7 days ago

Maharashtra Municiple Corporation Election 2026: राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचा धडाका सुरु झाला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव आणि धुळे जिल्हा दौऱ्यावर असून प्रचारसभा तसेच रॅली पार पडणार आहे. तर काँग्रेसकडून आज मुंबई महानगरपालिकेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यातून काय आश्वासन देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाची आज बैठक होणार आहे. आज आणि ७ जानेवारीला होणाऱ्या या बैठकीत महापालिका निवडणुकीची तयारी आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.  दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. रविंद्र चव्हाण यांच्या विधानानंतर काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Jan 06, 2026 14:31 (IST)

Latur Election LIVE Updates: रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्याचे पडसाद! प्रतिमेला जोडे मारत आंदोलन, लातूर बंदची हाक

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन, रवींद्र चव्हाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, विलासराव देशमुख यांच्या वक्तव्यावर जिल्हाभरात तीव्र पडसाद. उद्या लातूर बंदची हाक..

 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत, रेनापुर शिरूर अनंतपाळ आणि लातूर  या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले,

Jan 06, 2026 14:30 (IST)

BMC Election Live Updates: मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांच्याविरोधातील अपक्ष उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा

मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांच्या विरोधात असलेल्या अपक्ष उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा...

लाॅरा  दिसूजा आणि तेजल पवार या अपक्ष दोन्ही उमेदवारांना काँग्रेस वंचित आघाडीचा पाठिंबा..

नार्वेकर परिवाराच्या विरोधात काँग्रेस आघाडी मैदानात...

या दोन्ही अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि वंचित आघाडीचे नेते जाणार...

अपक्ष उमेदवारांना राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरून दिला नाही असा आरोप करण्यात आला होता..

हरिभाऊ राठोड आणि काँग्रेस वंचीत आघाडीच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरू दिला नाही त्यामुळे अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याची कांग्रेसची भुमिका

Jan 06, 2026 13:45 (IST)

BMC Election LIVE Update: मनसेला धक्का! संतोष धुरींचा भाजपमध्ये प्रवेश

ठाकरे बंधुंना वरळीमध्ये मोठा धक्का!  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत संतोष धुरी यांनी भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 

Jan 06, 2026 13:36 (IST)

Nagpur Election LIVE Update: नागपूरकरांसाठी काँग्रेसची २० सूत्रे! जाहीरनामा प्रकाशित

 नागपूर महानगर पालिका निवडणुक  काँग्रेसचे 20 सूत्र, जाहीरनामा

- 500 चौ फुटांपर्यंतच्या घरासाठी मालमत्ता कर पूर्ण माफ करणार 

- मोफत पाणीपुरवठा, 30 हजार लिटरपर्यंत पाणीबिल नाही 

- मोफत शहर बस सेवा - ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व महिलांसाठी मोफत प्रवास 

- मनपा एनआयटी व नझुल लीज वरील प्लॉट्सना मोफत 

- स्वच्छ नागपूर - प्रत्येक घरातून दिवसातून दोन वेळा कचरा संकलन 

- मोफत मालकी हक्क पट्टे - सर्व झोपडपट्टी धारकांना मोफत मालकी हक्काचे पट्टे 

- दिव्यांगांसाठी मोफत आवश्यक साधने 

- बीपीएल कुटुंबांसाठी बाजारपेठांमध्ये मोफत दुकाने 

- पदवीधर लोकांसाठी स्वयंरोजगार मोफत योजना 

- मनपा व नागपूर सुधार प्रण्यास मध्ये युवकांसाठी तात्पुरत्या रोजगाराच्या संधी 

- खड्डे मुक्त रस्ते 

- मोफत शिक्षण 

- आरक्षित जमिनीवरील अनधिकृत प्लॉट्सना मंजुरी 

- वाहतूक कोंडीतून शहर पूर्णतः मुक्त 

- पूर मुक्त शहर 

- डम्पिंग यार्ड स्थलांतर 

- सांडपाणी निराकरण 

- 151 फेरीवाला व खाऊ गल्ल्याची  निर्मिती

Advertisement
Jan 06, 2026 13:35 (IST)

Thane Election LIVE Updates: मनसे नेते अविनाश जाधव व शिष्ठ मंडळाने घेतली ठाणे महापालिका आयुक्तांची भेट

मनसे नेते अविनाश जाधव व  शिष्ठ मंडळाने  घेतली ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट..

ठाण्यातील वागळे विभागातील निवडणूक आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तनुकी बाबत अविनाश जाधव यांनी ठाणे महानगर पालिका आयुक्त यांची भेट

२४ तासांच्या आत चौकशी करून कारवाई करण्याचे आयुक्तांनी दिले जाधव यांना आश्वासन...

Jan 06, 2026 13:33 (IST)

Latur Election LIVE Updates: रवींद्र चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

लातूर जिल्हाभर रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर अनंतपाळ रेणापूर या शहरांमधे रविंद्र चव्हानांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरीकांमधे रोषाचे वातावरण पहायला मिळत आहे.

Advertisement
Jan 06, 2026 12:26 (IST)

Latur Election LIVE Updates: रविंद्र चव्हाणांनी माफी मागावी, भाजप कार्यकर्त्यांची मागणी

लातूर जिल्ह्यामध्ये काल रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी याला विरुद्ध दर्शवला आहे रवींद्र चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी आता थेट भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

आज जे लातूर वैभव संपन्न आहे ते विलासराव देशमुख यांच्यामुळेच आहे त्यामुळे काल जे वक्तव्य करण्यात आलेला आहे ते चुकीचा असल्याचं भाजप कार्यकर्ते देखील म्हणतात. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपमध्ये देखील नाराजी पाहायला मिळाली.

Jan 06, 2026 12:09 (IST)

Latur Election LIVE Updates: 'विलासरावांच्या चिरंजीवांची दिलगिरी व्यक्त करतो: रविंद्र चव्हाण

विलासराव फार मोठे नेते होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. मात्र त्यांनाच पुढे करुन काँग्रेस लातूरमध्ये मते मागत आहे. त्यामुळे त्याठिकाणी आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेले काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्याठिकाणी केलेले काम, या विकासात्मक दृष्टीच्या मी असं बोललो. तरीही त्यांच्या चिरंजीवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो: रविंद्र चव्हाण 

Advertisement
Jan 06, 2026 11:18 (IST)

BMC Election LIVE Updates: उद्धव ठाकरेंकडून मीनाताई ठाकरेंना अभिवादन

मीनाताई ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंकडून अभिवादन.. शिवाजी पार्क परिसरातील स्मारकाचे दर्शन घेत केले अभिवादन! 

Jan 06, 2026 11:04 (IST)

Nashik Election LIVE Update: नाशिकचे दोन माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

* नाशिकचे दोन माजी महापौर थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश 

* माजी महापौर दशरथ पाटील आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांचा मुंबईत प्रवेश सोहळा

* दुपारी बारा वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा 

* माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील शिवसेनेकडून सातपूर मध्ये उमेदवार 

* तर अशोक मुर्तडक पंचवटी परिसरात लढत आहेत अपक्ष निवडणूक

Jan 06, 2026 11:03 (IST)

BMC Election LIVE Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराचा झंजावात आज सुरू, शाखा भेटींना सुरुवात करणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराचा झंजावात आज सुरू. 

आज पासून राज ठाकरे शाखा भेटींना सुरुवात करणार 

 

मुंबईच्या पश्चिम उपनगरात गोरेगाव पासून दहिसर पर्यंत राज ठाकरे ठाकरे बंधूंच्या युतीच्या उमेदवारांच्या शाखांना भेटी देतील. 

दोन्ही ठाकरे बंधूंचा सभान ऐवजी शाखा भेटींवर भर

Jan 06, 2026 10:16 (IST)

BMC Election LIVE Updates: शिंदे गटाच्या वचननाम्यात असणार हे महत्त्वाचे मुद्दे

वचननाम्यातील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे:

  • - लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना शासनाने आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला, दरम्यान आताच्या वचननाम्यात महिलांना आरोग्यासंदर्भात भेडसवणार्या महत्वाच्या प्रश्नांवर भर देण्यात आली आहे

  • - यात प्रामुख्याने महिलांमधील कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, महिलांसाठी कर्करोग रोगाची औषध मोफत केली जाणार

  • - तसेच स्तनाचा कर्करोग संदर्भातील सर्व चेक अप हे मोफत केले जाणार

  • - तसेच एम्सच्या धर्तीवर परळ येथील KEM रुग्णालय अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज केले जाणार

  • - यानंतर टप्या टप्याने पालिकेची इतर रुग्णालयही अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज केली जाणार

  • - तरुणांसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विद्यापीठाची स्थापना करून यात सर्व 'डिपलोमा कोर्सेस' हे सामान्य पदवी कोर्सेसपेक्षा अल्पदरात सुरू करणार

  • - या शिवाय मुंबईतील वाढते प्रदूषण लक्षात घेता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ  MPCBु आणि  BMC चे मिळून मुंबईत सध्या ७ एअर प्युरिफायर आहेत 

  • - मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी भविष्यात ६० एअर प्युरिफायर मुंबईत MPCB आणि  BMC तर्फे उभी केली जाणार

  • - तसेच वायुप्रदूषण रोखण्यासाठी  बेस्टच्या ताफ्यात ५ हजार मिनि ई-बेस्ट बसेस घेतल्या जाणार 

  • - याशिवाय मिठी नदी पुर्नजिवित प्रकल्प हाती घेण्यात येणार असून याशिवाय मुंबईतील ४ प्रमुख नद्या मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा यावर असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प STP याची व्याप्ती वाढवणार

  • - या शिवाय शहरातील विविध झोपडपट्टी परिसरातही छोटे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प STP उभारले जाणार ज्यामुळे जलप्रदूषण कमी होण्यास मदत होईल

  • - या शिवाय खड्डे मुक्त मुंबईसाठी मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काॅक्रीट केले जात असताना, मुंबईतील उपयुक्त सेवा  Utility services यामध्ये प्रामुख्याने वीज सेवा, पाणी पुरवठा, गॅस सेवा, केबल सेवासाठी भूयारी प्रकल्प राबवले जाणार आहेत. ज्याने करून वारंवार रस्ते खोदण्याची गरज भासणार नाही

  • - हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती.

  • - मुंबईत १९ हजारांपेक्षा पेक्षा जास्त सेस इमारती किंवा पागडी इमारती आहेत. तसेच मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी नवीन योजनेचीही घोषणा 


  • - त्याचबरोबर ५० एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खाजगी, शासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर एकत्रितपणे झोपडपट्टी पुनर्विकास योजना 
  •  या योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील १७ प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.


  • - नवी मुंबईतील सिडकोच्या आगामी लॉटरीमधील वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठीच्या किंमतीत १० टक्के कपात करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार असून नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे.

  • - मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी करून जोडणी सुलभ करणारे ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ — तिसरी वाहतूक व्यवस्था उभारणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले असून एमएमआरडीएकडून ‘इंटिग्रेटेड भुयारी रस्ता रोड नेटवर्क’साठी सविस्तर प्रकल्प अहवालासाठी (डीपीआर) प्रक्रिया सुरु (डीपीआर) करण्यात आली आहे

  • - यात विद्यमान रस्ते नेटवर्क आणि जलद गतीने विस्तारत असलेल्या मेट्रो रेल्वे नेटवर्कसोबत हे मुंबईसाठी तिसरे प्रवासाचे माध्यम ठरणार आहे. या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांतर्गत, मुंबई कोस्टल रोड, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) यांना जोडणारा भूमिगत कॉरिडॉर उभारण्याचा संकल्प आहे.

Jan 06, 2026 10:14 (IST)

PMC Election LIVE Update: पुण्यामध्ये अजित पवार घेणार उमेदवारांची बैठक

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार ॲक्शन मोडवर 

अजित पवार घेणार आज उमेदवारांची बैठक

दुपारी २  वाजता पुण्यातील सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आज अजित पवार घेणार बैठक

आज पुणे शहरातील सर्व प्रभागातील उमेदवारांची अजित पवार घेणार भेट

महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवार देणार उमेदवारांना कानमंत्र

Jan 06, 2026 10:14 (IST)

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर होणार

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिंदेंच्या शिवसेनेकडून लवकरच 'वचननामा' जाहिर केला जाणार आहे.  या वचननाम्यात शासनाकडून मंजूर करून घेतलेल्या विकासकामांसह नव्या योजनांची घोषणा करणारा हा 'वचननामा' असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

स्वच्छ सुंदर आणि नियोजित शहर बनविण्याच्या हेतूने हा 'वचननामा' बनवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे हा 'वचननामा' तयार करताना सर्वच वयोगटातील नागरिकांचा विचार करून त्याची आखणी करण्यात आली असून हा 'वचननामा' लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहिर केला जाणार आहे. 

Jan 06, 2026 09:22 (IST)

Kolhapur Election LIVE Update: समरजीत सिंह घाटगे भाजपच्या वाटेवर, लवकरच होणार पक्षप्रवेश?

समरजीत सिंह घाटगे यांच्या भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब?

पक्षप्रवेशापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याची शक्यता 

फेब्रुवारीमध्ये पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होण्याची शक्यता 

कागल नगरपालिका निवडणुकीत मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली 

घाटगे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात सक्रीय नसल्याने वेगळी भूमिका घेणार असल्याच्या दोन महिन्यापासून चर्चा

Jan 06, 2026 09:01 (IST)

Nagpur Election LIVE Updates: नागपूरमध्ये भाजपला धक्का, बंडखोरांना ठाकरे गटाची उमेदवारी

 नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बंडखोरांचा मोठा फटका बसत आहे. भाजपमध्ये महामंत्री पदावर काम केलेले सुनील मानेकर आणि अपर्णा मानेकर यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. गेल्या २५ वर्षांपासून काम करूनही भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पती-पत्नीला तिकीट मिळाल्याचे मानेकर दाम्पत्याने सांगितले.

Jan 06, 2026 08:59 (IST)

Ahilyanagar Election LIVE Updates: आमदाराचे बॉडीगार्ड उमेदवाराच्या घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे, सुषमा अंधारेंचा आरोप

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक व बॉडीगार्ड यांचा एक व्हिडिओ शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वर पोस्ट केला आहे.

त्यामध्ये आमदार संग्राम जगताप सोबत नसतानाही जगताप यांचे स्वीय सहाय्यक आणि बॉडीगार्ड नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या समोरच्या पक्षाचे उमेदवाराच्या घराबाहेर रिव्हाॅल्वर घेऊन उभे आहेत असं ट्विट त्यांनी केलं आहे. या घटनेबाबत अद्याप कोणतेही तक्रार दाखल झालेली नाही.

Jan 06, 2026 08:55 (IST)

Solapur Election LIVE Update: MIMचे अध्यक्ष औवेसींची आज सोलापूरमध्ये सभा

एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदूद्दीन ओविसी आज सोलापूर दौऱ्यावर

सोलापुरातील पानगल हायस्कुल येथे संध्याकाळी 6 वाजता ओविसी यांची जाहीर सभा होणार आहे

सभेच्या निमित्ताने एमआयएमच्या वतीने जाहिरातबाजी सुरूय 

या जाहिरातीत पक्षाला सोडचिट्टी दिलेले नेते फारुख शाब्दी यांचा फोटो वापरण्यात आलंय 

फारुख शाब्दी हे एमआयएम राज्यातील पहिल्या फळीतील नेते होते 

मात्र ऐन निवडणुकीत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने एमआयएममध्ये एकच खळबळ उडाली होती 

मात्र एमआयएम सोडल्यानंतर शाब्दी यांनी अद्याप कुठे ही प्रवेश केलेला नाही 

त्यामुळे आज असदुद्दीन ओविसी हे शाब्दी यांच्या बद्दल काही बोलतात का? हे पाहावं लागणार आहे

Jan 06, 2026 08:12 (IST)

Maharashtra Election LIVE Update: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता

महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक पुढील ४८ तासात जाहीर होण्याची शक्यता

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता 

जानेवारी पेक्षा थोडा कालावधी जास्त वाढवून घेण्यासाठी कोर्टाला विनंती राज्य निवडणूक आयोग करण्याची शक्यता 

जानेवारी अखेर पर्यंत सर्व राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावे आदेश कोर्टाने दिले आहे पण सर्वोच्च न्यायालयाची अतिरिक्त आरक्षण  कोटा झाल्ेल्या जिल्हा परिषद संदर्भात पुढील आठवड्यात सुनावणी आहे. त्यात दरम्यान विनंती आयोग करण्याची शक्यता

Jan 06, 2026 06:58 (IST)

Latur Election LIVE Updates: रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने नवा वाद

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये नवा वाद निर्माण झालेला आहे.  लातूर जिल्ह्यामध्ये आज रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर निवडणुकीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. या संदर्भात कार्यकर्ते, नेते आणि लातूरची जनता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे-

Jan 06, 2026 06:57 (IST)

Maharashtra Election LIVE Update: राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज ठरणार

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर महापालिकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यानंतर दोन्ही नेते पत्रकारांशी संवाद साधतील

Jan 06, 2026 06:57 (IST)

Maharashtra Election LIVE Update: राज्य निवडणूक आयोगाची बैठक, पंचायत समिती, झेडपी निवडणुकांची घोषणा होणार

 राज्य निवडणूक आयोगाची आज बैठक होणार आहे.  आज आणि ७ जानेवारीला होणाऱ्या या बैठकीत महापालिका निवडणुकीची तयारी आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. बुधवारी किंवा गुरुवारी या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे

Jan 06, 2026 06:55 (IST)

Akola Election LIVE Update: अकोल्यात निवडणूक खर्चावर राज्य निवडणूक आयोगाची करडी नजर

अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागात राज्य निवडणूक आयोगाच्या विशेष पथकाने पाहणी सुरू केली आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा पाळली जाते की नाही, यावर पथकाचे बारकाईने लक्ष आहे. उमेदवारांकडून होणारी पैशाची उधळण, बेकायदेशीर जाहिरातबाजी, भेटवस्तू वाटप तसेच रोख रकमेच्या व्यवहारांवर कडक नजर ठेवली जात आहे. आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही आयोगाने दिला आहे. या तपासणीमुळे उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.

Jan 06, 2026 06:54 (IST)

Nagpur Election LIVE Update: नागपुरात आज पासून प्रचाराचा मोठा धडाका

नागपूर शहरात महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचा दिवस ठरणार आहे.. काँग्रेस आणि भाजप सेना महायुती दोन्ही साठी आज पासून मोठे नेते प्रचाराचा धडाका सुरू करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात असणार आहेत. 

नागपूर महानगर पालिकेच्या कामकाजा विषयी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेस पक्षातर्फे भूमिका मांडतील. त्यानंतर सपकाळ काँग्रेस पक्षाच्या सर्व म्हणजे 151 उमेदवारांशी संवाद साधणार असून त्यांना निवडणुकीतील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करणार आहेत. प्रचारादरम्यान कोणती काळजी घ्यावी, काय करावे, काय करू नये, पक्षाची भूमिका आदींवर ते उमेदवारांना मार्गदर्शन करतील असे पक्षातर्फे सांगण्यात येत आहे.