2 months ago

 महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर आता दिल्लीमध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संसदेत सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरसह परराष्ट्रीय धोरणांबाबत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

Jul 20, 2025 22:37 (IST)

LIVE Update: अमरावतीत युनिकॉन स्पावर गुन्हे शाखेचा छापा

अमरावतीत युनिकॉन स्पा वर  गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे रेड..

स्पा मधील 3 ग्राहकांना अटक..

6 मुलींना देखील ताब्यात घेण्यात आलेय..

ताब्यात घेण्यात आलेल्या मुली दिल्ली, मुंबई, औरंगाबाद येथील असल्याची माहिती...

स्पा सेंटर सोमेश्वर येवते रा. मुंबई यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आलेय...

Jul 20, 2025 20:02 (IST)

LIVE Update: छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना लातूरमध्ये घडली. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या अंगावर पत्ते फेकल्यामुळे हा प्रकार घडला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पत्ते खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचा निषेध छावा संघटनेनं केला. त्यानंतर हा राडा झाला.    

Jul 20, 2025 19:46 (IST)

किल्ले रायगड ते माणगाव मार्गावर पर्यटकांच्या मिनिबसला अपघात

किल्ले रायगड ते माणगाव मार्गावर पर्यटकांच्या मिनिबसला अपघात

घरोशीवाडी येथील अवघड वळणावर मिनीबस पलटी

एक पर्यटक गंभिर तर 10 पर्यटकांना किरकोळ दुखापत.

जखमी पर्यटकांवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु.

Jul 20, 2025 19:43 (IST)

भाजपा नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले; मोठी दुर्घटना टळली!

भाजपा नेते आणि माजी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार स्नेहा दुबे आणि आमदार राजन नाईक यांना एक धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले. वसई पश्चिम येथील अपुलेंट ग्रँड बँक्वेट हॉल, कौल हेरिटेज सिटी येथे आयोजित कार्यक्रमासाठी जात असताना, लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते सर्वजण सात ते आठ मिनिटे लिफ्टमध्ये अडकले होते. घटनेवेळी लिफ्टमध्ये भाजपा कार्यकर्तेही उपस्थित होते. लिफ्टमधून कोणताही संपर्क होऊ शकत नसल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र तत्काळ मदत मागवण्यात आली आणि लिफ्टचे दरवाजे तोडून त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Advertisement
Jul 20, 2025 19:41 (IST)

25 वर्षांपासून भारतात राहत असलेला बांगलादेशी नागरिक अटक

कल्याण-डोंबिवली परिसरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी २५ वर्षांपासून भारतात राहून हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिक रिजाउल हक करीम याला कल्याणच्या दीक्षा हॉटेलमधून अटक केली आहे.

Jul 20, 2025 19:10 (IST)

LIVE Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई भाजपची महत्त्वाची बैठक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई भाजपची महत्त्वाची बैठक 

- मुंबईतील प्रमुख पदाधिकारी व आमदार वर्षा बंगल्यावर राहणार उपस्थित 

- आज रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

- मुंबई महापालिका निवडणुका दृष्टीने देवेंद्र फडणवीस देणार पदाधिकारी आमदारांना कानमंत्र

Advertisement
Jul 20, 2025 12:02 (IST)

Pune News: पुण्यात जड वाहनांसाठीचे निर्बंध चार दिवसांसाठी शिथिल

पुण्यात जड वाहनांसाठीचे निर्बंध चार दिवसांसाठी शिथिल

बांधकाम क्षेत्राशी संबंधित अवजड वाहनांसाठी असणारे निर्बंध पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने फक्त दोन शनिवार व दोन रविवारसाठी केले शिथिल

बदल प्रायोगिक स्तरावर असल्याने त्यानुसार बांधकाम क्षेत्रातील जड वाहनांना ठराविक वेळेमध्ये शहरात प्रवेश करता येणार

शहरातील मध्यवर्ती ठिकाणासह काही रस्ते रेड झोनमध्ये येत असल्याने त्यावर जड वाहनांना सरसकट बंदी नसेल

त्यांना सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत त्यांना वाहतूक करता येणार नाही

पुण्यात जड वाहनांसाठी काय आहे बदल

शनिवारी - १९आणि २६ जुलै - सायंकाळी ४ ते रात्री १० ही वेळ वगळून उर्वरित वेळेत बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी असेल

रविवारी - २० आणि २७ जुलै बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांना वाहतुकीसाठी पूर्ण वेळ परवानगी

Jul 20, 2025 09:06 (IST)

Pune News:पुण्यात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रांत समन्वय बैठक

पुण्यात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होणार प्रांत समन्वय बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची वार्षिक प्रांत समन्वय बैठक आज पार पडणार 

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये RSS ची महत्वाची बैठक 

या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रांतातील विविध संघप्रेरित संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, एकूण ५० संघटनांमधून सुमारे ४३४ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत

RSS च्या आजच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर,

नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा व महिला कार्यकर्तींचा सहभाग असणार आहे

Advertisement
Jul 20, 2025 08:58 (IST)

Pune News: पुणे शहरातील अनेक भागांमध्ये आज पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे शहराच्या अनेक भागांना पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली 

शहरातील अनेक भागांमध्ये आज पाणीपुरवठा राहणार बंद

पर्वती जलकेंद्रातून य एस एन डी टी कडे जाणारी पाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत 

मुख्य जलवाहिनीच्या कामाच्या दुरुस्ती वेळेस पाईपलाईन फुटली 

लाखो लिटर पाणी वाया 

शहरातील या भागांमध्ये आज पाणीपुरवठा राहणार बंद

शिवाजी नगर, मॉडेल कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, सेनापती बापट रोड, पौड रोड ,लॉ कॉलेज रोड, नळ स्टॉप, सहकार नगर, औंध ,बोपोडी ,पुणे विद्यापीठ परिसर , खडकी, सकाळ नगर, चतुर्शिंगी मंदिर परिसर

Jul 20, 2025 08:40 (IST)

Nashik News: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नाशिक ब्रेकिंग... - देवळाली ते नाशिक दरम्यान मध्यरात्रीच्या सुमाराला ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

- मध्यरात्रीच्या सुमारास वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत

- मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर घडली घटना

- ही घटना घडण्याच्या थोड्यावेळा अगोदर अस्वली ते पाडळी दरम्यान सुद्धा तुटली होती..

- त्या ओव्हरहेड वायर तिचे काम पूर्ण झाल्यावर नाशिक रोड जवळ तुटली

- रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल ओव्हरहेड वायर बसवण्याची काम युद्ध पातळीवर सुरू 

- मात्र या प्रकाराने मध्य रेल्वेची अप मार्गाची वाहतूक कोलमडली 

- अनेक एक्स्प्रेस गाड्या पाच ते सहा तास उशिराने

Jul 20, 2025 08:08 (IST)

Live updates: ठेंगोड्याच्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरी..

 नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू सिद्धिविनायक गणपती मंदिरात दोघा अज्ञात चोरट्यांनी  प्रवेश करून दानपेटीतील रोख 25 हजार रुपये व गणपतीची पितळी अभिषेक मूर्ती असा 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.चोरीचा हा थरार सिसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.विशेष म्हणजे नियमित रहदारी असणाऱ्या विंचूर - प्रकाशा महामार्गालगत भरवस्तीत मंदिर असून, मंदिरात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत..

Jul 20, 2025 08:06 (IST)

Live Updates: प्रेम संबंधाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

गेवराईच्या गंगावाडी येथे प्रेमसंबंधाच्या वादातून २१ वर्षीय शिवम चिकणे या तरुणावर पाच जणांनी लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण केली. ही घटना गंगावाडी ते तळवाडा रस्त्यावर घडली होती. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शिवम वर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आधी जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता, आता खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे. या प्रकरणात मुलीच्या वडिलासह एकाला अटक झाली असून, पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.

Jul 20, 2025 07:31 (IST)

Live Updates: नाशिक- इगतपूरीदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत

नाशिक- इगतपुरीदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं समोर आले आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईहून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने जात आहेत. सर्व गाड्या ३- ४ तास लेट असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Jul 20, 2025 06:21 (IST)

Jalgaon News: जळगावमध्ये नगर परिषदेच्या वतीने काढण्यात आली महास्वच्छता रॅली

जळगाव जिल्ह्यातील धडगाव येथे नगर परिषदेच्या वतीने महास्वच्छता रॅली चे आयोजन करण्यात आले होते या महा स्वच्छता रॅलीमध्ये शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. "सफाई अपनाओ बिमारी भागाओ " असा मानवी साखळीने आशय सादर करून या महा स्वच्छता रॅलीची सांगता करण्यात आली.

Jul 20, 2025 06:17 (IST)

Live Updates: वसई विरार शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड

वसई विरार शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार पुरवठा विभागाच्या कारवाईत उघडकीस आला आहे.  पुरवठा विभागाने केलेल्या धडक करवाईत 52 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. शहरात  प्रचंड वाढवणार्‍या लोकसंख्येमुळे घरगुती गॅस सोबतच व्यावसायिक सिलेंडरलाही मोठी मागणी होत असल्याने  गॅस सिलेंडर चा काळाबाजार  वाढू लागला आहे.

Jul 20, 2025 06:16 (IST)

Live Updates:: बेकायदेशीर अमलीपदार्थाची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..

नंदुरबार जिल्ह्यात धडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत एका चार चाकी वाहन धारक अमली पदार्थाची अवैध वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती या माहितीनुसार सापडा रचून आरोपीला अटक केले असून धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून गांजा खरेदी केली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे यासह नंदुरबार जिल्ह्यातून देखील गांजाची डिलिव्हरी देण्यासाठी एक इसम येत असल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्यालाही सापळा रचून अटक केली असता दोन्ही आरोपींकडून 16 किलो 90 ग्राम गांजा सह 10 लाख 80 हजाराच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.