Maharashtra Live: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 11 आणि 12 ऑगस्टसाठी अनेक जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा समावेश आहे.
LIVE Updates: येरमाळा येथील येडेश्वरी देवीची नारळी पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहात
धाराशिवच्या येरमाळा येथील प्रसिद्ध देवस्थान श्री येडेश्वरी देवीची नारळी पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडलीय.येडेश्वरी देवीच्या पालखी आणि दहीहंडीसह निघालेल्या गाव प्रदक्षिणेत भाविकांनी येरमाळा येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.नारळी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक दहीहांडी फोडण्याचा कार्यक्रम यावेळी पार पडला.श्री येडेश्वरी देवीच्या वर्षातून भरणाऱ्या दोन यात्रे पैकी नारळी पोर्णिमा ही दुसरी महत्त्वाची यात्रा समजली जाते. त्यामुळे राज्यातून अनेक भाविक यात्रेला हजेरी लावतात.
LIVE Updates: सतिश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर
खोक्या ऊर्फ सतीश भोसले याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात त्याला अटक देखील करण्यात आली. सध्या तो बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस, गांजा आढळून आला होता. याप्रकरणी अँडव्होकेट राजन धसे यांनी युक्तिवाद केला होता. त्यानुसार शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
LIVE Updates: नागपूर शहरात नवीन 5 पोलिस ठाणी होणार, एकूण पोलीस ठाण्याची संख्या 40 होणार
नागपूर शहरात नवीन 5 पोलिस ठाणी होणार..एकूण पोलीस ठाण्याची संख्या 40 होणार.
- पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळात कळमना गाव, भांडेवाडी, खापरखेडा, पिंपळा आणि भिलगाव या नवीन पोलीस ठाण्याचा समावेश.
- नव्याने निर्मित या पोलीस ठाण्यांना लागणाऱ्या मनुष्यबळासाठी 269 पोलीस पदांच्या निर्मितीला गृह विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे.
- सध्या शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत सायबर पोलीस ठाण्यासह 35 पोलीस ठाण्याच्या समावेश आहे. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या पाहता, नवीन पोलीस ठाणी आवश्यक झाल्या आहेत.
LIVE Update: रेल्वेचा मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द
कल्याण लोक ग्राम आणि अंबरनाथ पादचारी पुलावरील गार्डन टाकण्याच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक
शनिवारी रात्री 12.10 ते सकाळी 6.55 च्या दरम्यान घेण्यात आला होता मेगाब्लॉक
मेगा ब्लॉक मुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आले असून काहींना दुसऱ्या मार्गावरून डायव्हर्ट करण्यात आला असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती
LIVE Updates: नागपूरमध्ये दररोज मोकाट कुत्र्यामुळे जखमी होण्याचे प्रकार वाढत आहेत
* नागपूरमध्ये दररोज मोकाट कुत्र्यामुळे जखमी होण्याचे प्रकार वाढत आहेत..
* शहरातील देशपांडे लेआऊट त्रिमूर्ती नगर येथील 5 वर्षीय चिमुकली कुत्र्याच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी..
* या हल्यात मुलगी थोडक्यात बचावल्याने परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण..
* जखमी मुलीचे नव नित्या श्रवण मोगरे असून ती परिसरात खेळत असताना अचानक 8 ते 10 कुत्र्यांनी तिच्या पाठीवर, मानेवर, पोटाला आणि पायावर चावा घेत तिला जखमी केले..
* परिसरातील लोक धाऊन आल्यामुळे चिमुकली थोडक्यात बचावली मात्र कुत्र्याच्या हल्ल्यामुळे जखमी झाली आहे..
LIVE Updates: नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ; अजनीवरून रोज सकाळी असेल सेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ रविवारी 10 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सकाळी 9 वाजता नागपूर रेल्वे स्टेशनवर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार असून, याच कार्यक्रमात बेंगळुरू-बेळगावी आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा - अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस सेवांचाही प्रारंभ होईल.