49 seconds ago

Maharashtra Live Update: पालघर शहरातील मनोर रोडवरील भाजप कार्यालयासमोर लावलेला भरत राजपूत यांचा जिल्हा प्रमुख पदाच्या पुन्हा नियुक्तीबाबतचा शुभेच्छा बॅनर फाडल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रात्री 12 वाजताच्या सुमारास अज्ञात महिलेनं बॅनर फाडून पळ काढला. महिलेने बॅनर फडतानाचा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Jul 13, 2025 22:26 (IST)

दोन भाऊ एकत्र येत असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव, आदित्य ठाकरेंचा आरोप

दोन भाऊ एकत्र येत असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव आखला जात आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.  हा डाव भाजपने आखला असल्याचं ही ते म्हणाले. या राज्यात काही ना काही घडत आहे. पण गृह खातं काय करत आहे असा प्रश्न आहे असं ही ते यावेळी म्हणाले. 

Jul 13, 2025 21:21 (IST)

पंढरपुरात प्रवीण गायकवाड यांना दुग्धभिषेक ...

पंढरपूर आता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक घालण्यात आला. तब्बल 51 लिटर दूध वापरून प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक घालून शुद्धीकरण करण्यात आल. अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांना काळे फासल्याचे प्रकरण घडले. यानंतर पंढरपुरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पुष्पृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी करत गायकवाड यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

Jul 13, 2025 19:59 (IST)

LIVE Updates: लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

रस्त्याच्या कामाचा शुभारंभावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये लातूरमध्ये  राडा 

आ.अमित देशमुख रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनासाठी आले असता कार्यकर्त्यांमध्ये झाला राडा

भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने 

काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी

निषेधाचे फलक घेऊन भाजप कार्यकर्ते उद्घाटनाच्या स्थळी पोहोचले 

भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते लातूर शहरांमध्ये आमने-सामने 

पोलिसांनी केली मध्यस्थी

Jul 13, 2025 17:06 (IST)

LIVE Updates: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना फासण्यात आलं काळं

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आले आहे.  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट (सोलापूर) भागात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान काळं शाई फेकली गेली आणि त्यांच्या अंगावर शाई ओतण्यात आली. या शाईफेक करणाऱ्या गटाला शिवधर्म फाउंडेशन आणि काही शिवभक्त असल्याचे समजते.

Advertisement
Jul 13, 2025 13:42 (IST)

LIVE Updates: कांजूरमार्ग पूर्वेकडील एन जी रॉयल पार्कमध्ये आग

कांजूरमार्ग पूर्वेकडील एन जी रॉयल पार्क मधील बिल्डिंगच्या इलेक्ट्रिक डक मध्ये लागली आग 

सोळाव्या मधल्या वरील इलेक्ट्रिक डक्टला आग लागून आग पसरत अठरा माळापर्यंत पोहोचली 

घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल अग्निशामक दलाकडून आग विधानाचे प्रयत्न सुरू 

आग लागल्यामुळे बिल्डिंग मधील नागरिकांना बिल्डिंग केली संपूर्ण रिकामी

Jul 13, 2025 12:00 (IST)

LIVE Updates: इंदोर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनात योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदोर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनात योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकरी आक्रमक 

मुक्ताईनगर जवळील पूर्णा नदीवर शेतकऱ्यांकडून जलसमाधी आंदोलन छेडण्याचा प्रयत्न 

आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी 

आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी पूर्णा नदीत आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न 

पूर्णा नदी पात्रावर मोठा पोलीस बंदोबस्त त्यांना पोलिसांकडून आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह शेतकऱ्यांची करण्यात आली अडवणूक 

शेतकऱ्यांचा आंदोलन अधिक चिगळण्याची शक्यता

Advertisement
Jul 13, 2025 11:48 (IST)

LIVE Update: बच्चू कडूंची सातबारा कोरा यात्रा आज सातवा दिवस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी काढलेल्या सातबारा कोरा करा पायदळ यात्रेचा आजचा सातवा दिवस...

उद्या बच्चू कडूंची यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा गावात यात्रेची समारोप जाहीर सभा..

जाहीर सभेला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव, आमदार रोहित पाटील उपस्थित राहणार.

राज्यभरातील हजारो शेतकरी उद्या अंबोडामध्ये दाखल होणार; बच्चू कडूंच्या पदयात्रेने केला 101 किलोमीटरचा टप्पा पूर्ण.

यात्रेदरम्यान बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद. बच्चू कडू यांनी शेतात केली डवरणी आणि फवारणी

पापळ ते चिलगव्हाण एकूण 138 किलोमीटरची आहे पदयात्रा.

Jul 13, 2025 10:57 (IST)

Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची बैठक

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची बैठक

पुणे महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक 

पुणे शहराचे अध्यक्ष पदाधिकारी बैठकीला उपस्थितीत

बैठकीला शहराध्यक्ष सुनील टिंगरे सुभाष जगताप महिला आयोग,अध्यक्ष रूपाली चाकणकर,प्रवक्त्या रुपाली पाटील,माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थितीत

बैठकीला डिझाइन बॉक्स कंपनीचे सी इ ओ नरेश अरोरा देखील उपस्थितीत

पुण्यात बारामती हॉस्टेल येथे बैठकीला सुरुवात 

पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

Advertisement
Jul 13, 2025 10:33 (IST)

LIVE Update: परतवाडा-चिखलदरा मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी..

परतवाडा-चिखलदरा मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी..

धामणगाव गढी येथील चेक पोस्टवर वाहतुकीचे नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी...

दर शनिवारी आणि रविवारी होत आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..

रविवार असल्याने पर्यटकांची चिखलदऱ्याला जाण्यासाठी मोठी गर्दी.

Jul 13, 2025 10:29 (IST)

LIVE Update: खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांचं 'बंदूक फोटोशूट', चार जणांवर गुन्हा दाखल..!

खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी चक्क हॉटेलमध्ये बंदुकीसोबत फोटोसेशन केलं आणि ते फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर टाकून मिरवले. मात्र, हे ‘शो ऑफ’ चांगलंच अंगलट आलं. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ कारवाई करत चार जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग  मुंडे, रामचंद्र ओमासे असे या आरोपीचे नावं आहेत.  याप्रकरणी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, फोटो, आणि मोबाईल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू आहे. चारही आरोपींवर याआधी देखील सावकारी, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे आहेत. या चारही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Jul 13, 2025 07:46 (IST)

LIVE Update: जायकवाडी धरण जुलै महिन्यातच 75 टक्के भरलं

जायकवाडी धरण जुलै महिन्यातच 75 टक्के भरलं

यंदाही जायकवाडी 100 टक्के भरण्याची शक्यता

जायकवाडी धरणात अजूनही 15 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरूच

Jul 13, 2025 06:44 (IST)

LIVE Updates: युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत साल्हेर किल्ल्याचा समावेश

युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नाशिकच्या बागलाण तालुक्यातील छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या  साल्हेर किल्ल्याचा समावेश केल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बागांचे आमदार  दिलीप बोरसे ग्रामस्थांसह फेर धरत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला...

Jul 13, 2025 06:43 (IST)

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्याला आज 'यलो अलर्ट', जोरदार पावसाची शक्यता...

मुंबई वेधशाळा हवामान खात्याने आज नंदुरबार जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Jul 13, 2025 06:43 (IST)

LIVE Update: धडगाव बसस्थानकात घाणीचे साम्राज्य.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाची दुरवस्था झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्यपसरले आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत बसस्थानकातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत वाईट असून त्यांची नियमित साफसफाई केली जात नसल्याचे चित्र आहे. नव्याने बांधलेल्या बसस्थानकात स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. ठिकठिकाणी कचरा साचलेला असून दुर्गंधीमुळे प्रवाशांना बसस्थानकात थांबणेही असह्य झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे स्वच्छतागृहे पूर्णपणे दुर्लक्षित असून त्यांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे ती वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. यामुळे महिला प्रवाशांना विशेषत मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Jul 13, 2025 06:41 (IST)

LIVE Update:उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर

पहाटे सहा पासून अजित पवार आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी दौऱ्यावर आहेत, रस्त्या आणि वाहतूक कोंडी समस्येसाठी थेट आता अजित पवारच रस्त्यावर उतरले आहेत, सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा, त्यांना उचला, असा स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला..., अजित पवारांनी दिलाय, रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ, असं अजित पवारांनी सांगितलंय...

Topics mentioned in this article