2 months ago

Maharashtra Live Blog:  मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण अस्त्र उगारले आहे. मराठा बांधवांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे  आजपासून उपोषणाला बसणार आहेत. जालन्यामधील अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार असून त्यांच्या उपोषणाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच 

संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून मुंबईमध्ये आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल मराठा मोर्चाकडून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  सकाळी 10 वाजल्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. 

Jan 25, 2025 22:34 (IST)

भारताची दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडवर मात

भारतानं दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. एक वेळ पराभवाच्या छायेत असलेल्या भारताला तिलक वर्माने एकहाती विजय मिळवून दिला आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 166 धावांचे टार्गेट दिले होते. हे लक्ष्य भारताने वीसाव्या ओव्हरमध्ये पार केले. भारताने 8 फलंदाज गमावले. तिलक वर्माने सर्वाधिक 72 धावा केल्या.   

Jan 25, 2025 22:20 (IST)

वाल्मीक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  दोन दिवसांच्या उपचारानंतर कराडला डिस्चार्ज देण्यात आला. बीड जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचार झाल्यानंतर कराडची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. पोटाच्याविकारासह इतर आजारांवर त्यांच्यावर उपचार केले गेले.  

Jan 25, 2025 22:12 (IST)

उत्तम जीवन रक्षा पदकावरही महाराष्ट्राची छाप

एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याच्या मानवतावादी कृतीसाठी जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार प्रदान केले जातात. हा पुरस्कार सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक या तीन श्रेणींमध्ये  दिला जातो. सर्व क्षेत्रातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. हे पुरस्कार मरणोत्तर देखील दिले जातात. 9 जणांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शशिकांत रामकृष्ण गजबे यांचा समावेश आहे. तर 23 जणांना जीवन रक्षा पदक जाहीर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील दादाराव गोविंदराव पवार,ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर यांचा समावेश आहे.

Jan 25, 2025 22:03 (IST)

राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (PSM)

 

 1.   डॉ रविंदर कुमार झिले सिंग सिंगल, -अतिरिक्त महासंचालक

 2.   श्री दत्तात्रय राजाराम कराले- पोलिस महानिरीक्षक

 3.   श्री सुनिल बलिरामजी फुलारी -पोलिस महानिरीक्षक 

 4.   श्री रामचंद्र बाबु केंडे – पोलिस कमांडंट

 

 

राज्यातील एकूण 44 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (MSM)

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

1. श्री संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक,

2. श्री वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक,

3. श्रीमती  आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक,

4. श्री चंद्र किशोर रामजीलाल मिना, महानिरीक्षक,

5. श्री दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक,

6. श्री राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक,

7. श्री सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक,

8. श्रीमती  ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त,

9.  श्री धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त,

10. श्री मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक,

11. श्री राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक,

12. श्री रोशन रघुनाथ यादव, पोलीस उपअधीक्षक,

13. श्री अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उपअधीक्षक,

14. श्री अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त,

15. श्री नजीर नसीर शेख, उपनिरीक्षक,

16. श्री श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक,

17. श्री महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक,

18. श्री तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक,

19. श्री आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक,

20. श्री रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक,

21. श्री सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक,

22. श्री राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक,

23. श्री संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक,

24. श्री दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक,

25. श्री नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक,

26. श्री आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक,

27. एसएमटी. सुनिता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक,

28. श्री जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक,

29. श्री प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक,

30. श्री राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक,

31. श्री सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक,

32. श्री तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक,

33. श्री रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल,

34. श्री संजय भास्करराव चोबे, प्रमुख कॉन्स्टेबल,

35. श्री सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक,

36. श्री विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल,

37. श्री रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक,

38. श्री दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल,

39. श्री आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल,

 

सुधारात्मक सेवा - गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

1.    श्री विवेक वसंत झेंडे, अतिरिक्त अधीक्षक,

2.   श्री अहमद शमशुद्दीन मणेर, हवालदार,

3.   श्री गणेश महादेव गायकवाड, हवालदार,

4.  श्री प्रल्हाद दत्तात्रय कुदळे, हवालदार,

5.  श्री तुळशीराम काशिनाथ गोरावे, हवालदार,

Advertisement
Jan 25, 2025 22:03 (IST)

महाराष्ट्राला मिळाली 48 ‘पोलीस पदके’

पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 48  पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना  ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील 39 पोलीस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) जाहीर झाली आहेत.

Jan 25, 2025 21:33 (IST)

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते

पद्मभूषण

मनोहर जोशी (मरणोत्तर) - सार्वजनिक

पंकज उदास (मरणोत्तर) - कला

शेखर कपूर - कला

पद्मश्री

अच्यूत पालव - कला

अरुंधती भट्टाचार्य - व्यापार आणि उद्योग

अशोक सराफ - कला

अश्विनी भिडे-देशपांडे - कला

चैतराम पवार - सामाजिक कार्य

जसपिंद नरुला - कला

मारुती चितमपल्ली - साहित्य आणि शिक्षण

राणेंद्र मजूमदार - कला

सुभाष शर्मा - कृषी

वासूदेव कामत - कला

विलास डांगरे - वैद्यकीय क्षेत्र

Advertisement
Jan 25, 2025 21:27 (IST)

शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण

शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. त्याच बरोबर अशोक सराफ यांनाही कला क्षेत्रातील योगदाना बद्दल पद्मश्री जाहीर झाला आहे. या शिवाय पंकज उदास, शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य, अश्विनी भिडे देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.  

Jan 25, 2025 19:27 (IST)

महाराष्ट्रातील तीन जणांना पद्म पुरस्काराची घोषणा

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तीन जणांना पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. त्यात मारुती चितमपल्ली,चैत्राम पवार आणि डॉ. विलास डांगरे या तिघांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. मारुती चितमपल्ली यांना मराठी लेखन आणि वन्यजीव संशोधनातील योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहेत. तर डॉ. विलास डांगरे यांना त्यांच्या 50 वर्षाच्या वैद्यकीय सेवेबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चैत्राम पवार यांना पर्यावरण क्षेत्रात  केलेल्या कामा बद्दल पद्मश्री जाहीर झाला आहे. 

Advertisement
Jan 25, 2025 19:09 (IST)

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाकडून राज्यभरात संविधान पूजन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाकडून राज्यभरात संविधान पूजन केलं जाणार आहे. संजय राऊत यांच्या हस्ते संविधान आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. नाशिकच्या शिवसेना कार्यालयात संजय राऊत यांच्या हस्ते पूजन होईल. याचवेळी घंटानाद करून संविधान बचावचा नारा देण्यात येणार आहे. 

Jan 25, 2025 17:14 (IST)

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती

गेल्या आठवड्यात युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यासह विविध पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अध्यक्षांबरोबर कार्याध्यक्षही युवक काँग्रेसला मिळाले आहेत. 

Jan 25, 2025 14:27 (IST)

Mumbai Malad Fire News: मुंबईमध्ये भीषण अग्नितांडव, मालाडमधील फर्निचरच्या दुकानांनी पेट घेतला

मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या मालाडमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. मालाड दिंडोशी भागातील खडकपाडा परिसरात असणाऱ्या फर्निचरच्या गोदामांमध्ये ही भीषण आग लागली असून15 दुकाने जळून खाक झाली आहेत. गेल्या अडीच तासांपासून हे भीषण अग्नितांडव सुरु असून परिसरात धुराचे लोट पसरलेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

 ही आग  सकाळी साधारण 11.15 वाजताच्या सुमारास लागली असून आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या सह आग विझवण्याची शक्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीच्या भक्षस्थानी बाजूची 15 दुकान येऊन जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे उद्यापर्यंत कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती मिळालेली नाहीत.

Jan 25, 2025 14:13 (IST)

Sharad Pawar Health Update: डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला, शरद पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवारांचे पुढचे चार दिवसांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. खोकला झाल्याने आणि त्यामुळे बोलताना घश्याला त्रास होत असल्याने शरद पवारांचे कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.  भाषण करताना त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील सर्व कार्यक्रम  रद्द केले आहेत. 

Jan 25, 2025 12:50 (IST)

Pune News: पुण्यात महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधात कारवाई

पुण्यात महानगरपालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई 

अनधिकृत अतिक्रमणावर पुणे महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा 

शहरातील कोरेगाव पार्क परिसरात कालपासून अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई 

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच कोरेगाव पार्क परिसरात केली होती पाहणी 

वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या आणि अनधिकृत बांधकाम आणि दुकानांवर पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आली कारवाई

Jan 25, 2025 12:17 (IST)

Maharashtra Politics: राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाचा वेगळा प्रयोग? शरद पवारांचा नवा फॉर्म्युला

राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाचा वेगळा प्रयोग?

तीन पक्षांसाठी दिड दिड वर्ष विरोधी पक्ष नेत्याचा फॉर्म्युला?

दिड वर्ष विरोधी पक्ष नेता फॉर्म्युल्याकरता शरद पवार आग्रही- सूत्रांची माहिती

काँग्रेस मात्र संख्याबळानुसार विधानपरिषदेत काँग्रेसचा आणि विधानसभेत ठाकरेंचा विरोधी पक्ष नेता असावा याकरता आग्रही- सूत्रांची माहिती

दिल्लीत येत्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते दिल्लीत भेटणार

दिल्लीतून विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय येत्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान होणार

Jan 25, 2025 11:56 (IST)

Narendra Chapalkar Passed Away: माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचे निधन

माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं दुःखद निधन झाले.  संभाजीनगरमधील खासगी रूग्णालयात त्यांनी वयाच्या 88 व्या अखेरचा श्वास घेतला.  महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Jan 25, 2025 10:13 (IST)

Mumbai Local Mega Block: पश्चिम रेल्वेवर 3 दिवस ‘जम्बो मेगाब्लॉक’, 300 लोकल रद्द

आजपासून 3 दिवस पश्चिम रेल्वेवर ‘जम्बो मेगाब्लॉक’ घेण्यात येणार असून 300 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.  वेस्टर्न रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा ‘जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर आजपासून पुढील तीन दिवस ‘जम्बो मेगाब्लॉक’ घेण्यात आला आहे.

रेल्वेने 24,25आणि 26 जानेवारीला'जम्बो मेगाब्लॉक घोषित केला आहे.  मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.  रविवार म्हटलं की मुंबईकरांच्या प्रवासाची पुरती वाट लागते. कारण रविवार हा सुट्टीचा अन् मेगाब्लॉकचा दिवस. त्यामुळे अनेक लोकल रद्द असतात आणि उशीराने धावणार आहेत..

Jan 25, 2025 09:50 (IST)

Nashik News: ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

नाशिकच्या पंचवटीतील मेरी रासबिहारी लिंक रोडवर एका 40 वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू, भरगाव येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने या महिलेला मागून धडक दिली व महिलेच्या शरीरावरून ट्रक गेल्याने महिलेच्या शरीराचा चेंदा-मेंदा झाला, महिलेचे शव अक्षरशहा फावड्याने उचलावे लागले, या अपघातामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून परिसरात स्ट्रीट लाईट असताना देखील नेहमी बंद अवस्थेत असतात व छोटा रस्ता असून मध्येच डिव्हायडर आहे त्यामुळे चार पदरी रोड करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे

Jan 25, 2025 09:49 (IST)

Bhandara Factory Blast Update: भंडारा स्फोट प्रकरणाची SIT चौकशी होणार

भंडारा जिल्ह्यात काल जवाहर नगर येथील ऑडनेस फॅक्टरी मध्ये भीषण दुर्घटना घडली. या घटनेच्या चौकशीसाठी नऊ लोकांची समिती स्थापन करून त्यासाठी चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या घटनेमध्ये आठ निष्पाप कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. या संपूर्ण संदर्भाने सरकारने चौकशीचे आदेश दिले असून त्यासाठी आता एस. आय. टी मार्फत सखोल चौकशी होणार आहे. या समितीमध्ये आयोग निर्माण येथील कुठलाही अधिकारी नसणार आहे त्यामुळे निष्पक्ष चौकशी होणार असल्याची पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली आहे.

Jan 25, 2025 09:48 (IST)

Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी बी एस आजाराबाबत घेतली माहिती

सिंहगड रोड परिसरात असलेल्या भागात या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अजित पवारांनी त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडून घेतली माहिती. अजित पवार सर्किट हाऊस येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. यावेळी जी बी एस आजाराबाबत माहिती घेतली आहे. या आजारावर उपचार होण्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहे हा खर्च महापालिकेने करावा अशी मागणी नागरिकांनी आहे.

Jan 25, 2025 09:45 (IST)

Chhatrapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यातील सायगव्हाण गावात मेडिकल चालकाला बेदम मारहाण

कन्नड तालुक्यातील सायगव्हाण गावात मेडिकल चालकाला बेदम मारहाण 

औषध विकत घेण्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने केली बेदम मारहाण 

मेडिकल चालकाला बेदम मारहाण करत मेडिकलचीही केली तोडफोड 

मारहाण आणि तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद

तोडफोड करणाऱ्या आरोपीवर कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

निलेश चव्हाण असे मारहाण झालेल्या मेडिकल चालकाचे नाव

Jan 25, 2025 08:49 (IST)

Parli news: महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्याचे आदेश

परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्याचे आदेश

मुंडे हत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि प्रगतीला उशीर झाल्याचा आरोप होत असताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्याचे दिले आदेश

मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची सुरेश धस यांनी केली होती मागणी

मुंडे हत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा संपूर्ण बाजूने तपास केला जाणार

Jan 25, 2025 08:03 (IST)

Manoj Jarange Patil: वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा: तपास पथकाचा अर्ज

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण-हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने दाखल केला आहे. तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील विविध भागांतील कराडच्या मालमत्तेची सर्व संभाव्य माहिती संकलित केली आहे आणि त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील.

Jan 25, 2025 07:59 (IST)

Pune News: पुणे शहरात उभारणार 7 VIP स्वच्छतागृहे, पुणे महापालिकेचा निर्णय

पुणे शहराच्या एन्ट्री पॉईंटसवर महापालिका उभारणार अत्याधुनिक वातानुकुलीत ७ VIP स्वच्छतागृहे

पुणे महापालिकेचा निर्णय 

नागपूरच्या धर्तीवर पुण्यात देखील उभारण्यात येणार वातानुकूलित स्वच्छतागृह 

पुणे महानगरपालिकेकडून मागवण्यात आले प्रस्ताव 

पे अँन्ड यूज सूत्रांनुसार उभारण्यात येणार स्वच्छतागृहे 

पुणे शहराच्या सातारा रस्त्यावरील कात्रज चौक, पुणे मुंबई रस्त्यावरील चांदणी चौक आणि बाणेर, आहील्यानगर रस्त्यावरील वाघोली, सोलापूर रस्त्यावरील शेवाळेवाडी, पुणे विमानतळाजवळ आणि पुणे रेल्वे स्टेशन जवळ अशा ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार 

एका स्वच्छतागृहासाठी साधारण ५० लाख रुपयांचा येणार खर्च

Jan 25, 2025 07:55 (IST)

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

पार्टी करून परतणाऱ्या तरुणांची कार बसला धडकली,

अपघातात दोघांचा जागीच मृत्य

तर ४ तरुण अपघातात गंभीर जखमी 

मित्राची बर्थडे पार्टी करून परत येताना स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात

Jan 25, 2025 07:54 (IST)

Political News: खासदार श्रीकांत शिंदे बनले 'राजकारणातला सिंघम!

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा ४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. यानिमित्तानं एका कार्यकर्त्यानं अंबरनाथमध्ये ५० फुटांचा साऊथ स्टाईल होर्डिंग लावला आहे. या होर्डिंगवर 'राजकारणातला सिंघम' असा खासदार श्रीकांत शिंदेंचा उल्लेख करण्यात आलाय. अंबरनाथ पूर्वेत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हुतात्मा चौकात हा होर्डिंग लावण्यात आला असून त्याची उंची आणि त्यावरील मजकुरामुळे तो सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. 

Jan 25, 2025 07:52 (IST)

Bhandara Accident: थे ट्रकची चारचाकीला भीषण धडक, अपघातात वैद्यकीय अधिकारी गंभीर जखमी

भंडाऱ्याच्या साकोलीकडून नागपूरकडे जात असलेल्या चार चाकी ला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग (क्र.53) वर भेल कंपनी समोर मुंडीपार सडक येथे घडली असून वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप वासुदेव इंगळे हे गंभीर जखमी झाले. आरोपी ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत चारचाकी ला धडक दिली. याप्रकारणी आरोपी बद्रीलाल चंद्रवंशी शाजापूर, मध्यप्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

Jan 25, 2025 07:51 (IST)

Akola News: आमदार पठानांनी बांगलादेशी घुसखोऱ्यांवर कारवाईचे पत्र द्यावे; किरीट सोमय्या

अकोल्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र दिल्या गेल्याचा आरोप भाजपा नेता किरीट सोमय्या यांनी केलाय.. यावर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी सुद्धा हा गंभीर मुद्दा असून याची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.. त्यावर सोमय्या यांनी साजिद खान पठाण यांच्यावर पलटवार केलाय.. साजिद खान पठाण यांनी तोंडी न बोलता लिखित स्वरूपात सादर कराव सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला.. किरीट सोमय्या यांच्या या आरोपानंतर अकोल्यात आता राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहेय... सध्या जन्म दाखल्याचे प्रलंबित प्रकरणांना तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचं ते म्हणाले..

Jan 25, 2025 07:51 (IST)

Pune News: पुण्याच्या इंदापुरमधील घोडेबाजाराला सुरुवात

पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडेबाजार इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भरतो 2017 सालापासून बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी या घोडेबाजाराची सुरुवात केली. यंदा देखील हा घोडेबाजार भरला असून 50 हजारापासून ते दहा लाख रुपये किमतीचे शेकडो घोडे या बाजारात दाखल झालेत.राज्य आणि राज्याबाहेरून घोडे दाखल झाल्याने करोडो रुपयाची उलाढाल या घोडेबाजारातून होत असते.