2 hours ago

Maharashtra LIVE Blog: दसऱ्यानंतर राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवारी रात्री अमित शाहंचे मुंबईमध्ये आगमन झाले. आज अमित शाहंच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घान होणार आहे. 

Oct 05, 2025 09:09 (IST)

LIVE Update: लक्ष्मण हाके यांची पुन्हा आंदोलनाची हाक

लक्ष्मण हाके यांची पुन्हा आंदोलनाची हाक 

मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलवलं नसल्याने लक्ष्मण हाके उद्या जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार

हजारो तरुणाने ओबीसी लढा साठी उद्या जेजुरी गडावर येण्याचं केलं हाके यांनी आवाहन

लक्ष्मण हाके उद्या जेजुरी गडावर ओबीसी आंदोलनाची तळी उचलणार

आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन आंदोलनाची तळी उचलू या लक्ष्मण हाके यांचे तरुणांना आवाहन

Oct 05, 2025 09:09 (IST)

LIVE Update: लक्ष्मण हाके यांची पुन्हा आंदोलनाची हाक

लक्ष्मण हाके यांची पुन्हा आंदोलनाची हाक 

मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलवलं नसल्याने लक्ष्मण हाके उद्या जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार

हजारो तरुणाने ओबीसी लढा साठी उद्या जेजुरी गडावर येण्याचं केलं हाके यांनी आवाहन

लक्ष्मण हाके उद्या जेजुरी गडावर ओबीसी आंदोलनाची तळी उचलणार

आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन आंदोलनाची तळी उचलू या लक्ष्मण हाके यांचे तरुणांना आवाहन

Oct 05, 2025 09:09 (IST)

LIVE Update: गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी दोन जुळ्या बोगद्यांचे खोदकाम सुरू करणार

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) त्यांच्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पासाठी पुढील वर्षाच्या सुरुवातीला दोन जुळ्या बोगद्यांचे खोदकाम सुरू करणार असल्याची माहिती आहे

या वर्षाच्या सुरुवातीला, बीएमसीने जपानमधून टीबीएम आयात केले आणि सध्या त्याचे असेंबलिंग काम सुरू आहे

मुंबई कोस्टल रोडच्या विपरीत, या प्रकल्पासाठी दोन टीबीएम वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे

ज्यामध्ये एकाच टीबीएमचा वापर करून जुळ्या बोगद्यांचे उत्खनन करण्यात आले होते

सध्या, मशीनच्या सुटे भागांचे असेंब्लींग सुरू आहे आणि पुढील वर्षी जानेवारीपर्यंत टीबीएम तयार होण्याची अपेक्षा आहे

त्यानंतर पहिल्या जुळ्या बोगद्याचे खोदकाम सुरू होईल

Oct 05, 2025 09:07 (IST)

LIVE Update: अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी राज्यव्यापी अन्न सुरक्षा मोहीम सुरू

दिवाळीच्या आधी, महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी राज्यव्यापी अन्न सुरक्षा मोहीम सुरू केली आहे

शनिवारपर्यंत, अधिकाऱ्यांनी १,५९४ मिठाई दुकानांची तपासणी केली आहे आणि विश्लेषणासाठी २,३६९ अन्न नमुने गोळा केले आहेत

खाद्य सुरक्षा मध्ये दूध, खवा (कंडेन्स्ड मिल्क), तूप, खाद्यतेल, मिठाई, सुकामेवा आणि चॉकलेटसह विविध प्रकारच्या अन्न उत्पादनांचा समावेश आहे

आतापर्यंत प्राप्त झालेल्या ५५४ नमुन्यांपैकी ५१३ नमुने सुरक्षित असल्याचे प्रमाणित करण्यात आले, २६ नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले, चारमध्ये लेबलिंग दोष आढळले आणि ११ नमुने वापरासाठी असुरक्षित मानले गेले. उर्वरित १,८१५ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत

Advertisement
Oct 05, 2025 09:06 (IST)

LIVE Update: यंदाच्या नवरात्रोत्सवात ६२२८ घरांची नोंदणी

यंवाच्या नवरात्रतसवात मुंबईत ६२२८ घरांची नोंदणी झाली आहे

दिवसाला सरासरी ६२४ घरांची विक्री झाली असून स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून ५८७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे

विशेष म्हणजे, गतवर्षीपिक्षा यंदाच्या नवरात्रीत घरांच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे गतवर्षी नवरात्रीत ५१९९ घरांची म्हणजेच दिवसाला ५८७ घरांची विक्री झाली होती

यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या काळात म्हणजेच २२ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत किती घरांची विक्री झाली याचा अभ्यास 'नाईट फ्रैक' या संस्थेने केला होता, त्यातून ही माहिती समोर आली आहे

नवरत्रत्सवापूर्वी असलेल्या पितृपक्षात अनेकजण शुभ काम करणे टाळतात

मात्र यंदाच्या पितृपंधरवड्यात ३३६ घरांची विक्री झाली आहे

गतवर्षीच्या पितृपंधरवड्याच्य तुलनेत ही वाढ ५ टक्क्यांनी अधिक आहे

Oct 05, 2025 09:06 (IST)

LIVE Update: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सुरक्षा यंत्रणांचे "मॉक ड्रिल"

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात दहशतवादी शिरले असल्याचे केले डमी मॉक ड्रिल

शनिवारी मध्यरात्री १ वाजता करण्यात आले हे ड्रिल

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी २ वाजता पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर आणि २.३० वाजता महात्मा गांधी रस्त्यावर या मॉक ड्रिल चा एक भाग म्हणून स्फोट घडवण्यात आले. दोन्ही ठिकाणावरील परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. वर नमूद दोन्ही ब्लास्ट हे डमी होते अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच शुक्रवारी वाजता विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत R & DE येथे दहशतवादी हल्ला झाल्याचे एक ड्रिल करण्यात आले

Advertisement
Oct 05, 2025 09:04 (IST)

LIVE Update: केंद्रीय मंत्री अमित शाहंचा शिर्डीत मुक्काम

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा पहिल्यांदाच शिर्डीत मुक्कामी आहेत. ज्या हॉटेलवर ते थांबले आहेत त्या सन अँड सॅड हॉटेलबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हीआयपी व्यतिरिक्त कोणाला ईथे प्रवेश दिला गेलेला नाही. यासोबतच परिसरातील रस्तेही बंद करण्यात आले आहेत. हा संपूर्ण परिसर भाजपमय झाला असून होर्डिंग आणि झेंडे ठिकठिकाणी नजरेस पडतायत. विशेष म्हणजे हॉटेलबाहेर साईबाबा मंदिराची प्रतिकृती साकारत कमानीवर लावलेलं होर्डिंग आणि त्यावरील मजकूर सगळ्यांच् लक्ष वेधून घेतोय.

Oct 05, 2025 06:40 (IST)

LIVE Updates: साईंच्या चरणी तब्बल एक कोटी रुपयांचा सुवर्ण हार अर्पण.

शिर्डी साईंच्या चरणी तब्बल एक कोटी रुपयांचा सुवर्ण हार अर्पण..

आंध्रप्रदेशातील भावीकाचं साईंना महादान.. नाव गुप्त ठेवण्याची दानशूर भावीकाची विनंती.

Advertisement
Oct 05, 2025 06:38 (IST)

LIVE Update: न्यायाधीशाच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला

अमरावतीत न्यायाधीशाच्या घरी 9 सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी मारला डल्ला..

या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराजीय टोळीला केले जेरबंद..

21 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त करीत 4 आरोपींना केली अटक..

या कारवाईत पोलिसांनी मोबाईल, इंटरनेट साहित्य, डुबलीकेट नंबर प्लेट, कारसह साहित्य जप्त केली आहे..

आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक राज्याबाहेर गेले असता गुप्त माहितीदारांकडून माहिती मिळाली..

Oct 05, 2025 06:38 (IST)

LIVE Update: दोन मित्रांच्या भांडणात एकाचा अपघाती मृत्यू

भिवंडी शांती नगर हद्दीतील न्यू आजाद नगर निजामीय हॉटेल च्या मागे राहणारे दोन मित्र झिशान अंसारी व मोहम्मद हसन यवई नाका कंपनी मधून परत येत असताना पाईप लाईन रोडवर त्यांच्यात किरकोळ भांडण झाले त्यानंतर ते आपापल्या घरी गेले झिशनच्या घरचे मोहम्मद हसन च्या घरि जाऊन जाब विचारला आणि घरी आले त्यानंतर मोहम्मद हसनच्या घरचे झिशान अंसारीच्या घरी येऊन भांडण केले त्यात मोहम्मद ने झिशानला लात मारली त्यामध्ये तो खाली पडला त्यात त्याचा मृत्यू झाला पोलिसांना कळतचा तात्काळ शांती नगर पोलीस घटना स्थळी जाऊन त्यांनी शव विच्छेदन पोस्ट मार्टन साठी इंदिरा गांधी रुग्णालयात घेऊन आले आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची पोलीस स्टेशनंला गुन्ह्यांची नोद करण्याची प्रक्रिया चालू असून पुढील तपास शांतीनगर पोलीस कर्मचारी करत आहे