6 minutes ago

Maharashtra Civic Polls, Municiple Corporation Election 2026 Vote Counting LIVE Updates: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर आज महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सर्व महानगरपालिकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. राज्यभरात फिस्कटकेल्या युत्या, तयार झालेली नवी समीकरणे आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने कोणत्या शहरात कोणाचा महापौर होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने थेट भाजपला दिलेले आव्हान, कोल्हापूरमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी लावलेली ताकद, सांगलीमध्ये विशाल पाटील, विश्वजीत कदम, जयंत पाटील यांनी एकत्रित येत दिलेला विजयाचा नारा त्यामुळे आजचा निकाल अनेकार्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निकालामध्ये महायुती राज्यात पुन्हा एकदा वरचढ चढणार की विरोधक मुसंडी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 16, 2026 12:28 (IST)

Kolhapur Election Result LIVE Updates: प्रभाग क्रमांक चारमधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी

 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवलेले राजेश लाटकर विजयी 

 छत्रपती घराण्यातून काँग्रेस उमेदवारी माघारी घेतल्यानंतर लाटकर यांना तिकीट मिळालं होतं 

 विधानसभेत पराभूत झाल्यानंतर त्यांनी महानगरपालिका निवडणूक लढवली

 नगरसेवक पदासाठी ते प्रभाग क्रमांक चार मधून निवडून आले आहेत

 प्रभाग क्रमांक चारमधून काँग्रेसचे चारही उमेदवार  विजयी 

 स्वाती कांबळे, विशाल चव्हाण दीपाली घाटगे, राजेश लाटकर विजयी

Jan 16, 2026 12:27 (IST)

Pimpri Chinchwad Election Result LIVE Update: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची लाट, तब्बल 70 जागांवर आघाडी

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 70

शिवसेना - 06

राष्ट्रवादी - 40

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00

राष्ट्रवादी (शरद पवार) - 01

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 01

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 01

Jan 16, 2026 12:25 (IST)

Solapur Election Result LIVE Updates: सोलापूरमध्ये भाजपचे आणखी चार उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक पाच मधून

 भाजपचे  समाधान आवळे , अलका भवर, मंदाकिनी तोडकर आणि बिज्जू प्रधाने  या चार उमेदवार यांच्या विजया नंतर भाजपचा जल्लोष 

राष्ट्रवादी काँग्रेस 

अजित पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा धक्कादायक पराभव...

Jan 16, 2026 12:25 (IST)

Solapur Election Result LIVE Updates: सोलापूरमध्ये भाजपचे आणखी चार उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक पाच मधून

 भाजपचे  समाधान आवळे , अलका भवर, मंदाकिनी तोडकर आणि बिज्जू प्रधाने  या चार उमेदवार यांच्या विजया नंतर भाजपचा जल्लोष 

राष्ट्रवादी काँग्रेस 

अजित पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा धक्कादायक पराभव...

Advertisement
Jan 16, 2026 12:24 (IST)

Solapur Election Result LIVE Updates: सोलापुरात भाजपने गाठला बहुमताचा आकडा

सोलापुरात भाजपने गाठला बहुमताचा आकडा 

आतापर्यंत 24 जागावर भाजपचा विजयी तर 30 कागवरजागावर भाजप आघाडीवर

सोलापूर महापालिकेत एकूण 102 जागा असून बहुमतासाठी 51 जगाची आवश्यकता

Jan 16, 2026 12:24 (IST)

Jalgaon Election Result LIVE Updates: कारागृहातून निवडणूक लढवणारे ललित कोल्हे विजयी

कारागृहातून निवडणूक लढवणारे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ललित कोल्हे विजय

शिवसेना शिंदे गटाचे ललित माजी महापौर असलेले ललित कोल्हे यांनी कारागृहातून निवडणूक लढवली होती. 

बोगस कॉल सेंटर प्रकरणांमध्ये ललित कोल्हे यांना अटक झाली असून ते नाशिक कारागृहात आहेत

महापालिका निवडणुकीमध्ये ललित कोल्हे यांच्याबरोबरच त्यांचे चिरंजीव पियुष कोल्हे हे देखील विजय झाले आहेत, 

महापालिका निवडणुकीमध्ये कोल्हे कुटुंबातील पिता पुत्राचा विजय..

विजयानंतर विजयी उमेदवार पियुष कोल्हे तसेच ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत जव्हेरी यांनी..

Advertisement
Jan 16, 2026 12:23 (IST)

Chhatrapati Sambhajinagar Election Result LIVE Updates: संजय शिरसाट यांचा मुलगा- मुलगी विजयाच्या उंबरठ्यावर

पालकमंत्री संजय शिरसाठ यांचा मुलगा सिद्धांत शिरसाठ प्रभाग 29 मधून विजयाच्या उंबरट्यावर

तर हर्षदा शिरसाठ प्रभाग 18 मधून विजयाच्या उंबरठ्यावर

पालकमंत्र्याची दोन्ही मुलांचा विजय जवळपास निश्चित

Jan 16, 2026 12:16 (IST)

Pimpri Chinchwad Election LIVE Updates: पिंपरी चिचंवडमध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची बहुमताकडे वाटचाल, आघाडीत मॅजिक फिगर ओलांडली.

एकूण जागा - 128

भाजप - 65

शिवसेना - 04

राष्ट्रवादी - 28

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00

राष्ट्रवादी (शरद पवार) - 00

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 01

Advertisement
Jan 16, 2026 12:14 (IST)

Solapur Election LIVE Updates: सोलापुरात दोन माजी महापौरांचा पराभव

सोलापुरात दोन माजी महापौरांचा पराभव

प्रभाग २२ मधून काँग्रेसचे माजी महापौर संजय हेमगड्डी आणि प्रभाग २३ मधून शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर अलका राठोड पराभूत

संजय हेमगड्डी यांचा भाजप उमेदवार दत्तात्रय नडगिरे यांनी तर अलका राठोड यांचा भाजप उमेदवार ज्ञानेश्वरी देवकर यांना केला पराभव

Jan 16, 2026 12:13 (IST)

Sangli Election Result LIVE Updates: सांगलीत भाजप- काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निकाल

भाजप - 10

शिवसेना - 1

राष्ट्रवादी AP - 4

शिवसेना UBT - 00

मनसे - 00

राष्ट्रवादी SP - 00

काँग्रेस - 6

इतर - 00

Jan 16, 2026 12:12 (IST)

Kolhapur Election Result LIVE Updates: कोल्हापुरात काँग्रेसचे 7 उमेदवार विजयी

कोल्हापूर ब्रेकिंग 

काँग्रेसचे 7 विजयी, भाजपचे 11 विजयी शिवसेना शिंदे गटाचे विजयी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 विजयी तर जनसुराज्यचा 1 विजयी

अजुन काही प्रभागाचे निकाल बाकी, दुपारपर्यंत निकाल हाती येतील

Jan 16, 2026 12:08 (IST)

Solapur Election Result LIVE Update: सोलापुरात काँग्रेस भुईसपाट, भाजपचे 24 उमेदवार विजयी

सोलापुरात काँग्रेस उमेदवार स्पर्धेतही नाहीत..

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काँग्रेसचे सर्व उमेदवार पिछाडीवर 

सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांना निकालात मोठे धक्के..

सोलापुरात भाजपचे 24 उमेदवार विजयी 

24 उमेदवारांचा विजय तर 15 उमेदवार आघाडीवर 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 उमेदवार आघाडीवर तर शिवसेना 1 जागेवर आघाडीवर 

सोलापुरात काँग्रेस उमेदवार स्पर्धेतही नाहीत...

Jan 16, 2026 11:59 (IST)

Pune Election LIVE Updates: पुण्यात प्रशांत जगतापांची मुसंडी

काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप विजयी

 भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप जिंकले

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते... त्याच भाजपाच्या  अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी केला पराभव

प्रशांत जगतापांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं

प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला 


प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी लढवली निवडणूक अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप जिंकले

Jan 16, 2026 11:58 (IST)

Pune Election Result LIVE Updates: पुण्यात काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी

पुण्यामधून सर्वात मोठा निकाल समोर... व़ॉर्ड क्रमांक 8 मधून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप विजयी 

Jan 16, 2026 11:57 (IST)

Jalgaon Election Result LIVE Updates: प्रभाग क्रमांक 4 ड शिवसेना शिंदे गटाचे पियुष ललित कोल्हे विजयी

प्रभाग क्रमांक 4 ड शिवसेना शिंदे गटाचे पियुष ललित कोल्हे विजयी 

पियूष कोल्हे विजयी होताच  पियुष कोल्हे यांनी आपल्या आईला मारली मिठी 

विजयानंतर पियुष कोल्हे व त्यांच्या आईला अश्रू अनावर 

पियुष कोल्हे यांचे वडील माजी महापौर ललित कोल्हे व आजी सिंधू कोल्हे यादेखील शिवसेना शिंदे गटाकडून आघाडीवर

माजी महापौर ललित कोल्हे यांनी कारागृहातून लढवली निवडणूक 

कोल्हे कुटुंबातील पियुष कोल्हे हे विजयी झाल्याने कोल्हे कुटुंबीयांमध्ये आनंद तर ललित कोल्हे आणि सिंधू कोल्हे हे आघाडीवर

Jan 16, 2026 11:54 (IST)

Solapur Election Result LIVE Updates: सोलापुरात भाजपचा 16 जागांवर विजय...

सोलापुरात भाजपचा 16 जागांवर विजय...

सोलापुरात 16 जागांच्या विजयासह 30 ठिकाणी भाजपची आघाडी

भाजपसह , राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 उमेदवारही आघाडीवर

Jan 16, 2026 11:53 (IST)

Pimpri Chinchwad Election Result LIVE Update: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे अर्धशतक पूर्ण

पिंपरीत भाजपचे अर्थशतक पूर्ण.....

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 50

शिवसेना - 07

राष्ट्रवादी - 26

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00

राष्ट्रवादी (शरद पवार) - 00

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 02

Jan 16, 2026 11:52 (IST)

Pimpri Chinchwad Election Result LIVE Updates: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र पिछाडीवर

पिंपरी चिंचवड मध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे पिछाडीवर. भाजपचे कमलेश वाळके 6 मतांनी आघाडीवर. प्रभाग 9 मधील अजित पवार राष्ट्रवादीचे इतर तीन उमेदवार मात्र आघाडीवर.

Jan 16, 2026 11:51 (IST)

Amravati Election Result LIVE Updates: अमरावतीत मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ पराभूत

अमरावतीच्या बुधवारा प्रभागातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत, माजी महापौर विलास इंगोले विजयी... बुधवार प्रभागातून चारही जागांवर काँग्रेसचे वर्चस्व

Jan 16, 2026 11:48 (IST)

Kolhapur Election Result LIVE Updates: कोल्हापुरात काँग्रेसचे आणखी तीन उमेदवार विजयी

शिवसेने शिंदेच्या शीला सोनुले विजयी काँग्रेसचे रजनीकांत सरनाईक पराभूत

काँग्रेसच्या तेजस्विनी घोरपडे यांचा विजय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी पराभूत

काँग्रेसच्या तनिष्का सावंत विजय तर दीपा काटकर या भाजपच्या उमेदवार पराभूत

तिथं काँग्रेसचे प्रतापसिंह जाधव विजय तर शिवसेनेचे नंदकुमार मोरे पराभूत

प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी तर महायुतीतील शिंदे शिवसेनेचे एक उमेदवार विजयी

Jan 16, 2026 11:46 (IST)

Pune Pimpri Chinchwad Election Result LIVE Update: पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची आघाडी

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 42

शिवसेना - 07

राष्ट्रवादी - 22

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00

राष्ट्रवादी (शरद पवार) - 00

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 03

Jan 16, 2026 11:41 (IST)

Kolhapur Election Result LIVE Update: प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी

प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी 

शिवसेनेचे शारंगधर देशमुख विजयी तर काँग्रेस चे राहुल माने यांचा पराभव

 

भाजपचे विजयसिंह देसाई विजयी तर काँग्रेस नंदकुमार पिसे यांचा पराभव

 

भाजपच्या माधवी पाटील यांचा विजय तर काँग्रेसच्या पल्लवी यांचा पराभव

शिवसेनेच्या संगीता सावंत यांचा विजय तर काँग्रेसच्या विद्या देसाई यांचा पराभव 

प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी

Jan 16, 2026 11:39 (IST)

Pune Election Result LIVE Update: पुणेकरांनी गुंडांना नाकारले

पुण्यात गुंड बापू नायरसह, गजा मारणेची पत्नी पिछाडीवर..

ठाकरे गटाचे वसंत मोरे, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेही पिछाडीवर

Jan 16, 2026 11:37 (IST)

Nagpur Election Result LIVE Updates: नागपुरात भाजप सत्तेच्या जवळ

- नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा करिष्मा चालला असे म्हणता येईल

- ⁠नागपूरात भाजप सत्ता स्थानपेच्या जवळ पोहोचलीय 

- नागपूरात १५१ जागांपैकी सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप ६५ जागांवर आघाडी 

- नागपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ७६ जागांची गरज 

- भाजप नागपूर मनपात चौथ्यांदा सत्ता स्थापनेच्या जवळ

Jan 16, 2026 11:32 (IST)

Pune Election Result LIVE Updates: पुण्यात भाजपची त्सुनामी, तब्बल 47 जागांवर आघाडी

पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असतानाच प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ, बिबेवाडी येथील चित्र स्पष्ट झाले आहे. या प्रभागातून  भारतीय जनता पक्षचे तीन उमेदवार विजयी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही एक उमेदवार यशस्वी ठरला आहे.

भाजपकडून राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र शिंदे यांचा पराभव करत आपली जागा कायम राखली. घुले यांच्या विजयामुळे प्रभागात राष्ट्रवादीची उपस्थिती टिकून राहिली.

Jan 16, 2026 11:27 (IST)

Pune Election Results LIVE Updates: पुण्यामध्ये भाजपची मोठी आघाडी

पुण्यामध्ये भाजपची एकतर्फी आघाडी:

भाजप-47

राष्ट्रवादी आघाडी- 17

काँग्रेस- 3

Jan 16, 2026 11:26 (IST)

Kolhapur Election Result LIVE Update: कोल्हापुरात भाजपचे आणखी दोन उमेदवार विजयी

शिंदेंच्या शिवसेनेचे अजय इंगवले विजयी तर कॉंग्रेसचे दत्ता टिपूगडे पराभूत

भाजपच्या अर्चना उत्तम कोराने विजयी तर काँग्रेसच्या प्रनोती पाटील पराभूत

भाजपच्या पूर्वा राणे विजयी तर काँग्रेसच्या दीपा मगदूम आघाडीवर

जनसुराज्यचे अक्षय जरग यांचा विजय, शिवसेना ठाकरे गटाचे राहुल इंगवले आणि काँग्रेसचे महेश सावंत यांचा पराभव

प्रभाग 10 मध्ये महायुती 3 उमेदवार विजयी तर जनसुराज्य शक्तीचे 1 विजयी

Jan 16, 2026 11:23 (IST)

Pimpri Chinchwad Election Result LIVE Updates: पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची आघाडी

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 15

शिवसेना  - 02

राष्ट्रवादी - 14

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00

राष्ट्रवादी (शरद पवार) - 01

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 00

Jan 16, 2026 11:20 (IST)

Pimpri Chinchwad Election Result LIVE Updates: प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपचे राहुल कलाटे आघाडीवर

प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपचे राहुल कलाटे  आघाडीवर.....

प्रभाग क्रमांक 28 मधून राष्ट्रवादीचे नाना काटे आघाडीवर....

प्रभाग क्रमांक 26 मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे पिछाडीवर.....

प्रभाग क्रमांक 9 मधून विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे आघाडीवर.....

प्रभाग क्रमांक 24 मधून खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे आघाडीवर.....

प्रभाग क्रमांक 14 मधून शिवसेनेचे मारुती भापकर आघाडीवर......

प्रभाग क्रमांक 8 मधून माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे ( राष्ट्रवादी )  पिछाडीवर......

प्रभाग क्रमांक 1 मधून यश साने आघाडीवर

Jan 16, 2026 11:18 (IST)

Pune Election Result LIVE Updates: पुण्यात भाजपची मोठी आघाडी

पुण्यामध्ये भाजपची मोठी आघाडी: 

भाजपा  ४४

राष्ट्रवादी ४

कॅाग्रेस २

प्रशांत जगताप ५०० मतांनी पुढे

Jan 16, 2026 11:16 (IST)

Solapur Election Result LIVE Updates: सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग एक मधील भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर..

- सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग एक मधील भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर..

- भाजपचे चारही उमेदवार दुसऱ्या फेरीनंतर आघाडीवर..

- गौतम कसबे, राजश्री कणके, पुनम काशीद, अविनाश पाटील..

Jan 16, 2026 11:16 (IST)

Solapur Election Result LIVE Updates: सोलापुरात प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाचे चार उमेदवार विजयी

- सोलापुरात प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाचे चार उमेदवार विजयी

- भाजपचे अंबिका गायकवाड, किसन जाधव, चैताली गायकवाड, दत्तत्रय नडगिरी विजयी

Jan 16, 2026 11:12 (IST)

Jalgaon Election Result LIVE Update: जळगावमध्ये भाजप उमेदवार पिछाडीवर

जळगावच्या प्रभाग 14 मध्ये तिसऱ्या फेरी अखेर भाजपचं उमेदवार महाजन दांपत्य आघाडीवर

माजी महापौर जयश्री महाजन तसेच त्यांचे पती सुनील महाजन हे दोन्ही आघाडीवर

प्रभाग 14 तिसरी फेरी

सुनील महाजन  3046

जयश्री महाजन 2944

 राबियाबी खान 2716

ढेकळे 2765

Jan 16, 2026 11:10 (IST)

Pune Election Result LIVE Update: पुण्यात भाजप उमेदवारांची आघाडी कायम

प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम

स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर आणि स्वप्नाली पंडित या चार ही जणांची आघाडी कायम

मूळ पुणेकरांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग २५ मध्ये भाजप वर्चस्व राखण्याच्या तयारीत

Jan 16, 2026 11:09 (IST)

Kolhapur Election Result LIVE Updates: कोल्हापुरात काँग्रेसची आघाडी

महापालिका नाव - कोल्हापूर

BJP                      - 18

SHIVSENA          - 7

NCP                     - 3

CONGRES           - 21

SHIVSENA UBT  -2

NCP SP                -0

MNS                     - 0

OTHERS               -0

Jan 16, 2026 11:08 (IST)

Sangli Election Result LIVE Updates: सांगली- मिरजमध्ये भाजप- काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर

अपडेट - सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिका 

भाजप - 06

शिवसेना - 01

राष्ट्रवादी अजित पवार- 04

शिवसेना UBT - 00

मनसे - 00

राष्ट्रवादी SP - 00

काँग्रेस - 06

इतर - 01 ( जनसुराज्य )

Jan 16, 2026 11:07 (IST)

Kolhapur Election Result LIVE Updates: कोल्हापुरात काँग्रेस उमेदवारांची आघाडी

प्रभाग 9 मध्ये शिवसेनेची शारंगधर देशमुख 1700 अधिक मतांनी पिछाडीवर तर काँग्रेस चे राहुल माने आघाडीवर

 

भाजपचे विजयसिंह देसाई 2300 मतांनी आघाडीवर तर काँग्रेस नंदकुमार पिसे पिछाडीवर

 

 भाजपच्या माधवी पाटील आघाडीवर तर काँग्रेसच्या पल्लवी बोळाइकर पिछाडीवर

काँग्रेसच्या विद्या देसाई आघाडीवर तर  शिवसेनेच्या संगीता सावंत पिछाडीवर

प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती 2 उमेदवार आघाडीवर तर काँग्रेसचे 2 उमेदवार आघाडीवर

Jan 16, 2026 11:06 (IST)

Pune Election Result LIVE Updates: पुण्यात भाजपचे उमेदवार आघाडीवर

प्रभाग -४० कोंढवा येवलेवाडी 

दुसरी फेरी 

अ गट 

अर्चना जगताप (भाजप) - २४१३

बाळा कवडे (राष्ट्रवादी) - १२४१

दोन फेऱ्यानंतर आघाडी अर्चना जगताप - २३४९

ब गट 

वृषाली कामठे (भाजप) - २३८३

संगीता ठोसर (शिवसेना) - ८४७

वर्षा मारकड (राष्ट्रवादी) - १११९

आघाडी -  वृषाली कामठे २३४९

क गट 

पूजा कदम (भाजप) - २४७०

स्नेहल कामठे (काँग्रेस) - ४७४

सपना धर्मावत (राष्ट्रवादी) - ८९०

आघाडी - पूजा कदम - २७४९

ड गट 

रंजना टिळेकर (भाजप) - २३०९

गंगाधर बधे (राष्ट्रवादी) - ११११

रूपेश मोरे (शिवसेना उबाठा) - ६८९

आघाडी रंजना टिळेकर- २३९४

Jan 16, 2026 11:05 (IST)

Pune Election LIVE Updates: पुण्यात प्रभाग क्रमांक २३ मध्ये भाजपची मोठी आघाडी

प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम

स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर आणि स्वप्नाली पंडित या चार ही जणांची आघाडी कायम

मूळ पुणेकरांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग २५ मध्ये भाजप वर्चस्व राखण्याच्या तयारीत

Jan 16, 2026 11:05 (IST)

Pune Election LIVE Updates: पुण्यात प्रभाग क्रमांक २३ मध्ये भाजपची मोठी आघाडी

प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम

स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर आणि स्वप्नाली पंडित या चार ही जणांची आघाडी कायम

मूळ पुणेकरांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग २५ मध्ये भाजप वर्चस्व राखण्याच्या तयारीत

Jan 16, 2026 11:04 (IST)

Kolhapur Election Result LIVE Updates: कोल्हापुर इचलकरंजीत ११ उमेदवार विजयी

कसब्यात काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी बालेकिल्ला 

 कसबा बावडा येथील एका वार्डमध्ये चारही उमेदवार विजयी 

प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी

सुभाष बुचडे,पुष्पा नरुटे, पोवार रुपाली, चौगले सचीन

प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी: 

प्रमोद देसाई, वंदना मोहिते, राजनंदा महाडिक, विजयेंद्र माने अशी विजयी उमेदवारी

इचलकरंजीत पहिला निकाल: भाजपचे 3 उमेदवार विजयी

इचलकरंजी - वाॕर्ड 7 शिव शाहू विकास आघाडी 4 उमेदवार विजयी

मनोज हिंगमिरे

मनिषा कुपटे

मोनाली मांजरे

दिलिप झोळ (शिवसेना शिंदे गट)

Jan 16, 2026 11:01 (IST)

Kolhapur Election Result LIVE Updates: कसब्यात काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी बालेकिल्ला 

 कसबा बावडा येथील एका वार्डमध्ये चारही उमेदवार विजयी 

प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी

सुभाष बुचडे,पुष्पा नरुटे, पोवार रुपाली, चौगले सचीन

Jan 16, 2026 10:56 (IST)

Kolhapur Election Result LIVE Update: कोल्हापूरमध्ये भाजपचे आठ उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी 

प्रमोद देसाई, वंदना मोहिते, राजनंदा महाडिक, विजयेंद्र माने अशी विजयी उमेदवारी

Jan 16, 2026 10:56 (IST)

Pune Election LIVE Update: पुण्यात भाजपची मोठी आघाडी, राष्ट्रवादीला धक्का

पुण्यात १८ जागी भाजपा पुढे...

भाजप-१८

राष्ट्रवादी- २

कांग्रेस- ०

प्रभाग क्रमांक 1 मधून 

अनिल टिंगरे भाजपचे आघाडीवर  

प्रभाग क्रमांक 20 मधून 

राजेंद्र शेळमकर भाजपच्या आघाडीवर

Jan 16, 2026 10:53 (IST)

Solapur Election Result LIVE Update: सोलापूरमध्ये भाजपचे चार उमेदवार आघाडीवर

सोलापूर नहापालिकेतील प्रभाग 8 मधील भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर

अमर पुदाले, गीता गवई, बबिता धूम्मा, प्रवीण दर्गोपाटील आघाडीवर...

सोलापूर महापालिकेतील प्रभाग 10 मधील भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर 

भाजपचे उमेदवार प्रथमेश कोठे,उज्वला दासरी,दिपीका यलदंडी,सतीश सिरसिल्ला हे आघाडीवर

Jan 16, 2026 10:52 (IST)

Ichalkaranji Election LIVE Updates: इचलकरंजीत पहिला निकाल: भाजपचे 3 उमेदवार विजयी

इचलकरंजी - वाॕर्ड 7 शिव शाहू विकास आघाडी 4 उमेदवार विजयी

मनोज हिंगमिरे

मनिषा कुपटे

मोनाली मांजरे

दिलिप झोळ (शिवसेना शिंदे गट)

Jan 16, 2026 10:51 (IST)

Nashik Election Result LIVE Update: नाशिकमध्येही भाजपला मोठी आघाडी, शिंदे गटाची 4 जागांवर आघाडी

एकूण जागा- १२२

भाजप - ०६

शिंदेंची शिवसेना - ०४

राष्ट्रवादी अजित पवार  - ०१

ठाकरेंची शिवसेना - ०१

काँग्रेस - ०

मनसे-०१

राष्ट्रवादी शरद पवार गट - ०१

आरपीआय - ०१

इतर - ०१

Jan 16, 2026 10:49 (IST)

Pune Election Result LIVE Update: पुण्यात भाजप आघाडीवर, दिग्गजांना धक्का

पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची मोठी आघाडी.. भाजप 11 जागांवर आघाडीवर

संगीता दांगट: भाजप.. आघाडीवर

अभिजीत शिवरकर: आघाडीवर

राजेंद्र शिळीमकर आघाडीवर

भाजपा १२

राष्ट्रवादी ३

कॅाग्रेस १

Jan 16, 2026 10:46 (IST)

Sangli Election Result LIVE Updates: सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निकाल

सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिका 

भाजप - 03

शिवसेना - 02

राष्ट्रवादी - 00 

शिवसेना UBT - 00

मनसे - 00

राष्ट्रवादी SP - 03

काँग्रेस - 02

इतर - 02 ( जनसुराज्य )

Jan 16, 2026 10:43 (IST)

Nagpur Election Result LIVE Updates: नागपूर महानगरपालिका निकालात भाजपची आघाडी

नागपूर महानगरपालिका निकालात कोण आघाडीवर?

भाजप- 25

शिवसेना- 02

काँग्रेस- 12

Jan 16, 2026 10:43 (IST)

Pune Election Result LIVE Update: पुण्यामध्ये प्रशांत जगताप आघाडीवर

पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांना धक्का... प्रशांत जगताप पिछाडीवर

प्रशांत जगताप ८७३

अभिजीत शिवरकर १००९ मते:

Jan 16, 2026 10:38 (IST)

Pune Election Result LIVE Updates: पुण्यात ईव्हीएम मतमोजणीत भाजपला आघाडी

पुण्यामध्ये ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात:

 भाजपा ९

राष्ट्रवादी ३

पुण्यात नोटा ला मोठ्या प्रमाणात मतदान:

सगळ्याच प्रभागात नोटाला मतदान:

भाजपा EVM मध्ये ९ ठिकाणी पुढे:

Jan 16, 2026 10:33 (IST)

Kolhapur Election Result LIVE Update: कोल्हापुरात काँग्रेसची आघाडी

महापालिका नाव - कोल्हापूर

भाजप - 15

शिवसेना शिंदे - 7

NCP (अजित पवार) - 3

काँग्रेस - 17

शिवसेना UBT -2

NCP शरद पवार -0

AAP

मनसे - 0

OTHERS -0

Jan 16, 2026 10:31 (IST)

Pune Election Result LIVE Updates: पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंना धक्का, पहिल्या कलात पिछाडीवर

पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये धक्कादायक कल: राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील पिछाडीवर

Jan 16, 2026 10:29 (IST)

Kolhapur Election Result LIVE Updates: कोल्हापुरमध्ये काँग्रेसची आघाडी

कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे राहुल माने सुरुवातीच्या कलात आघाडीवर. 

माजी स्थायी समिती सभापती शिवसेनेचे उमेदवार शारंगधर देशमुख पिछाडीवर:

प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपच्या राजनंदा महाडिक आणि वंदना मोहिते टपाली मतदानात आघाडीवर

Jan 16, 2026 10:28 (IST)

Election Result LIVE Updates: इचलकरंजी महानगरपालिकेत भाजप आठ जागांवर आघाडी

इचलकरंजी:

इचलकरंजी महानगरपालिकेत भाजप आठ जागांवर आघाडी

शिव शाहू आघाडी तीन जागांवर आघाडीवर.

Jan 16, 2026 10:25 (IST)

Chhatrapati Sambhajinagar Election Result LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप- MIMमध्ये रस्सीखेच

छत्रपती संभाजी नगर  निकाल

115/ 

भाजप  : 8

शिवसेना : 4

शिवसेना UBT :  3

एमआयएम :  4

काँग्रेस : 1

राष्ट्रवादी 00

राष्ट्रवादी SP 00

Jan 16, 2026 10:25 (IST)

Pimpri Chinchwad Election Result LIVE Updates: पिंपरी चिंचवड ला जमावबंदी लागु.. परवानगी शिवाय मिरवणुका नाहीच

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदान मतमोजणी होत असताना पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे....पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मतमोजणी होत असताना संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आली असुन परवानगीशिवाय मिरवणुका काढता येणार नाही शिवाय पोलिसांच्या आदेशाचे पालन करणे बांधकारक रहाणार आहे 

Jan 16, 2026 10:24 (IST)

PCMC Election Result LIVE Update: पिंपरी चिंचवडमध्येही भाजपची आघाडी

पिंपरी चिंचवड महापालिका

पोस्टल मतमोजणी आघाडी

एकूण जागा - 128

भाजप - 05

शिवसेना - 01

राष्ट्रवादी - 03

काँग्रेस - 0

शिवसेना (उद्धव ठाकरे) -

राष्ट्रवादी (शरद पवार) - 01

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 0

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) -0

Jan 16, 2026 10:21 (IST)

Jalgaon Election Result LIVE Update: जळगावात उमेदवार प्रतिनिधी मोबाइल घेऊन केंद्रात, गोंधळाचं वातावरण

जळगावात उमेदवार प्रतिनिधी मोबाइल घेऊन केंद्रात, गोंधळाचं वातावरण 

जळगावमधील मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवाराचा एक उमेदवार प्रतिनिधी थेट मोबाईल घेऊन गेल्यामुळे गोंधळ उडाला होता. कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी चांगलेच खडसावले. जळगावमध्ये पोस्टल मतदानात महायुती आघाडीवर असून पोस्टल मतदानात महायुतीमधून भाजप पुढे आहे.

Jan 16, 2026 10:21 (IST)

Pune Election Result LIVE Update: पुण्यात भाजपची मोठी आघाडी, राष्ट्रवादीला धक्का

पुण्यात भाजपची आघाडी: 32 जागा

राष्ट्रवादी १४

प्रभाग २९,३० आणि ३२ ची टपाल मोजणीला सुरुवात:

डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी, कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी आणि वारजे पॉप्युलर नगर प्रभागाच्या मतमोजणीला सुरुवात

प्रभाग 33 

टपाली मतमोजणी सुरू.. 20 मिनिटात evm मधील मतमोजणी सुरू होईल : निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार

धनकवडी सहकारनगर प्रभाग 36 टपाली मोजणी ल सुरुवात

प्रभाग 36 ची मतमोजणी सुरू होईल त्या नंतर 37 ची आणि शेवट 38 ची

Jan 16, 2026 10:19 (IST)

Kolhapur Election Result LIVE Update:कोल्हापुरात पहिला कल समोर, सतेज यंत्रणा सुसाट

महापालिका नाव - कोल्हापूर

भाजप - 10

शिवसेना शिंदे - 6

NCP (अजित पवार) - 3

काँग्रेस - 12

शिवसेना UBT -0

NCP शरद पवार -0

AAP

मनसे - 0

Jan 16, 2026 10:17 (IST)

Nashik Election Result LIVE Update: नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार आघाडीवर

नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 29 मधून टपाली मतादानात अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघडीवर

Jan 16, 2026 10:16 (IST)

Solapur Election Result LIVE Update: सोलापुरात भाजप 14 जागांवर आघाडीवर

सोलापूर 

सोलापुरात 14 जागांवर भाजपा आघाडीवर. 

काँग्रेस आणि शिवसेनांशिंदे गट प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर...

Jan 16, 2026 10:15 (IST)

Pune Election LIVE Updates: पिंपरी चिंचवडमध्ये भाजप- राष्ट्रवादीत टक्कर

पिंपरी चिंचवड  पोस्टल मतमोजणीला सुरुवात

पोस्टल मतमोजणीत भोसरी विधानसभेत भाजप आघाडीवर 

पोस्टल मतमोजणीत पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी आघाडीवर. 

पोस्टल मतमोजणीत चिंचवड विधानसभेत भाजप आणि  राष्ट्रवादीत काटे की टक्कर.......

Jan 16, 2026 10:13 (IST)

Jalna Election Result LIVE Updates: जालना मतमोजणी केंद्रावर पोलिस आणि भाजपच्या उमेदवारामध्ये गोंधळ

जालना मतमोजणी केंद्रावर पोलिस आणि भाजपच्या उमेदवारामध्ये गोंधळ..

उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत प्रवेश करताना उडाला गोंधळ..

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उडाला गोंधळ..

पोलिसांनी भाजपच्या उमेदवाराला काढले बाहेर..

प्रशासनाचा कारभार नियोजन शून्य असल्याचा भाजपच्या उमेदवाराचा आरोप..

Jan 16, 2026 10:12 (IST)

Parbhani Election Result LIVE Update: परभणी शहर महापालिकेसाठी मतमोजणीला सुरुवात

परभणी शहर महापालिकेसाठी मतमोजणीला सुरुवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात 69 टेबलवर होतेय मतमोजणी

मतमोजणी केंद्रावर पोलिस तपासणी करून उमेदवारांच्या प्रतिनिधींना सोडण्यात आले मतमोजणी कक्षात

411 उमेदवारांच्या भवितव्याचा होणार फैसला

परभणी नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार पुढील काही तासात चित्र स्पष्ट होणार

Jan 16, 2026 10:11 (IST)

Chhatrapati Sambhajinagar Election Result LIVE Updadate: संभाजीनगरमध्ये भाजपची आघाडी

छत्रपती संभाजी नगर  निकाल

115/ 

भाजप 4 

शिवसेना 3

शिवसेना UBT 3

एमआयएम 5

काँग्रेस1

राष्ट्रवादी 00

राष्ट्रवादी SP 00

Jan 16, 2026 10:09 (IST)

Pune Election Result LIVE Update: पुण्यामध्ये मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतमोजणीत कोणाला आघाडी?

प्रभाग क्रमांक 22ची मतमोजणी सूरु झाली आहे

प्रभाग क्रमांक 7आणि 12 ची मतमोजणी सुरू

त्याचबरोबर प्रभाग क्रमांक २०,२१ आणि २६ च्या मतमोजणी ला सुरुवात 

टपाल मतमोजणी पूर्ण झाली असून evm च्या मतमोजणीला सुरुवात

Jan 16, 2026 10:07 (IST)

Kolhapur Election Result LIVE Update: कोल्हापुरमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाला काही क्षणात सुरुवात होणार... 81 सदस्य पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. तर महायुती एकत्र लढत आहे. त्यामुळे काँग्रेस कशी छाप पाडणार हे पाहणं महत्वाचं आहे. चार मतमोजणी केंद्रावर ही मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला पोस्टल मतमोजणी सुरु होईल...

Jan 16, 2026 10:06 (IST)

Solapur Election Result LIVE Update: सोलापुरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात, पहिला कल भाजपच्या बाजूने

सोलापुरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात..

पोस्टल मतमोजणीचे कौल भाजपाच्या बाजूने..

सोलापुरात भाजप बाजूने आले पहिले कौल

Jan 16, 2026 10:05 (IST)

Pune Election Result LIVE Update: पुण्यात मतमोजणीला सुरुवात

पुणे प्रभाग क्र २५ मतमोजणी सुरवात

सुरवातीला टपाल मतमोजणी सुरू 

evm २० टेबल मतमोजणी 

२ पोस्टल बॅलेट टेबल

पुण्यातील जिजाऊ मंगल कार्यालय मतमोजणी केंद्रात पोस्टल मतमोजणीला सुरुवात

प्रभाग १८,१९,४१ प्रभागाची मतमोजणी या केंद्रावर सुरु

Jan 16, 2026 10:00 (IST)

Pune Election Result LIVE Update: पुण्यात पुन्हा झळकले भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचे बॅनर

पुण्यात पुन्हा झळकले भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचे बॅनर 

लहू बालवडकर यांच्या विजयाचे बॅनर झळके चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये 

गणेश बिडकरांच्या बॅनर नंतर लहू बालवाडकरांचे देखील बॅनर झळकले 

मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याआधीपासूनच झळकले बॅनर

Jan 16, 2026 09:58 (IST)

Pune Election Result LIVE Updates: पुण्यामध्ये मतमोजणीला सुरुवात

कोथरुडमध्ये मतमोजणीला सुरुवात: 

पुण्यातील दीनदयाल शाळा येथे प्रभाग २९, ३० आणि ३२ ची मतमोजणी

पुण्यातील कोथरूड मधील सगळ्यात प्रमुख प्रभागांची मोजणी 

सर्वांत प्रथम टपाली मतमोजणीला सुरुवात होईल

टपाली मतमोजणी नंतर कंट्रोल युनिटच्या मतमोजणीला सुरुवात होईल

उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी

Jan 16, 2026 09:49 (IST)

Nagpur Election Result LIVE Update: नागपूर महानगरपालिका निकाल: थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुुरुवात

नागपूर : दहा वाजता स्ट्राँग रूम मधून ईव्हीएम यंत्रे मतमोजणी साठी आणली जातील..तिथे व्यवस्था अशी आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे 20 टेबल EVM करिता तसेच पोस्टल ballot साठी 4 टेबल्स ची व्यवस्था आहे.

प्रत्येक ठिकाणी पाच ते सहा rounds अपेक्षित आहेत. पहिल्या अर्धा तासात कल स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. पहिल्या राऊंड ला अर्धा तास आणि त्यानंतर फारसे आक्षेप वगैरे नसल्यास प्रत्येक राऊंडला अंदाजे सरासरी 20 मिनिटे अपेक्षित आहेत.12 ते 1 दरम्यान नागपूर महानगर पालिकेचे अधिकांश निकाल आलेले असतील.

Jan 16, 2026 09:42 (IST)

Nashik Election Result LIVE Update: नाशिकमध्ये उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

- प्रबोधनकार ठाकरे येथील मतदान मोजणी केंद्रावर उमेदवार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची 

- महापालिकेकडून  ओळखपत्र दिलेले असतानाही  आधार कार्ड आणि ओरिजनल ओळखपत्राचे मागणी केल्यामुळे बाचावाची 

- मतमोजणी केंद्रात उमेदवार प्रतिनिधींना आत मध्ये प्रवेश देताना  करण्यात आली तपासणी 

- तपासणी दरम्यान पोलिस आणि  उमेदवार प्रतिनिधींमध्ये  बाचाबाची...

Jan 16, 2026 09:40 (IST)

Pune Election Result LIVE Update: पुणे शहरातील सर्वात पहिला निकाल प्रभाग ३९ चा लागणार

पुणे शहरातील सर्वात पहिला निकाल प्रभाग ३९ चा लागणार

शहरातील सर्वात कमी मतदारसंख्या प्रभाग ३९ मध्ये

पुण्यातील प्रभाग ३९ अप्पर- सुपर- इंदिरा नगर या प्रभागाचा निकाल लवकर हाती येण्याची शक्यता

प्रभाग ३९ मध्ये एकूण ७० बूथ असून पहिल्या राउंडसाठी ४० मिनिट लागणार

प्रभाग ३९ मध्ये भाजपला राष्ट्रवादी चे आवाहन

प्रभाग ३८ हा पुणे शहरातील सर्वात मोठा प्रभाग असून ५ नगरसेवक या प्रभागातून निवडले जाणार 

राष्ट्रवादीकडून या प्रभागात गुंड बापू नायर ला उमेदवारी तर भाजपकडून प्रमोद ओसवाल मैदानात

Jan 16, 2026 09:36 (IST)

Chhatrapati Sambhajinagar Election Result LIVE Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज

महानगरपालिका निवडणूक निकालाआधी छत्रपती संभाजीनगरमधून मोठी घडामोड समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या शासकीय इंजीनियरिंग कॉलेजमध्ये उमेदवाराच्या प्रतिनिधीला आत मध्ये येण्यावरून पोलिसांमध्ये वाद झाला.

 यावरून पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधीला लाठीचार्ज केला. मतदान केंद्रावर हा मोठा राडा झाला आहे. पोलिसांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये राडा..  विकास जैन असं पोलिसांकडून मारहाण करण्यात आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. 

Jan 16, 2026 09:33 (IST)

Nashik Election Result LIVE Update: नाशिकमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

नाशिकच्या मुंबईनाका परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरूवात:

 प्रभाग क्रमांक 7, 12 आणि 24 साठी पार पडणार मतमोजणी प्रक्रिया

थोडाच वेळात टपाली मतमोजणीने होणार सुरुवात

त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला होणार सुरूवात

एकूण 4 फेऱ्या होणार असून 24 टेबलवर होणार मतमोजणी

Jan 16, 2026 09:29 (IST)

Solapur Election Result LIVE Update: सोलापुरात मतमोजणीची तयारी पूर्ण

सोलापुरात मतमोजणीची तयारी पूर्ण,  प्रभागनिहाय होणार मतमोजणी 

सोलापूर महापालिकेतील 26 प्रभागसाठी 7 ठिकाणी होत आहे मतमोजणी 

जवळपास 3 ते 5 फेऱ्यामध्ये पूर्ण होणार प्रत्येक प्रभागाची मतमोजणी 

सुरुवातीला पोस्टल त्यानंतर evm ची मतमोजणी होणार 

निवडणूक निर्णय अधिकारी 6 सदाशिव पडदुणे यांची माहिती 

Jan 16, 2026 09:19 (IST)

Solapur Election Result LIVE Update: सोलापूरात स्टाँगरुम उघडली

सोलापुरात स्टाँग रूम उघडली, मतमोजणी केंद्र क्रमांक 6 मधील स्ट्रॉंग उघडली 

सोलापुराच्या 26 प्रभागातील 102 जागासाठी 7 ठिकाणी होणार आहे मतमोजणी 

सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल, त्यापूर्वी उमेदवार प्रतिनिधीच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली 

सोलापुरात 53.02 टक्के मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे

मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाल्यानंतर काल ह्या evm स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या 

मतमोजणीसाठी हे स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेत, काही वेळात मतमोजणीला होणार सुरुवात

Jan 16, 2026 09:03 (IST)

Jalgaon Election Result LIVE Update: जळगावमध्ये 63 जागांसाठी मतमोजणी होणार

जळगाव महापालिकेच्या 63 जागांसाठी आज मतमोजणी; गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, एकनाथ खडसे दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाजळगाव महापालिकेच्या 63 जागांसाठी आज मतमोजणी होणार असून एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळात ही मतमोजणी होणार आहे. 

जळगाव महापालिकेत मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील माजी मंत्री एकनाथ खडसे अशा दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  दरम्यान, या मतमोजणीसाठी प्रशासन हे सज्ज झाले असून सकाळी दहा वाजता पोस्टल मतमोजणीने मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Jan 16, 2026 09:00 (IST)

Maharashtra Election Result LIVE Update: राज्यातील टॉप १० महापालिकांमधील मतदानाची टक्केवारी

राज्यातील टॉप १० महापालिकांमधील मतदानाची टक्केवारी 

  • मुंबई महानगरपालिका - ५२.९४ टक्के 
  • ठाणे महानगरपालिका -  ५५.५९ टक्के
  • नवी मुंबई महानगरपालिका- ५७.१५ टक्के
  • पुणे महानगरपालिका- ५२.४२ टक्के 
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका-  ५७.७१ टक्के 
  • नागपूर महानगरपालिका- ५१ टक्के
  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका- ५९.८२ टक्के
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका-  ४५ टक्के
  • वसई-विरार महानगरपालिका -  ५७.१२ टक्के
  • मीरा-भाईंदर महानगरपालिका- ४८.६४ टक्के

Jan 16, 2026 08:57 (IST)

Pune Election Result LIVE Update: थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात! पुण्यात मोठा पोलीस बंदोबस्त

आज पुणे महानगरपालिकेच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे ज्या ज्या ठिकाणी संवेदनशील भाग आहे तिथे अधिकचा पोलीस बंदोबस्त आहे थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल या अगोदर पोलीस प्रशासनाने पूर्णता खबरदारी बाळगली आहे काही ठिकाणी हाय व्होल्टेज लढती आहे तिथे देखील पोलीस बंदोबस्त हा वाढविण्यात आला आहे.

Jan 16, 2026 08:37 (IST)

Ahilyanagar Election Result LIVE Updates: अहिल्यानगरमध्ये कोण उधळणार विजयी गुलाल? थोड्याच वेळात लागणार निकाल

अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी काल मतदान पार पडला आणि आज मतमोजणीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात होणार आहे.. एकूण 17 प्रभागांसाठी 68 जागांवरती ही निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यापैकी पाच जागा या बिनविरोध निवडून आल्याने 63 जागांसाठी काल मतदान पार पडले.

महामंडळाच्या गोदामामध्ये मतमोजणी सुरू होणार असून मतमोजणी परिसरामध्ये उमेदवारांचे कार्यकर्ते गोळा होणे सुरुवात झाली आहे,  तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकूण 68 टेबलाच्या माध्यमातून ही मतमोजणी होणार असून 17 टेबल हे पोस्टल मतदानासाठी तर 51 टेबल ईव्हीएम साठी वापरले जाणार आहेत.

Jan 16, 2026 08:31 (IST)

Pune Election Result LIVE Update: निकालाआधी प्रशांत जगताप यांनी घेतले आईचे आशीर्वाद

आईकडून प्रशांत जगताप यांचं औक्षण 

निकालाआधी प्रशांत जगताप यांनी घेतले आईचे आशीर्वाद 

प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षातून लढवली नगरसेवक पदाची निवडणूक 

 पुण्याच्या महापालिका निवडणुकीत सगळ्या जास्त चर्चेत राहिलेले प्रशांत जगताप यांना त्यांच्या आईने औक्षण केलं आणि विजयासाठी आशीर्वाद दिला

Jan 16, 2026 08:29 (IST)

Nagpur Election Result LIVE Update: नागपूरमध्ये 10 केंद्रांवर होणार मतमोजणी

१) लक्ष्मी नगर परिसरातील गंगाधरराव फडणवीस क्रीडा संकुल, 

२) धरमपेठ येथील सेंट फ्रान्सिस डी सेल्म (एस. एफ. एस) कॉलेज, 

३) हनुमान नगरमधील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, 

४)धंतोली सामुदायिक भवन, रेल्वे विभाग अजनी रोड, गुलमोहर कॉलनी वंजारी नगर येथील 

५) नेहरू नगर राजीव गांधी सभागृह, न्यू नंदनवन पाण्याच्या टाकीजवळील ठिकाण, 

६) गांधीबाग येथील नागपूर सुधार प्रन्याय  कर्मचारी सांस्कृतिक सभागृह, ग्रेट नाग रोड गणेश नगर 

७)सतरंजीपुरा, नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशन, 

८) लकडगंज - विनायकराव देशमुख हायस्कूल आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, ईव्हीजी लेआउट येथील 

९आशीनगर - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, ललित कला भवन, ठवरे कॉलनी, 

१०) मंगळवारी येथील अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय, काटोल रोड छावणी आदी ठिकाणी मतमोजणीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Jan 16, 2026 08:28 (IST)

Kolhapur Election Result LIVE Updates: कोल्हापूर जिल्ह्यात २१ जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू: अपर जिल्हादंडाधिकारी यांचे निर्देश

कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात बंदी आदेश जारी केले आहेत. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी सादर केलेल्या अहवालातील सूचनांची दखल घेत प्रशासनाने हा खबरदारीचा निर्णय घेतला आहे. हे आदेश २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहतील.

जिल्ह्यात विविध पक्ष आणि संघटनांकडून सातत्याने होणारी आंदोलने, उपोषणे, मोर्चे आणि रॅलींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात विविध यात्रा, सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. या सर्व घडामोडींच्या काळात जिल्ह्यात शांतता भंग होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) नुसार हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

Jan 16, 2026 08:20 (IST)

Solapur Election Result LIVE Updates: सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकाल: मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

सोलापूर महानगरपालिकेसाठी दहा वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. सात मतदान केंद्रावर 81 फेऱ्यांमधून मतमोजणी होईल. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 6 टक्क्यांनी मतदान घसरले आहे. 53 टक्के इतकेच मतदान झाले. त्यामुळे घसरण झालेल्या मताचा टक्का कुणाचा फायद्याचा ठरणार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सध्या संपूर्ण तयारी झालेली दिसून येते आहे. 

Jan 16, 2026 08:15 (IST)

Pimpri Chinchwad Election Result LIVE Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली, दिग्गजांची चिंता वाढली

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होतो आहे. 128 जागांसाठी 692 उमेदवार रिंगणामध्ये होते, मात्र इथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होती, त्यामुळे पिंपरी चिंचवड करांनी नक्की कौल कुणाला दिला? हे  थोड्याच वेळात स्पष्ट होईल 

आठ मतमोजणी केंद्रांवरून हा निकाल जाहीर केला जाईल. पिंपरी चिंचवड मध्ये 57.71% एवढं मतदान झालंय, मागील वेळे पेक्षा ही मतदान कमी झालं आहे त्यामुळे हा मतदानाचा टक्का खरंतर घसरला आहे 

आणि घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. 

Jan 16, 2026 08:09 (IST)

Nashik Election Result LIVE Update: मनपा निकालाआधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप! बड्या नेत्याचा राजीनामा

  • शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलारांचा राजीनामा 

  • गजानन शेलारांची पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची होती चर्चा

  • निवडणूक काळात पक्षाच्या बड्या नेत्यांनी नाशकात सभा न घेतल्याचा आरोप

  •  शेलारांच्या निवडणूक काळातील कामगीरीवर पक्षाचे वरीष्ठ नेते होते नाराज

  • गजानन शेलार यांनी पुतण्यासाठी भाजपचा प्रचार केल्याचीही चर्चा

  • शेलार यांचा पुतण्या राहुल शेलार भाजपकडून प्रभाग 13 मध्ये आहे रिंगणात

Jan 16, 2026 08:08 (IST)

Latur Election Result LIVE Updates: लातूर मनपा मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज! थोड्याच वेळात होणार निकालाला सुरुवात

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 18 प्रभागातील 70 जागांसाठी 359 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं आहे. दहा वाजल्यापासून प्रत्येक क्षमता मोजणीला सुरुवात होईल त्याची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पोलीसांचा मोठा फौज फाटा मतमोजणी केंद्रावर तैनात करण्यात आलेला आहे अगदी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीसाठी 445 कर्मचारी आहेत दहा टेबलांवरून मतमोजणी होणार आहे 

Jan 16, 2026 07:58 (IST)

Nashik Election Result LIVE Updates: नाशिक मनपावर कोणाचा झेंडा? दुपारपर्यंत लागणार निकाल

  • नाशिक महापालिकासाठी काल मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी
  • 122 जगासाठी 155 टेबलवर होणार मतमोजणीची प्रक्रिया
  •  एका प्रभागासाठी तीन टेबलवर होणार मतमोजणी 
  • संपूर्ण मतमोजणीसाठी 465 कर्मचारी नियुक्त
  •  साधारण दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
  •  2398 पोलिस कर्मचारी वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रावर तैनात असणार बंदोबस्तासाठी

Jan 16, 2026 07:56 (IST)

Jalgaon Election Result LIVE Update: जळगाव महापालिका निवडणुकीत 75 पैकी 12 जागा बिनविरोध

जळगाव महापालिका निवडणुकीत 75 पैकी 12 जागा बिनविरोध 

निकालापूर्वीच 75 पैकी 12 जागा या महायुतीकडे 

जळगाव महापालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार आघाडी लढत 

युती व आघाडीमुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने महा आघाडीसमोर बंडखोर अपक्षांचे मोठे आवाहन 

जळगाव महापालिका निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर अशा दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला

Jan 16, 2026 07:55 (IST)

Maharashtra Election Result LIVE Update: मराठवाड्यातील पाच मनपा मतदानाची टक्केवारी समोर

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, परभणी आणि लातूर या पाच महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात सायंकाळी ५ वाजेनंतर मतदारांच्या प्रचंड रांगा दिसून आल्या. दिवसभर संथ गतीने चाललेल्या मतदानाने सायंकाळी अचानक उसळी घेतली. अनेक बूथवर रात्री आठ वाजेनंतरही मतदान सुरु असल्याचे चित्र दिसले. 

पाच महापालिकांमध्ये रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये ६० % मतदान झाले. नांदेडमध्ये ६१.७९%, जालन्यात ६१.१६ %, परभणीत ६५.९९% आणि लातूरमध्ये ६०.०७% मतदान झाल्याची प्राथमिक नोंद आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये वांगस मतदान झाल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.

Jan 16, 2026 07:50 (IST)

Dhule Election Result LIVE Updates: भाजपचे 55 प्लस नगरसेवक निवडून येतील: मंत्री जयकुमार रावल यांना विश्वास

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. आज जाहीर होणार निकालात मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अवघ्या काही वेळात मतमोजणीला सुरुवात होणार असली तरी दुसरीकडे मात्र पालकमंत्री जयकुमार रावल यांनी 55 प्लस चा नारा दिला आहे.... धुळ्याप्रमाणेच मुंबईतही भाजपची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Jan 16, 2026 07:49 (IST)

Pune Election Result LIVE Updates: पुण्यात निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर, महापौरही ठरले

  • पुण्यात निकाला आधीच गणेश बिडकर यांचे लागले बॅनर:

  • बॅनरवर गणेश बिडकर यांचा 'महापौर साहेब' असा उल्लेख 

  • नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल लागले अभिनंदनाचे बोर्ड

  • पुण्यात भाजपचे गणेश बिडकर vs  प्रणव धंगेकर असा रंगला होता सामना...

Jan 16, 2026 07:40 (IST)

Pune Election LIVE Update: अजित पवारांनी मानले मतदारांचे आभार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मतदारांसाठी आभारपत्र:

लोकशाहीचा हक्क बजावत उत्स्फूर्तपणे मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो, अजित पवार यांनी मानले मतदारांचे आभार.  मतदान केंद्रांवर सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीबद्दलही मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अजित पवार यांनी मानले आभार. 

Jan 16, 2026 07:37 (IST)

Nashik Election Result LIVE Update: नाशिक, मालेगावमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल: दादा भुसेंना विश्वास

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सकाळी 10 वाजेपासून सुरवात होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी मालेगाव व नाशिकमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मालेगाव व नाशिकमध्ये शिवसेना व भाजप वेगवेगळे लढले मात्र. जनता जनार्दन,  मतदार राजा सर्वश्रेष्ठ असतो. मालेगावातील 24 पैकी 24 तर नाशिकमध्येही शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला आहे.

Jan 16, 2026 07:18 (IST)

Amravati Election Result LIVE Updates: अमरावती महापालिकेसाठी 53.65 टक्के मतदान

अमरावती...

अमरावती महापालिकेसाठी 53.65 टक्के मतदान, 661 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद 

८०५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. 

आज मतमोजणी नंतर अमरावतीचा नवा धुरंधर कोण, हेही स्पष्ट होणार..

भाजपचे खासदार अनिल बोंडे,  नवनीत राणा, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, युवा स्वाभिमान चे आमदार रवी राणा, राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके, सुलभा खोडके या दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापणाला लागलेले आहेत.

Jan 16, 2026 07:13 (IST)

Pune Election Result LIVE Updates: पुण्यातील सर्वात हायहोल्टेज लढत, निकालाकडे राज्याचे लक्ष

पुणे महानगरपालिका निवडणुकीत ज्या काही हाय-प्रोफाईल लढती आहेत, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 23 मधील लढत विशेष लक्षवेधी ठरत आहे. या प्रभागातून आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून निवडणूक रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर मैदानात उतरल्या आहेत.

Jan 16, 2026 06:54 (IST)

Solapur Election Result LIVE: सोलापुरात लाडक्या बहिणीचे झाले कमी मतदान

सोलापुरात लाडक्या बहिणीचे झाले कमी मतदान...

सोलापूर महानगरपालिकेसाठी 53.02 टक्के इतके मतदान  

मागील निवडणुकीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी मतदान घसरले...

मागील महापालिका निवडणुकीत 59 टक्के झाले होते मतदान..

2 लाख 41 हजार महिलांनी तर 2 लाख 48 हजार पुरुषांनी काल बजावला मतदानाचा हक्क...

मतदानाची घसरलेली टक्केवारी कुणाला सत्तेच्या खुर्चीत बसवणार...

Jan 16, 2026 06:46 (IST)

PMC Election Result LIVE Update: पुण्यात भाजपचे कमळ फुलणार? एक्झिट पोलचा अंदाज

पुणे शहरामध्ये भाजपचे कमळ फुलणार असल्याचा अंदाज अनेक एक्झिट पोलने दर्शवला आहे. भाजप पुण्यात 70 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरेल, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ५५ जागा मिळतील तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10, शिंदे गटाला 12, काँग्रेसला 8, मनसेला 2 आणि इतरांना 03 जागा मिळण्याची शक्यता साम टीव्हीच्या एक्झिट पोलने दर्शवली आहे. 

Jan 16, 2026 06:40 (IST)

Nashik Election Result LIVE Updates: नाशिक महापालिका निवडणुकीत एकूण 56.67 टक्के मतदान

Nashik Breaking -

- नाशिक महापालिका निवडणुकीत एकूण 56.67 टक्के मतदान

- पाच टक्क्यांनी मतदान घसरले

- 2017 मध्ये 61.60 टक्के झाले होते मतदान

- घटलेल्या मतदानाचा फटका कोणत्या पक्षाला बसणार ? याकडे लागले लक्ष

Jan 16, 2026 06:39 (IST)

Nagpur Election LIVE Updates: नागपूर महानगरपालिकेच्या 151 नगरसेवकांचा आज होणार फैसला

- नागपूर महानगरपालिकेच्या 151 नगरसेवकांचा आज होणार फैसला

- नागपूर शहरातील मनपाच्या झोननुसार 10 ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे मतमोजणी केंद्र 

- सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार मतमोजणी 

- एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ईव्हीएमसाठी 20 आणि टपाल मतदानासाठी 4 टेबल ठेवण्यात आले आहेत 

- प्रत्येक टेबलावर एक पर्यवेक्षक आणि एक सहायकाची नियुक्ती करण्यात आली आहे 

- प्रभागाच्या क्रमवारीनुसार एकएक प्रभागाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे 

- ज्यामुळे निकाल स्पष्ट होण्यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे 

- मनपाच्या एकूण 38 पैकी 37 प्रभाग चार सदस्यीय आणि एक प्रभाग तीन सदस्यीय आहे

Jan 16, 2026 06:39 (IST)

PMC Election Result LIVE Update: पुण्यात एकूण ५२.४२ टक्के मतदान

पुण्यात एकूण ५२.४२ टक्के मतदान 

काल उशिरा टक्केवारी जाहीर करण्यात आली 

१६३ जागांसाठी ५२.४२ टक्के इतके मतदान 

एकूण ३५ लाखापैकी १८ लाख ६२ हजार ४०८ जणांनी बजावला मतदानाचा हक्क

मागच्या वेळी पेक्षा जवळपास ३.५० टक्के कमी मतदान 

२०१७ मध्ये ५५.५६ इतके झाले होते मतदान 

पुण्यात कमी मतदानाचा फटका नेमका कुणाला?