2 months ago

Maharashtra Live Update: गेल्या चार दिवसांपासून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कड़ू हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाला बसले आहेत. बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांनी उपोषण सोडावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना, तसेच विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा पाहायला मिळत आहे.

Jun 12, 2025 14:01 (IST)

LIVE Update: मोठी दुर्घटना! एयर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं

अहमदाबादमध्ये एयर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याचं समोर आले  आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात ही दुर्घटना घडली आहे. 

Jun 12, 2025 13:30 (IST)

LIVE Updates: अजित पवारांच्या ताफ्यातील अंब्युलन्सचा अपघात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याच्या पाठीमागे असलेल्या अॅम्बुलन्स वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अकोला शिवनी विमानतळाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना ताफ्याच्या पाठीमागे असलेल्या अॅम्बुलन्सचा अपघात झाल्याची माहिती. अकोला विमानतळ येथून राष्ट्रीय महार्गावरून येत असताना या ताफ्यातील अॅम्बुलन्सचा अपघात झाला. अजित पवारांच्या ताफ्यातील थार गाडीला धडक लागल्यामूळ अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे. सुदैवाने या अपघातात कुठलेही जीवितहानी नाहीये.

Jun 12, 2025 12:39 (IST)

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर!

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने कहर केला असून वादळीवाऱ्याचा तडाका बसल्याने जिल्ह्यात केळीच्या बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी  शेडनेट तसेच पॉलिहाऊस चे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खरिपाच्या पेरणीपूर्वीच जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Jun 12, 2025 12:38 (IST)

LIVE Updates: मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात शरद पवार एक्टिव्ह मोडवर

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाजवणार

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात शरद पवार एक्टिव्ह मोडवर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मुंबईत संकल्प शिबिर

पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी १५ जून ला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असतील

घाटकोपर मधील भानुशाली वाडी सभागृहात हा संकल्प शिबिर पार पडणार

Advertisement
Jun 12, 2025 10:42 (IST)

LIVE Updates: राज ठाकरे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक? सूत्रांची माहिती

राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मनसे ्अध्यक्ष राज ठाकरे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे  ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे. 

Jun 12, 2025 10:20 (IST)

Pune News: पुण्यात तापमानाचा पारा वाढला

पुण्यात तापमानाचा पारा वाढला 

ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे शहरातील वाढलेल्या उकाड्याने पुणेकर हैराण

जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे सर्वाधिक 32.9 तर शहरात मगरपट्टा परिसरात 31.9 सेल्सिअस कमात्ल तापमानाची नोंद झाली

रात्री साडेआठनंतर उपनगरातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

पुढील दोन दिवस शहरातील आकाश अंशत: ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडेल. 

पुढील तीन ते चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement
Jun 12, 2025 10:19 (IST)

LIVE Updates: छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रस्त्यावर अपघात

छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रस्त्यावर अपघात

लोखंडी सळाई घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात 

 चालकाने अचानक ब्रेक मारल्याने ट्रकचा समोरील भाग निखळून पडला 

लोखंडी सळाईसह ट्रकचा पुढील भाग रस्त्यावर

Jun 12, 2025 10:18 (IST)

Pune News: पुण्यातील गंगाधाम चौकात झालेल्या भीषण अपघाताविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

पुण्यातील गंगाधाम चौकात झालेल्या भीषण अपघाताविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

पुणे महापालिकेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच आंदोलन

शहरात होत असलेल्या अपघाताला महापालिकेचा पतविभाग जबाबदार असल्याचा आरोप 

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे रस्ते अपघातात वाढ होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

अंगाला रक्त ,लावत डोक्याला पट्ट्या बांधत अपघातग्रस्त व्यक्तीच्या वेशात महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन 

यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्राथमिक स्वरूपात खेळण्यातला ट्रक महापालिकेच्या मुख्य अभियंतांना दिला भेट 

काल सकाळी गंगाधाम चौकात झालेल्या अपघातात एका महिलेने आपला जीव गमावला होता 

याच विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने महापालिकेत जात आंदोलन केलं

Advertisement
Jun 12, 2025 09:49 (IST)

LIVE Update:बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप

बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप 

 गुरुकुंज मोझरी मध्ये बच्चू कडू यांचं पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू 

 डवरगाव येथे प्रहार कार्यकर्त्यांच अर्ध दफन आंदोलन 

 प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला घेतलं जमिनीत अर्ध गाळून 

 मागण्या संदर्भात फलक हातात घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी 

 बच्चू कडू यांच अन्नत्याग आंदोलन पेटलं

 डवरगाव येथील  प्रहार कार्यकर्त्यांचं अर्धदफन आंदोलन सुरु 

माऊली पोलीस स्टेशन पोलीस घटनास्थळी दाखल

Jun 12, 2025 09:21 (IST)

LIVE Updates: एसटी महामंडळाचा तोटा दोन वर्षांत दोन हजार कोटींनी वाढला

एसटी महामंडळाचा तोटा दोन वर्षांत दोन हजार कोटींनी वाढला

एकुण संचित तोटा ७ हजार कोटींवर 

२०१४ साली दिड हजार कोटी संचित तोटा होता 

सहा वर्षांत तोट्यात साडे पाच हजार कोटींचा भर

महामंडळ वाचवण्यासाठी एसटी महामंडळावर २०० जागा भाडेतत्वावर विकसीत करण्याची वेळ 

मंत्री प्रताप सरनाईक यांची एनडीटीव्हीला माहिती

Jun 12, 2025 07:35 (IST)

LIVE Update: डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग

गोवंडी येथे धक्कादायक एका डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग

आरोपी डॉक्टरचा दवाखाना असून पीडित त्याच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती.

 त्यावेळी डॉक्टरने पीडित तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तपासणीच्या नावाखाली तिचा विनयभंग केला. 

रुग्णालयात उपचार घेऊन आल्यानंतर तिने पालकांच्या संमतीने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी डॉक्टरविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ तसेच पोक्सोच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

Jun 12, 2025 06:43 (IST)

LIVE Update: प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस.

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस...

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह दिव्यांग, कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी कडूच आंदोलन....

आंदोलनाच्या पाचव्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी, संभाजी राजे छत्रपती, राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके भेट देणार..

Jun 12, 2025 06:39 (IST)

LIVE Update: हेडलाईटविना धावली बस, देवळा - कळवण मार्गावरील प्रकार

नाशिकच्या  देवळा - कळवण मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस रात्रीच्या हेड लाईटशिवाय प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला त्यामुळे परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.  विना हेडलाईटची बस चालकाने प्रसंगावधान राखत पुढे जाणाऱ्या मागून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशात कशीबशी कळवणला पोहोचविली. प्रवाश्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.जुन्या बसेसची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणी प्रवाशांनी केली 

Jun 12, 2025 06:38 (IST)

LIVE Update: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होतील - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

सांगली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून 2026 पर्यंत सिंचन योजना पूर्ण करण्याच्या प्रयत्न असणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.सांगली मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये परभणी विभागाच्या बैठक पार पडली.या बैठकीमध्ये मंत्री विखे-पाटील यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा घेत उर्वरित सिंचन प्रकल्पांचा काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या,माजी मंत्री सुरेश खाडे ,भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Topics mentioned in this article