Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचे पुन्हा मंत्रिमंडळात कमबॅक होणार? पडद्यामागे मोठ्या घडामोडी

वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी शक्यता आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रीमंडळात स्थान मिळणार मिळण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादीमधील स्थान तसेच राज्यातील ओबीसी मतदारांना नाराज न करण्यासाठी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील उचलबांगडीमुळे ओबीसी मतदार नाराज होण्याची शक्यता आहे. शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा संबंध नाही, त्यामुळे आता वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी शक्यता आहे. 

जामिनावरील आरोपीकडून चंद्रशेखर बावनकुळेंचा सत्कार, महसूलमंत्र्यांनी थोपटली व्यासपीठावर पाठ

धनंजय मुंडे यांचा राजीनामा जनभावनेमुळं घेतला होता. अमित शहा यांनी जर धनंजय मुंडे दोषी नसतील तर राजीनामा घ्यायचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका स्पष्ट केली होती. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील कोणत्याही नेत्याचा दबाव नव्हता. मात्र, जनभावनेचा आदर करून राजीनामा घेतला. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यासाठी संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही सहभाग नाही हा संदेश जनतेत जाणं गरजेचं असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या चर्चांवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास त्यांचा पक्षच संपेल. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्याचे स्वप्नातही आणू नये, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरुन तरुणानं मारली उडी, धक्कादायक आरोपानं खळबळ )