Maharashtra Live Blog: महायुतीमधील मंत्र्यांची वादग्रस्त विधाने, भ्रष्टाचार तसेच नवनव्या कारनाम्यांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सध्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात छावा संघटना आक्रमक झाली असून राजीनामा न घेतल्यास महाराष्ट्रात फिरु न देण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची हकालपट्टी होणार असल्याचीही चर्चा आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.
Live Update : कॉरिडॉरचे प्रस्तावित नकाशे आणि नोटीस चंद्रभागेत विसर्जित, पंढरपूरकर आक्रमक
पंढरपुरातील चर्चेतील कॉरिडॉर हा रद्द करण्यासाठी आता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मंदिर परिसरातील स्थानिक राहिवाशी व्यापारी यांनी आज रस्त्यावर उतरून एक जिद्द कॉरिडॉर रद्दच्या घोषणा देत विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घातली. मंदिराच्या प्रदक्षिणेला कॉरिडॉर विरोधी घोषणेने एक प्रकारे मोर्चाचे स्वरूप आले होते. तसेच कॉरिडॉरचा प्रस्तावित असणाऱ्या आराखड्याच्या तथा नकाशाच्या प्रती ह्या चंद्रभागेत विसर्जनही करण्यात आल्या. मंदिर परिसरातून कॉरिडॉर विरोधाची मोहिम अधिक तीव्र आहे. पंढरपूर कॉरिडॉर सोबतच मंदिरे अधिग्रहणाचा 1973 चा कायदा रद्द करून मंदिर सरकार मुक्त करावे. अशी ही मागणी आता मंदिर परिसरातील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे.
Live Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर विचित्र अपघात, 25 वाहनं एकमेकांना धडकली
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर एक विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास 25 वाहनं एकमेकांना धडकली. 'एक्सप्रेस वे' च्या मुंबई लेनवर खोपोली एक्सिटच्या पुढे टोलनाक्याला येताना ब्रिज खाली हा अपघात झाला. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तर 21 जण जखमी झाले.
जखमींमध्ये मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या पत्नीचाही समावेश आहे. सर्व जखमींवर खोपोली नगर पालिका रुग्णालायत प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना कामोठेमधील MGM हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
Live Update: बीडमध्ये डॉक्टराचा संशयास्पद मृत्यू, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
बीड शहरातील एका डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरात डॉ. संजय ढवळे हे भाड्याच्या खोलीत राहायचे. त्याच ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्या खोलीत भूल देणारे औषध आणि एक सिरिंज देखील आढळून आली आहे. त्यामुळे त्यांची आत्महत्या आहे की हत्या हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोलीमधील संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यांची हत्या की आत्महत्या याचा तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.
Live Updates: संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी, ७ खासदार ठरले संसदरत्न
प्राईम पॅाईंट फौंडेशन तर्फे संसदरत्न पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.
संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी
महाराष्ट्रातील ७ खासदार ठरले संसदरत्न
उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी
सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तूहरी महताब आणि एन के प्रेमचंद्रन यांना पुरस्कार जाहीर
अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ , मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर
लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात.
Live Updates: पुणे विभागाच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेचा नाशिकमध्ये छापा
- पुणे विभागाच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेचा नाशिकमध्ये छापा
- देवळाली गाव परिसरातील कपालेश्वर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर ची जीएसटी गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी सुरू
- श्रीकांत परे असे संशयिताचे नाव असून संशयीताकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत राऊंड करण्यात आले जप्त
- संशयित बनावट सॉफ्टवेअर बनवून शासनाची फसवणूक करत असल्याप्रकरणी कारवाई सुरू असल्याची सूत्रांची माहिती
Live updates: पुणे शहरात हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल
पुणे शहरात हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल
शहरात हातभट्टी दारू तयार करणाऱ्या तसेच, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवली.
या कारवाईत १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त यांनी मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली.
विविध पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
त्यात हातभट्टी दारू, रसायन असा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
या कारवाईत २९ पोलिस अधिकारी आणि ९५ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला.
Live Updates: माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ होणारे आंदोलन रद्द
- माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ होणारे आंदोलन रद्द
- माणिकराव कोकाटे यांच्या भावनिक आवाहनानंतर समर्थकांनी आंदोलन घेतले मागे
- कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघात आज केले जाणार होते आंदोलन
- मी आजवर कृषी क्षेत्रात चांगले निर्णय घेतले आहे आणि यापुढेही शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.. चांगल्या कामांना गालबोट लागू नये असे कोकाटे यांचे आवाहन
Pune Crime: पुण्यात लष्कर,कोंढव्यात घरफोड्या करणारी टोळी गजाआड
पुण्यात लष्कर,कोंढव्यात घरफोड्या करणारी टोळी गजाआड
लष्कर आणि कोंढवा परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीतील तिघांना अटक केली.
सीसीटीव्ही चित्रीकरण, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
हे आरोपी यापूर्वीही अनेक घरफोड्यांच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे.
आर्यन अजय माने ऊर्फ मॉन्टी (वय २१, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी), विशाल मारुती आचार्य (वय २५, रा. रामटेकडी) आणि ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आर्यन माने आणि ओमकार गोसावी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या विरोधात हडपसर, वानवडी आणि लोणीकंद पोलिस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
ईस्ट स्ट्रीटजवळील एका बॅंकेत १५ जुलै २०२५ रोजी एकजण कपाट उघडून कागदपत्रांची नासधूस करत होता. तिजोरी उचलून ठेवण्यात आली होती.
या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Live Updates: श्रावणात श्रृंगेरी देवीच्या गडावर निसर्गाने पांगरला हिरवा शालू..!
श्रावण महिन्याच्या आगमनानंतर आष्टी तालुक्यात सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे निसर्गानेही हिरवळ पांघरली आहे. प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालाघाट आणि त्यातील श्रृंगेरी देवीच्या गडावर धुक्याची नजाकत त्यातच हिरव्या डोंगरांची मोहकता पाहता पाहता डोळ्यांचे पारणे फिटते आहे. डोंगररांगा धुक्याने व्यापलेल्या, निसर्ग मनमोहक सौंदर्याने नटलेले हे नयनरम्य क्षण भर पावसात पर्यटकांना खुणवताना दिसत आहेत.
Live Updates: ठाण्यातील जुना कोपरी पूल आठ दिवस राहणार बंद
आज पासून ठाणे पूर्वेतील सॅटिस प्रकल्पाच्या मार्गिकेसाठी रेल्वेच्या वतीने दोन्ही खांबांवर गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने जुना कोपरी पुल आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. २६ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत जुन्या पुलावरून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. कोपरीकरांना ८ दिवस वाहतूक कोंडीचे ठरणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन ठाणे वाहतूक विभागाने केले आहे. तसेच या गर्डरचे काम हाती घेतल्यामुळे रात्री मध्यरात्री देखील मेगाब्लॉक रेल्वे कडून घेतला जाणार आहे
Live Blog:पुण्याच्या इंदापुरात कारगिल दिनी माजी सैनिकांनी काढली रॅली
पुण्याच्या इंदापूर मध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.जय हिंद आजी-माजी सैनिक संघाच्या वतीने इंदापूर शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत माजी सैनिकांसह सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी जय जवान जय किसान,भारत माता की जय आशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीचा समारोप इंदापूर नगर परिषदेच्या प्रांगणात असलेल्या स्वातंत्र्यवीर स्तंभाला अभिवादन करून झाला.
Maharashtra Rain News: कासारसाई धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येवा येत असल्याने कासारसाई धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करणेसाठी कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात सुरु असलेला ४१४ क्यूसेक्स विसर्ग वाढवून १४०० क्युसेक्स करण्यात येत आहे. पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
Maharashtra Rain Live Updates: मुळशी धरणातून विसर्ग सुरु, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मुळशी धरण ८३.२०% भरले आहे व पाऊस अधिक प्रमाणात होत आहे.
मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 8900 Cusecs सुरु असणारा विसर्ग सकाळी ९:०० वाजता 12200 Cusecs करण्यात येईल, तसेच पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
हे आपल्या माहितीसाठी सविनय सादर.
Live Updates: जयंत पाटील यांच्या राजारामबापु साखर कारखान्याला 'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या
राजारामबापु साखर कारखान्याला
'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५'मिळाला आहे.साखर उद्योगातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल"द शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया"कडुन पुरस्कार हा पुरस्कार देण्यात आला आहे.दिल्ली येथे शानदार सोहळ्यात आमदार जयंत पाटलांनी साखर उद्योगातला हा मानाचा पुरस्कार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्वीकारला आहे. या नामांकित पुरस्कारामुळे राजारामबापू साखर कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Live Updates: जळगाव विमानतळाचा विस्तार दिवाळीनंतर होणार
राज्यातील अन्य विमानतळाच्या तुलनेत जळगाव मधील विमानतळावर प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र विमानतळाचा विस्तार रखडला आहे. दरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या नागरी विमान वाहतूक विभागाच्या बैठकीत खासदार स्मिता वाघ यांनी विमानतळाच्या विस्ताराला तातडीने चालना देण्याची मागणी केली होती यानुसार दिवाळीनंतर जळगाव विमानतळाचा विस्तार पुण्याचे संकेत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या बैठकीत दिले आहे.
Live Updates: काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी हर्षल पाटील कुटुंबियांची भेट घेत केले सांत्वन
काँग्रेसचे माजी मंत्री व कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी सांगलीतील कंत्राट हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.या ठिकाणी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेची थकीत दीड कोटी ची बिल मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी तांदुळवाडी मध्ये हर्षल पाटील कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आहे.त्याच बरोबर राज्य सरकारने तातडीने राज्यातल्या कंत्राटदारांचे थकीत बिल प्राधान्याने दिली पाहिजेत,अशी मागणी देखील केली.
Live Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाकाला सुनावले खडे बोल.....
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाकाला सुनावले खडे बोल.....
हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर ती अनधिकृत बांधकामे केल्यामुळेच हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले होते....
बसला देखील याच पाण्यातून वाट काढावी लागत होती....
हिंजवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती पाणी साचत असल्यामुळे थेट विकासकालाच तुमच्यामुळे बस पाण्यात गेल्या
तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या राज्याची होणार....
असं थेट अजित पवारांनी या विकासाला सुनावला आहे.....
Live Updates: रेशमा कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना
नवी मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबईतील तुर्भे इंदिरानगर परिसरातील रेशमा कंपनीमध्ये आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली.
आगीमुळे परिसरात मोठा धुराचा भडका उडाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट
कोणतीही जीवित हानी नाहीं
पोलीस प्रशासन घटना स्थळी दाखल.
अग्निशमन दला काडून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु.