Maharashtra Assembly Session Live Updates: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवट होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन घमासान पाहायला मिळाले. अशातच गुरुवारी राज्याच्या विधानभवन परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. महाराष्ट्राच्या विधानसभेत घडलेल्या या लाजिरवाण्या प्रकाराने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.
Live Update : राज्याच्या सीमेवर सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 6 नक्षलवादी ठार
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत 6 नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्यांना घेरण्यासाठी सैन्याचं संयुक्त ऑपरेशन सुरु आहे. नारायणपूर जिल्ह्यात ऑपरेशन मान्सून सुरू झाले आहे. महाराष्ट्राच्या अबुझमाड सीमेवर सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले आहेत.
Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आळंद गावाजवळ अपघात झाला आहे. ताळा गावाकडे वळण घेणाऱ्या मोटरसायकलला ट्रकची धडक बसली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.
भीषण अपघातात वडील, मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला. 14 वर्षांची मुलगी, 12 वर्षांच्या मुलाचा त्यांच्या वडिलांसह मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की मृतदेह काढण्यासाठी जेसीबीची वापर करण्यात आला.
Live Update : मतदानाच्या माध्यमातून बाटली आडवी करण्यात महिला शक्तीचा विजय
कोल्हापूर जिल्ह्यातील आंबवडे गावातील महिलांना गावात दारुबंदी करण्यात यश आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून आंबवडे गावात सुरू असणाऱ्या बिअरबार , परमीटरुम विरोधात महिलांसह, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडं तक्रार केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दारू दुकान बंद करण्यासाठी आंबवडे गावात मतदान प्रकिया राबविण्यात आली. दोन मतदान केंद्रावर 598 पैकी 415 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये बाटली आडवी करण्यासाठी 349 महिलांनी मतदान केलं तर उभ्या बाटलीला 31 मतं मिळाली.शिवाय 35 मत ही बाद ठरविण्यात आली. मतदानाचा निकाल महिलांच्या बाजूने लागल्याने फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.
LIVE Updates: राज ठाकरेंच्या आगमनाची मीरा रोडमध्ये जोरदार तयारी
मीरा भाईंदर मध्ये आज सायंकाळी 6 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी शहराच्या ठिकठिकाणी बॅनरबाजी करत तयारी केली आहे. मीरा भाईंदर मधील ज्या बालाजी सर्कल येथे हिंदी भाषिकाच्या मुजोरी मुळे मराठी वादाची ठिणगी पडली त्या ठिकाणी आज ढोलताशाच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत कार्यकर्ते यांच्याकडून केले जाणार आहे.
Live Updates: संपूर्ण कर्जमाफीसाठी जालना छत्रपती संभाजी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
शेतकऱ्यांना सरकारने कर्ज माफीच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी या मागणीसाठी या मागणीसाठी जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्याच्या वतीने बदनापूर शहरात रस्ता रोको आंदोलनास सुरुवात केलीय. या आंदोलनामुळे जालना- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झालीय.तर पोलिसांनी आंदोलकांना नोटीस ही बजावत आंदोलन न करण्याचा इशारा दिलाय आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी नोटीस फाडत आंदोलनास सुरवात करत महामार्ग ठप्प केलात य जो पर्यंत कर्ज माफीची घोषणा सरकार करत नाही तो पर्यंत आंदोलन करणार असल्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली
LIVE Updates: देशभरातील करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील कामगार ३१ जुलैपासून संपावर
- देशभरातील करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील कामगार ३१ जुलैपासून संपावर
- मजदुर संघाची व्यवस्थापनाला ३१ जुलैपासून संपाची नोटीस
- नाशिकच्या करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेससह देशातील ९ करन्सी नोट आणि सिक्युरिटी प्रेसमधील कामगारांचा ३१ जुलैपासून संपाचा इशारा
- नाशिक, हैदराबाद, नोएडा, मुंबई, देवास, नर्मदापुरम आणि कोलकातामधील सर्व ९ युनिट्समधील कामगार जाणार संपावर
- दिवाळी बोनस, मयत कामगारांच्या वारसांना नोकरीवर घेणं, भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालावा, मेडिकल सुविधा यासह अन्य मागण्यांसाठी कामगारांचा संपाचा इशारा
- ३१ जुलैपासून कामगार संपावर गेल्यास चलनी नोटा, नाणी, पासपोर्ट, मुद्रांक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता
Live Updates: पुण्यातील पर्वती भागात 10 ते 12 जणांकडून तरुणाला बेदम मारहाण
पुण्यात पुन्हा हाणामारी
पुण्यातील पर्वती भागात 10 ते 12 जणांकडून तरुणाला बेदम मारहाण
पर्वती पोलीस स्टेशनमध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल
जुन्या वादातून तरुणाला टोळक्याकडून मारहाण
मारहाण करणारे आणि फिर्यादी युवक एकाच बिल्डिंगमध्ये वास्तव्यास असून गेल्या अनेक दिवसांपासून यांच्यामध्ये गाडी पार्किंग वरून वाद होता
गाडी पार्किंगच्या वादावरून परवा दिवशी रात्री या सर्व जणांकडून त्या तरुणाला मारहाण करण्यात आली
CCTV मध्ये तरुणांना झालेली मारहाण कैद
पोलिसांकडून सर्वांची चौकशी सुरू
LIVE Updates: सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका, जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नितीन देशमुख यांच्या अटकेवेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडी समोर झोपून आंदोलन केले होते.
Live Updates: महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला
महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठीची मागणी तसेच विधानभवन परिसरात झालेल्या मारहाणीबाबत राज्यपालांकडे निवेदन दिले जाण्याची शक्यता आहे.
LIVE Updates: ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास गतीने व्हावा या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणात त्यांच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात तो दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर आता बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे..
Live Updates: पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीकडून तोडफोड
पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपीकडून तोडफोड
सहकार नगर परिसरातील एका गुंडाने पोलीस स्टेशनमध्ये घातला राडा
पोलीस स्टेशन मध्ये गुंडाकडून तोडफोड
राजू उर्फ बारक्या लोंढे असं तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव
पोलीस ठाण्यात तोडफोड करत खिडक्यांच्या फोडल्या काचा
कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेत त्याला सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आलं होतं
याचवेळी सराईत गुन्हेगाराने पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला असल्याची माहिती
पोलीस स्टेशन मधील कॉम्प्युटर देखील फोडलं
पुण्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात
Live Updates: चाळीसगाव तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का
चाळीसगाव तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला आहे...
या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तालुक्यात मोठा धक्का मानला जात आहे..
Live Updates: विधान भवन प्रवेशाचे इतर पासेस प्रवेशासाठी रद्द
काल विधान भवन येथे राडा झाल्यानंतर आजच्या कामावर पडसाद
विधान भवन सुरक्षा कार्यालयाने घेतला मोठा निर्णय
आज विधान भवन मध्ये कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्मचारी अधिकारी यांना विधान भवन मध्ये येण्यास परवानगी नाही
विशेष परवानगी पत्र घेऊनच आज सर्वांना विधान भवन मध्ये प्रवेश मिळणार
आज सर्व पद्धतीचे इतर पासेस प्रवेशासाठी रद्द करण्यात आले आहे
आज विधान भवन कामकाजाचा शेवटचा दिवस आणि विधान भवन सुरक्षा कार्यालयाकडून मोठा निर्णय जाहीर
Live Updates: डोक्यावर कर्जाचा डोंगर, संभाजीनगरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं
पैठणच्या मर्दा गेवराई मधील भगवान शेषराव ढाकणे या शेतकऱ्याची स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली तर सततची नापिकीमुळे पिकांनावर झालेला खर्च, तसेच पावसाने पिकांचे दिलेल्या उघड दिप दिल्याने तसेच बँकेकडून घेतलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून अंतरवाली खांडी येथील
लहू भीमराव डिघुळे या शेतकऱ्याने स्वत:च्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
LIVE Updates: राजापूरमध्ये गोवा बनावटीचा 7 लाखांचा दारू साठा जप्त
गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. राजापूर बस स्थानकासमोर, महामार्गावरून गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका वाहनातून तब्बल २२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पकडण्यात आला. यात ७७ बॉक्स गोवा बनावटीची दारू आणि एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे. गोवा दारूची एकूण किंमत ७ लाख १९ हजर ७६० रुपये आहे. वाहनचालक वस्त्याव सायमन घोन्सालविस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Live Updates: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १८ जुलै ते १ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत.
जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने केली जात आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
Live Updates: वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील महिला वॉर्ड मधील लिफ्ट 8 ते 10 दिवसापासून बंद
जळगाव मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गरोदर व प्रसूती विभागातील महिला वार्ड मध्ये जाणारी लिफ्ट गेल्या आठ ते दहा दिवसापासून बंद असून त्यामुळे गरोदर व प्रसुती झालेल्या महिला रुग्णांना जिन्यावरून ये - जा करावी लागत असून महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच लिफ्ट सुरू होण्याची अपेक्षा वैद्यकीय अधिष्ठातांनी व्यक्त केली आहे.
Live Updates: नशिराबाद नगरपरिषदेकडून मोकाट कुत्र्यांना पकडण्याची विशेष मोहीम
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे नगर परिषदेच्या वतीने मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबवली जात असून या मोहिमेअंतर्गत 49 मोकाट कुत्र्यांना जेर बंद करण्यात आले आहे. नशिराबाद मध्ये गेल्या काही दिवसापासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत 7 वासरांचाही बळी गेला आहे. त्यामुळे विद्यार्थी शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्याने नागरिक संतप्त झाले होते. अखेर नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेऊन मोकाट कुत्र्यांना जेरबंद केला आहे.
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला अटक
जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी काल रात्री अटक केल
रात्री साडे तीन वाजता नितीन देशमुख याला जे जे मध्ये मेडिकल साठी नेण्यात आल होत
त्याच्या समर्थनात कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं