Maharashtra Mumbai Rain LIVE Updates: गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पावसाच्या धुवाँधार बॅटिंगने मुंबईत अनेक भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या दुर्घटना घडत आहेत. हवामान विभागाने आजही मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Virar Rain LIVE Updates: सूर्या प्रकल्पाची पाईपलाईन फुटली; 25 फूट उंच पाण्याचा फवारा
वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या प्रकल्पाची मुख्य पाईपलाईन शुक्रवारी पहाटे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार जवळील बावखल येथे फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. भरधाव ट्रेलरची धडक बसल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पाईपलाईन फुटल्यानंतर तब्बल 20 ते 25 फूट उंच पाण्याचा फवारा उडताना दिसला.
या घटनेमुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी काही तास लागण्याची शक्यता आहे. परिणामी वसई-विरार परिसरात पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार असून, काही भागांमध्ये दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बंद राहू शकतो. दरम्यान, जोरदार पावसामुळे गढूळ पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Nahik Rain Update: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, नागरिकांचे हाल
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याने आणि वाहतुकीचा वेग मंदावल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे
Virar Rain LIVE Update: पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तीन दिवसातील चौथा बळी!
विरार पूर्वेला शिरगाव येथील कुंभारपाडा बंधाऱ्यामध्ये 21 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. अभोषेक राजभर, वय 21 असे या तरुणाचे नाव असून तो विरार मध्ये राहत होता. मित्रांसोबत गुरुवारी संध्याकाळी तो बंधाऱ्यामध्ये होण्यासाठी आला होता मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी काल रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली मात्र तो आढळून आला नव्हता. त्यानंतर आज सकाळीच राबवलेल्या शोध मोहिमेत अभिषेक याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला.
Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरधार सुरूच
- मुंबईत पावसाची जोरधार सुरूच
- वांद्रे परिसरासह उपनगरात जोरदार पाऊस
- वांद्रे रेल्वे स्थानकावर पाणी साचायला सुरुवात
- पावसाचा लोकलवर परिणाम, 15-20 मिनिटे उशिरा..
Mumbai Rain LIVE Update: मुंबई शहर व उपनगरात जोरदार पाऊस कोसळणार
Raigad Rain LIVE Update: आंबाघाटात पुन्हा दरड कोसळली
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात आज सकाळी पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दख्खन ते कळकदारा दरम्यान रत्नागिरी–नागपूर महामार्गालगत ही दरड कोसळल्याने काही काळ एकेरी मार्ग बंद ठेवण्यात आला. दरड वाहतुकीच्या मुख्य मार्गावर न आल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी दगडांचे तुकडे रस्त्यावर आल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे. परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आणखी दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगून वाहने चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
Satara Rain Update: वाई–महाबळेश्वर मार्गावरील पसरणी घाटात दरड कोसळली
वाई–महाबळेश्वर मार्गावरील पसरणी घाटात दरड कोसळली
दरडीमुळे घाटातील वाहतूक धोकादायक
प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम सुरू
वाहनचालकांना सावधगिरीने प्रवासाचे आवाहन
शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करा
Pune Rain LIVE Update: घाटकोपरमध्ये पावसाचा जोर वाढला
मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला.
अंधार सदृश्य परिस्थिती झाल्याने दृश्यमानता देखील कमी झाली आहे
अनेक गाड्यांना आपले पार्किंग लाईट आणि हेडलाईट सुरू ठेवून गाड्या चालवाव्या लागत आहे.
Navi Mumbai Rain Update: नवी मुंबईत अतिवृष्टीमुळे दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी
शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने आज (3 जुलै) दुपारच्या सत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच सकाळचे व सर्वसाधारण सत्र सुरू असलेल्या शाळांना पालकांना तातडीने सूचना देऊन विद्यार्थ्यांना केवळ पालक किंवा अधिकृत प्रतिनिधी यांच्या ताब्यात सुरक्षितपणे सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Pune Rain LIVE Update: पुण्यात झाड कोसळले, गाड्यांचे मोठे नुकसान
रास्ता पेठेतील मंगलमूर्ती चौकात पहाटे साडेतीनच्या सुमारास भलेमोठे झाड कोसळले.
झाड महापालिकेच्या मंडपावर पडल्याने मोठी घटना घडली.
या दुर्घटनेत काही वाहनांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.
झाड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
Pune Rain Alert: मुसळधार पावसाचा परिणाम, पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानांना विलंब
पुणे
दिल्लीतील मुसळधार पावसाचा विमानसेवेवर परिणाम झाला आहे.
दिल्ली विमानतळावर येणाऱ्या विमानांना विलंब होत असल्याने पुणे–दिल्ली उड्डाणेही उशिराने सुटत आहेत.
पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या पाच ते सहा विमानांना अर्धा ते एक तास विलंब झाला.
विमानांच्या विलंबामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
विमानतळावर प्रतीक्षेचा कालावधी वाढला आहे.
प्रवाशांनी उड्डाणाच्या वेळेची माहिती संबंधित विमान कंपनीकडून तपासून घ्यावी.
दिल्लीतील प्रतिकूल हवामानामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे
Mumbai Rain LIVE Update: साकिनाका मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, कंत्राटदारावर गुन्हा दाखल
साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरानी रोडवर जलनिस्सारण वाहिनीच्या (ड्रेनेज) दुरुस्तीचे काम सुरू होते. यादरम्यान, यादव नगर (साकीनाका) येथील रहिवासी असलेले अस्लम इसाक शेख (वय ५५ वर्षे) हे पादचारी उघड्या मॅनहोलमधून ड्रेनेजमध्ये पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी, 'एल' (L) विभागातील बीएमसी (BMC) अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून, साकीनाका पोलीस ठाण्यात संबंधित कंत्राटदार आणि दुरुस्तीच्या कामात गुंतलेल्या कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
Mumbai Rain LIVE Update: मुंबईतील पावसाचा परिणाम वाहतुकीवर
- पावसाचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर
- पश्चिम विरुद्ध गती मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने
- मुंबई दोन दिवसांपासून सुरू आहे पाऊस, त्यामुळे रस्ते झालेत ओले
- त्याचा परिणाम पूर्णतः वाहतुकीवर
Mumbai Rain LIVE Update: पश्चिम रेल्वेचा खोळंबा, विरार स्टेशनवर मोठी गर्दी
विरार स्टेशनला पंधरा मिनिटं ट्रेन लेट असल्यामुळे गर्दी वाढली आहे
पावसामुळे लोकल आहेत उशिरा
नोकरदारवर्ग सकाळी कामावर निघताना करावा लागतोय गर्दीचा सामना
Mumbai Rain Update: मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटात दरड कोसळली
मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटात दरड कोसळली
यंदाच्या पावसाळ्यात सलग तिसऱ्यांदा वेरळ घाटात दरड
दरड बाजूला करण्याचं काम सुरू
वेरळ घाटातून सध्या एकेरी वाहतूक
मुंबईला जाणाऱ्या दिशेकडच्या रस्त्यावर कोसळली दरड
दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू
Ratnagiri Rain LIVE Update: रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.. 6 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट असणार आहे. जिल्ह्यात सध्या सरींवर पाऊस बरसत आहे. तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे.. सध्या पडत असलेल्या चांगल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही चांगली वाढ झाली आहे. खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळी जवळून वाहत आहे.
सध्या जगबुडी नदीची पाणीपातळी 4.90 मीटर एवढी आहे. तर इशारा पातळी ही 5 मीटर आहे.. दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 68.86 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात झाला आहे, मंडणगडमध्ये तब्बल 143 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Mumbai Rain LIVE Update: - मुंबईत पावसाची पुन्हा जोरदार बरसात
मुंबईत पावसाची पुन्हा जोरदार बरसात
- पुढच्या तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट
- मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना इशारा
- मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन...
Mumbai Rain Update: अंधेरीतील वीरा देसाई मार्ग झाला जलमय
- अंधेरीतील वीरा देसाई मार्ग झाला जलमय
- वाहन पाण्यातून काढताना नागरिकांना त्रास
- सध्या उपनगरात जोरदार पाऊस सुरू
- पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
Mumbai Rain LIVE Update: मुंबईकरांनो सावधान! समुद्र पुन्हा खवळणार; भरती- ओहोटीची वेळ काय?
भरती-ओहोटीची वेळ
भरती
१४१८ वाजता : ४.२८ मीटर
(दिनांक ०४.०७.२०२६) ०२०९ वाजता: ३.६८ मीटर
ओहोटी:
२०२२ वाजता : १.७४ मीटर
(दिनांक ०४.०७.२०२६)
०७४४ वाजता : १.०५ मीटर
===
दिनांक ०२.०७.२०२६ : ०८०० वाजल्यापासून ते दिनांक ०३.०७.२०२६ : ०८०० वाजेपर्यंतचा सरासरी पर्जन्यमान
शहर : १२६ मिमी
ईएस : ११० मिमी
डब्ल्यूएस : ११४ मिमी
Mumbai Rain LIVE Update: बेलापूर- उलवे मार्गावर पाणी; वाहतूक संथ गतीने सुरु
नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग! बेलापूर कडून उलवेकडे जाणाऱ्या रोडवरती खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक संत गतीने सुरू आहे
Mumbai Rain LIVE Update: ठाण्यातील चांदवाडी परिसरात भले मोठा झाडं कोसळले
ठाण्यातील चांदवाडी परिसरात भला मोठा झाडं कोसळले.. सतत पडत असलेल्या पावसामुळे ठाण्यात दुसऱ्या दिवशी देखील भला मोठा झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
ठाकरे गटाचे नेते महेश कदम यांनी आपत्ती व्यवस्थापन यांना २ तासा पूर्वी कल्पना देऊन ही महापालिकेच्या कुठला ही कर्मचारी घटना स्थळी दाखल झाला नव्हता....
Akola Rain LIVE Update: सततच्या पावसाने बाळापूर तालुक्यात शेती जलमय; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या रिमझिम आणि काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकतीच केलेल्या पेरणीनंतर पिकांचे अंकुर उगवण्यास सुरुवात झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून संपूर्ण शेती जलमय झाली आहे. त्यामुळे उगवलेले अंकुर पाण्याखाली जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Navi Mumbai Rain Update: नवी मुंबईत सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस
नवी मुंबई मध्ये आज पावसाचा पाचवा दिवस रात्रभर झालेला पावसामुळे सफल ठिकाणी पाणी साचले. आज सकाळी याच ठिकाणी झालेल्या अपघातामुळे काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सध्या या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली असली, तरी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहनचालकांना अद्यापही सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Mumbai Rain Update: IMD ची वेबसाईट पडली बंद
- IMD ची वेबसाईट पडली बंद
- पावसाची काय स्थिती? पावसाचे अलर्ट मिळेना
- वेबसाईटला क्लिक केल्यानंतर ओपन होत नाहीये, सर्व्हर डाऊन असण्याची शक्यता
Pune Rain LIVE Updates: पुण्यासाठी हवामान विभागाचा मोठा इशारा
१ जुलैपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे.
गेल्या २४ तासांत पावसाचा जोर वाढला असून, सलग दुसऱ्या दिवशी शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
जोरदार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले असून, नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
पुणे वेधशाळेने पुढील ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
३ जुलैसाठी पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
४ जुलैसाठी पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह देशभरात मान्सून सक्रिय झाला असून, गेल्या तीन ते चार दिवसांत बहुतांश भाग व्यापला आहे.
पुढील ४८ तासांत मान्सून संपूर्ण देशभर पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Mumbai Rain LIVE Updates: पावसाचा फटका, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेचा खोळंबा
सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वे उशिराने धावत आहे
माध्य रेल्वे 15-20 मिनिट उशिराने धावत आहेत
पश्चिम रेल्वे 5-7 मिनिट उशिराने धावत आहेत
Mumbai Rain LIVE Updates: अवघ्या तासाभराच्या पावसात नालासोपारा जलमय
नालासोपारा शहरात पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने नालासोपारा रेल्वे स्थानक पूर्वीच्या तुळींज ब्रिज ते अलायन्स हॉस्पिटलकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे . विशेष म्हणजे काल रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम आणि अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या परंतू पहाटे पर्यंत या मार्गावर पाणी साचले नव्हते, मात्र त्यानंतर तास भर झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर जलमय झाला. परिसरात पाणी तुंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, वाहतूकही संथ गतीने सुरू आहे.
Bhandara Rain LIVE Updates: भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रिमझिम पावसाला सुरुवात
भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही रिमझिम पावसाची हजेरी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे खरीप हंगामातील शेतीकामांना वेग मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
Palghar Rain LIVE Updates: स्मशानभूमीच नाही! भर पावसात चितेवर प्लास्टिक धरून अंत्यसंस्कार
पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील मेढी मौली पाडा येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांवर भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे चिखलातून वाट काढत मृत विनायक नथू नांगरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाऊस सुरू असल्याने चिता पेटती राहावी म्हणून ग्रामस्थांना चितेवर प्लास्टिक धरावे लागले. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या हृदयद्रावक घटनेमुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Maharashtra Rain LIVE Update: जायकवाडी धरणात बुडून व्यापाऱ्याचा मृत्यू
जायकवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पैठण शहरातील एक किराणा व्यापारी पाण्यात बुडाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. नगर परिषदेच्या अग्निशमन दलासह पोलिस प्रशासनाकडून सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. देवेंद्र कमलनारायण खंडेलवाल असे मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. खंडेलवाल धरण परिसरात पोहण्यासाठी गेले होते. त्या वेळी धरणात पाण्याची आवक वाढलेली असून जोरदार वारे वाहत होते. पोहत असताना ते पाण्यात अडकले आणि मदतीसाठी आरडाओरड करू लागले. पण काही क्षणात ते पाण्यात बुडाले.
Mumbai Rain LIVE Updates: मुंबईत सर्वाधिक पाऊस, अंधेरी परिसरातही जोरदार बॅटिंग
जुलै रोजी सकाळी 8 ते 3 जुलै सकाळी 6 पर्यंतच्या पावसाची नोंद
सर्वाधिक पाऊस मुंबई शहरात
मलबार हिल आणि परिसरात 150 मिमी पाऊस
पश्चिम उपनगरात अंधेरी परिसरात 130 मिमीपेक्षा जास्त पाऊस
पूर्व उपनगरात पवई भागात 124 मिमी पेक्षा जास्त पाऊस
Maharashtra Rain LIVE Updates: मराठवाड्यात पावसाची निराशा
मराठवाड्यात मान्सूनची वाटचाल अद्याप म्हणावी तशी नाही. २ जुलैपर्यंत विभागात जून ते सप्टेंबर या वार्षिक हंगामातील सरासरीच्या केवळ १८.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विभागात आतापर्यंत १२७.६ मि.मी पावसाची नोंद झाली. ६७९ मि.मी. विभागाची वार्षिक सरासरी असून सरासरीच्या ८७.४ टक्के प्रमाण आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून आजवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२० मि.मी., जालना जिल्ह्यात १३४, बीड १२२, लातूर १०५, धाराशिव १३०, नांदेड, १४५, परभणी ११४, हिंगोली १५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २ जुलैच्या अहवालानुसार एका दिवसात ६.४ मि.मी. पावसाची नोंद विभागात झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत मराठवाड्यात १४३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ११८.७ मि.मी. पाऊस झाला आहे.
Mumbai Rain LIVE Updates: मुंबईतील कोणत्या भागात किती पाऊस झाला?
मुंबईत काल रात्री 8 वाजेपासून ते आज पहाटे 6 पर्यंत एवढ्या पावसाची नोंद झाली आहे
मांडवी अग्निशमन केंद्र
150.2
मलबार टेकडी
१४५.८
ब प्रभाग कार्यालय
१४०.८
मेमनवाडा अग्निशमन केंद्र
140.2
महानगरपालिका मुख्य कार्यालय
139.2
WS
मालपा डोंगरी मुन. शाळा, अंधेरी
१३६.६
के पूर्व प्रभाग कार्यालय
१३४.६
वर्सोवा WWTF आणि लॅगून्स
१२९.४
वर्सोवा पंपिंग स्टेशन
१२८.८
अंधेरी अग्निशमन केंद्र
१२८.६
पस्पोली पवई नगरपालिका शाळा, पवई
124
मंखुर्द अग्निशमन केंद्र
११७.८
मंखुर्द अग्निशमन केंद्र
११७.८
एस प्रभाग कार्यालय
116.2
गव्हाणपाडा अग्निशमन केंद्र
ES
११५.६
Mumbai Rain LIVE Update: मुंबईत पावसाची संततधार, लोकलचा खोळंबा
- मुंबईत रात्रभर पावसाची संततधार सुरूच
- शहराच्या ठिकठिकाणी 120 ते 140 मिलिमीटर पावसाची नोंद
- परंपरेनुसार मुंबईचा अंधेरी सबवे रात्रीतून भरला
- मुंबईच्या लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने