2 days ago

पुण्यातल्या खडकवासल्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) मैदानावर यंदाचे दीक्षान्त संचलन (पासिंग आउट परेड) केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता; तो एक ऐतिहासिक, युगप्रवर्तक क्षण ठरणार आहे.  'एनडीए'च्या 75 वर्षाच्या प्रदीर्घ इतिहासात प्रथमच महिलांची पहिली तुकडी 'पासिंग आउट परेड'मध्ये सहभागी होईल.

May 30, 2025 20:50 (IST)

Live Update : शशांक हगवणेचे मामा IPS अधिकारी सुपेकरांना दणका

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर चर्चेत असलेले IPS अधिकारी जालींदर सुपेकरांना प्रशासनानं दणका दिला आहे. त्यांना दुय्यम दर्जाच्या पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. सुपेकर यापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा म्हणून कार्यरत होते. आता त्यांची उप महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य या पदावर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. हगवणे बंधूंना खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना देण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

May 30, 2025 19:43 (IST)

Live Update : जिल्ह्यात 3 मंत्री पण, एकही प्रकल्प नाही ! खडसेंचा निशाणा

जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असतानाही एकही प्रकल्प आणता आलेला नाही, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.  जामनेरमध्ये एक स्टाईल पार्क आणणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं. मात्र टेक्स्टाईल पार्क तर आला नाही तिथला साखर कारखाना व्हायच्या अगोदरच विक्रीला काढला असे म्हणत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर टीका केली आहे. तर खडसेंनी तीस वर्षाच्या काळात त्यांच्या मतदारसंघात विकासाची गंगा आणली असून विदेशातील लोक खर्चाच्या मतदारसंघात राहायला यायला लागले आहेत त्यामुळे तिथे राहायला सुद्धा घरे मिळत नसून खडसेंचा मतदारसंघ आता कॅलिफोर्निया व्हायचं बाकी असल्याचे म्हणत आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंच्या टिकीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

May 30, 2025 19:10 (IST)

Live Update : 'करो वा मरो' लढतीत मुंबई इंडियन्सची पहिल्यांदा बॅटिंग, वाचा कशी आहे Playing 11

आयपीएल 2025 मधील एलिमेनेटरमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सची (Mumbai Indians vs Gujrat Titans) यांच्यात एलिमेनेटरची लढत होत आहे. दोन्ही टीमसाठी ही लढत 'करो वा मरो' स्वरुपाची आहे.

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं टॉस जिंकून या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई इंडियन्सची Playing 11 : रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, हार्दिक पांड्या (कॅप्टन), राज बावा, मिचेल स्टँनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि रिचर्ड ग्लीसन

May 30, 2025 18:10 (IST)

Live Update : बुलडाण्यातील SP ठरले, 2 IPS अधिकाऱ्यांमधील वादाचा शेवट

बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नेमके कोण? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसह नागरिकांना पडला होता. या विषयावर अखेर तोडगा निघाला आहे. IPS अधिकारी निलेश तांबे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मुख्य खुर्ची मिळाली आहे. 

विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी झालेल्या दोन तासाच्या चर्चेनंतर हा तोडगा निघाला. त्यानंतर तत्कालीन  जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी खुर्चीचा ताबा सोडला. 

Advertisement
May 30, 2025 17:34 (IST)

Live Update : 17 वर्षांच्या मुलीवर प्रियकराचा गोळीबार, पालघर हादरले

पालघरच्या केळवा बीच येथील एका न्याहारी निवारा केंद्रात (रिसॉर्टमध्ये) 17 वर्षांच्या मुलीवर प्रियकाराने गोळीबार केल्याल्याने एकच खळबळ उडाली आहे.  रागाच्या भारत प्रियकराने गोळीबार केल्याने अल्पवयीन तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात  केळवा सागरी पोलिसांनी आरोपी दिनेश धोडी याला ताब्यात घेतले आहे.

May 30, 2025 16:35 (IST)

Live Update : देशाच्या GDP वाढीच्या दरामध्ये मोठी घसरण

भारताचा जीडीपी (GDP) वाढीचा दर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 6.5 टक्के नोंदवण्यात आला आहे, जो मागील आर्थिक वर्ष 2023-24 मधील 9.2 टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च 2024-25 या तिमाहीत भारताची जीडीपी वाढ 7.4 टक्के पर्यंत धीमी झाली, जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 8.4 टक्के होती.

Advertisement
May 30, 2025 15:58 (IST)

Live Update : वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक

पुण्यातील विवाहित महिला वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आले आहे. निलेश चव्हाणकडेच वैष्णवीचे बाळ होते. त्याला पुण्यातील बावधन पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवर अटक केली आहे. तो 21 मे पासून फरार होता. 

May 30, 2025 14:59 (IST)

LIVE Update: गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता

गोकुळ दूध संघ अखेर महायुतीच्या ताब्यात गेला आहे. हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची गोकुळचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

Advertisement
May 30, 2025 12:59 (IST)

LIVE Updates: आषाढीच्या तोंडावर पालखीमार्गावर आढळले कोरोना रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असताना. आषाढी यात्रेच्या तोंडावर पालखी मार्गावर असणाऱ्या अकलूज आणि माळीनगर परिसरात दोन संशयित कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आषाढीचा सोहळा जवळ आला आहे. माळशिरस तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या दोन्ही पालख्या वास्तव्याला असतात. अशातच माळशिरस तालुक्यातूनच कोरोना आणि पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे संपूर्ण जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

May 30, 2025 12:46 (IST)

Beed News: रूपाली चाकणकर यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन

बीडच्या अंबाजोगाईमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा  रुपाली चाकणकर यांनी वैष्णवी हगवणे हिची तक्रार दाखल करून घेऊन कारवाई केली असती तर हा प्रकार घडलाच नसता. त्यांनी बेजबाबदारपणे केलेल्या वक्तव्याचा निषेध करत, रुपाली चाकणकर

 यांच्या फोटोला DPI च्या बीड जिल्हाध्यक्ष उषा चव्हाण यांनी फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

May 30, 2025 12:23 (IST)

Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकरी अनुदाना वाटप मध्ये 50 लाखांचा अपहार

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 50 लाखांचा अपार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जत तालुक्यातील बाज शाखेत हा प्रकार घडला आहे.शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यासाठी आलेला अनुदानाच्या रक्कमे मध्ये 

हा अपहार करण्यात आल्याचं समोर आले आहे.2017 मध्ये सदरचा अपहर झाला असून तबल आठ वर्षानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.दरम्यान या घटनेनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाकडून बाज शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशीच्या अहवालानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा जिल्हा बँक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

May 30, 2025 12:22 (IST)

LIVE Updates: शिर्डी ते गाणगापूर प्रवास करणाऱ्या 25 ते 30 भाविकांच्या बॅग झाल्या चोरी

शिर्डी ते गाणगापूर प्रवास करणाऱ्या 25 ते 30 भाविकांच्या बॅग झाल्या चोरी 

सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर प्रवासी करतायत ठिय्या आंदोलन 

सर्व प्रवासी हे आंध्र प्रदेश मधील येलूर जिल्ह्यातील मकिनवारगुडम गावाचे आहेत रहिवासी 

यावेळी बॅगमधील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या असल्या कारणाने प्रवासी महिलांना अश्रू झाले अनावर 

पोलिसांकडून रस्त्यावर बसलेल्या प्रवास्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून बसावण्याचे काम सुरु 

सर्व प्रवासी हे आंध्र प्रदेश मधील रहिवासी असल्याने पोलिसांशी संवाद साधताना भाषेचा येतोय अडथळा

दरम्यान,तेलगू - मराठी दुभाषिकच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय 

May 30, 2025 08:59 (IST)

LIVE Updates: बीडचा बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो

बीड शहराला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड शहर आणि ग्रामीण भागात पडत असलेल्या पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आले आहे. त्यातच बिंदुसरा धरण देखील भरले असून पाणी ओव्हर फ्लो झाला आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात पहिल्यांदाच बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाला आहे.

May 30, 2025 06:50 (IST)

LIVE Updates: अमरावतीच्या धरणी शहरात एकाच रात्री तीन घर फोड्या

अमरावतीच्या धरणी शहरात एकाच रात्री तीन घर फोड्या...

हॉटेल चालक सुरेश पंड्या, ज्ञानेश्वर कातखेडे, गजेंद्र हाडोळे यांच्या घरात चोरी...

लाखो रुपयांचा मुद्देमाल चिरोट्यांकडून लंपास...

धरणी शहरातील बंद असलेली घर चोरट्यांकडून केली जात आहेत टारगेट...

या घटनेचा तपास धारणी पोलीस करताहेत..

May 30, 2025 06:49 (IST)

LIVE Updates: साताऱ्यात दोघांना कोरोनाची लागन

साताऱ्यात दोघांना कोरोनाची लागन

एक 70 वर्षीय महिलेबरोबर 28 वर्षाच्या युवकाचा समावेश

70 वर्षाची महिला रहिमतपुरातील तर युवक बनवडी कराड येथील 

दोघांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

May 30, 2025 06:49 (IST)

Nandurrbar News: नंदुरबारमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट

 नंदुरबार शहरात चोरट्यांनी आपला मोर्चा आता थेट गौमातेकडे वळविला असून नंदुरबार शहरातल्या कन्यादान मंगल कार्यालय परिसरात गौमाते चौरणारे हे भुरटे चोर थेट सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.  रात्रीच्या वेळी आलेल्या या चोरट्यांनी एका घरात बांधलेली गौमात पळविल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत असून या मुळे या भुरट्या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी गोरक्षकांकडून केल्या जात आहे.

May 30, 2025 06:48 (IST)

LIVE Update: सट्टा लावणाऱ्या दोन आरोपींना अटक

कार मध्ये बसून आयपीएल मॅच वर सट्टा लावणाऱ्या दोन आरोपीना गणेशपेठ पोलिसांनी केली अटक...

कोणाला संशय येऊ नये म्हणून आर एस हॉटेल च्या समोर कार लावून मोबाईल च्या माध्यमातून लावत होते ऑनलाइन सट्टा 

सुरेंद्र डोळे , आणि हेमंत बलबुज असे या आरोपीचे नाव 

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की गणेशपेठ परिसरातून आयपीएल मॅच वर सट्टा लावला जात आहे 

पोलिसांनी पाहणी केली असता कार मध्ये दोन जन संशयित रित्या बसले होते 

त्यांच्या कार ची आणि त्यांची तपासणी केली असता मोबाईल वर अँप च्या माध्यमातून सट्टा लावत असल्याचं स्पष्ट झालं 

पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक करत कार आणि मोबाईल त्याच प्रमाणे 42 हजार नगदी रक्कम असा 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला 

Topics mentioned in this article