः ३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी हा यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नक्की वाचा >> "कार्यकर्त्यांना गावी पाठवून त्यांच्या बायकांसोबत मिटिंग करत नाही", आमदार बालाजी किणीकरांचं खळबळजनक विधान