18 hours ago

Maharashtra Live: दौंडच्या यवत येथे व्हाट्सअप ग्रुपवर अक्षपार्य पोस्ट केल्याने दोन गटात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वीच आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभा झाल्या होत्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन गटात तणावाचं वातावरण निर्माण झाले. सध्या याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Aug 02, 2025 19:47 (IST)

Live Update : चाळीसगाव पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 24 जुलै रोजी नाकीबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी 64 कोटी 90 लाख रुपये किमतीचे अंँफेटामाईन ड्रग्स हे अत्यंत घातक अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणाची तपासणी करताना पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून तामिळनाडूमधील नागापट्टम जिल्ह्यातील विलुंदामावडी येथून ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार महालिंगम नटराजन यास अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी महालिंगम नटराजन याचा मुलगा योगेश नटराजन हा विदेशात फरार होण्यास यशस्वी झाला आहे. 

विलुंदामावडी हे गाव श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असल्याने जलवाहतुकी द्वारे महालिंगम नटराजन याच्याकडून परदेशातही ड्रग्स तस्करी केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार याची राजकीय पार्श्वभूमी समोर आली असून महालिंगम नटराजन आणि त्याची पत्नी हे विलुंदामावडी येथील माजी सरपंच आहे तर महालिंगम नटराज यांचा दुसरा मुलगा ॲलेक्स महालिंगम हा जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात दिल्ली येथील कारचालक असीम अब्दुल सय्यद यास पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तर देशभर या ड्रग्स तस्करीचे पाळमूळ रोवल्या गेल्याचा पोलिसांना संशय आहे..

Aug 02, 2025 17:23 (IST)

Live update: कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनला लागली आग

मुंबई- इगतपुरी मार्गावर इगतपुरीजवळ कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागली आहे. इंजिनला आग लागल्यानं कामायनी एक्सप्रेस इगतपुरीजवळ थांबवली. सुदैवाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. इंजिनची तपासणी सुरू असल्यानं कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी आहे. जवळपास 45 मिनिटांपासून कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी असल्यानं प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला. 

Aug 02, 2025 17:05 (IST)

Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 महिन्यांच्या मुलीचं अपहरण! आरोपीला ठोकल्या बेड्या

सहा महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून हैदराबादस्थित व्यापाऱ्याला दीड लाख रुपयांत विक्री करणाऱ्या टोळीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातमधील अहमदाबादच्या ढोलका परिसरातून सहा महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून हैदराबादस्थित व्यापाऱ्याला दीड लाख रुपयांत विक्रीचा सौदा ठरला होता. मुलीचे अपहरण केल्यावर आरोपी छत्रपती संभाजीनगरमार्गे रेल्वेने हैदराबादला निघाले होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासातून आरोपी महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्याचे निष्पन्न होताच गुजरात पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. 

त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तत्काळ गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर पथक तातडीने रेल्वेस्थानकावर पोहोचले. सीसीटीव्ही फुटेजच्या वर्णनावरून आरोपी मनीषा, बिमलसोबत जयेशही मिळून आला. त्यानंतर चिमुकलीला ताब्यात घेत सर्वांना अटक करण्यात आली.

Aug 02, 2025 15:39 (IST)

Live Update : बीडमध्ये हॉटेल मालकाकडून कामगाराची हत्या, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

बीड जिल्ह्यातल्या आष्टीतील खडकत परिसरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलमालकानं कामगाराची हत्या  केल्याचा  गंभीर आरोप मृत कामगाराच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात आरोपींवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृत सिताराम ढवळे या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत, मृताच्या आई-वडिलांनी आणि भावाने बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून, आम्हाला फक्त न्याय हवा आहे. अशी ठाम भूमिका घेतली आहे. आता या प्रकरणातील प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Advertisement
Aug 02, 2025 10:43 (IST)

LIVE Updates: पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड

पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड

गाड्या तोडफोड सत्र थांबेना

टोळक्याकडून गाड्या फोडून दहशत वाजवण्याचा प्रकार.

सिंहगड रोडवरील हिंगण्यातील खोराड वस्ती भागात गाड्या तोडफोडीवी घडली घटना

15 ते 20 तरुणांच्या टोळक्याने परिसरात गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. 

रात्री सव्वा आठ साडे आठच्या सुमारास म्हसोबा मंदिर परिसराकडून आलेल्या तरुणांच्या हातात कोयते तसेच रोड (लोखंडी गज) होते. त्यांनी वरच्या भागातील गाड्या फोडण्यास सुरुवात केली. सोबतच परिसरातील नागरिकांना धमकाविले. .

८ ते १० दुचाकी, रिक्षाचे केले नुकसान केले.यापूर्वी देखील या भागात अशा तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. मध्यंतरी कोयता गॅंगने दहशत माजविण्याचा प्रकार घडला होता दोन गटात होणाऱ्या भांडणांमध्ये स्थानिक नागरिकांना नाहक त्रास

पोलिसांकडून कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी ठोस कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Aug 02, 2025 09:51 (IST)

LIVE Updates: रोहिणी खडसे शरद पवार यांच्या भेटीला

रोहिणी खडसे शरद पवार यांच्या भेटीला 

रोहिणी खडसे यांच्या पति वर पुणे पोलिसांनी रेव पार्टी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे 

त्यानंतर रोहिणी खडसे पुण्यात शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत दाखल

Advertisement
Aug 02, 2025 09:51 (IST)

LIVE Update: प्रवीण गायकवाड यांना पोलीस संरक्षण

प्रवीण गायकवाड यांना पोलीस संरक्षण 

अक्कलकोट येथे हल्ला झाल्यानंतर प्रवीण गायकवाड यांना देण्यात आला पोलीस बंदोबस्त 

प्रवीण गायकवाड शरद पवारांच्या भेटीला आले असता त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त

Aug 02, 2025 08:00 (IST)

LIVE Update: तुळजाभवानी देवीची तलवार गहाळ?

तुळजाभवानी देवीची तलवार गहाळ?

मंत्रोपचाराणे देवीच्या अष्ट आयुधांतील तत्व आणि शक्ती तलवारीत काढले, त्यानंतर तलवार गायब केल्याचा आरोप

तुळजापुरात कधीही न होणारी मंत्रोपचार पूजा पहिल्यांदाच पार पडली

 त्यामध्ये देवीचे तत्व आणि शक्ती तलवारीत काढली त्यानंतर तलवार बाहेर घेऊन गेले भोपे पुजारी मंडळाचा आरोप

मंदिर संस्थानला देवीची तलवार कुठे याबाबत काहीही माहिती नाही

देवीची तलवार मंदिरात घेऊन यावी पुजारी मंडळाची मागणी

पद्मश्री गणेश द्रविड शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभरापूर्वी झाली होती पूजा 

तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याच्या कामाच्या अनुषंगाने करण्यात आली होती ही पूजा

याच पूजेदरम्यान होम हवन करत देवीच्या आयुधांतील तत्व आणि शक्ती तलवारीत काढल्याचा आरोप

Advertisement
Aug 02, 2025 06:45 (IST)

LIVE Update: जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी

 जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता मात्र पुन्हा एकदा पावसाने दडी मारली असून ढगाळ वातावरणामुळे तापमानातही वाढवून उकाडा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Aug 02, 2025 06:45 (IST)

LIVE Updates: भुसावळ तालुक्यातील सूनसगाव येथे गुरांना लायखुरी आजाराची लागण

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या सुनसगाव येथे गुरांना लायखुरी या आजाराची लागण झाली असून या आजारामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लायखुरी आजारामुळे गुरांच्या पायाला भेगा पडून जखमा होत असून तसेच सतत तोंडातून लाळ गळत असल्याने गुरे अशक्त होतात. दरम्यान याबाबत पशुपालक शेतकऱ्यांकडून पारंपारिक औषधोपचार केले जात असून पशुवैद्यकीय विभागाकडून लायखुरी आजार झालेल्या गुरांची तपासणी करून योग्य औषधोपचार करण्याची मागणी पशुपालन शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Aug 02, 2025 06:44 (IST)

Nashik News: कळवणच्या बिलवाडी ग्रामपंचायतच्या गैरव्यवहार..?

नाशिकच्या कळवण तालुक्यातील बिलवाडी ग्रामपंचायतीमध्ये आलेल्या  निधीतून विकासकामे न करता मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार. करण्यात आला असून , वारंवार चौकशी करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून दखल  घेतली जात नसल्याने अखेर ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयावर धडक देत १५ ऑगस्टपर्यंत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

Aug 02, 2025 06:44 (IST)

LIVE Update: आमदाराच्या आईच्या नावाने चौक, काँग्रेसने केला विरोध

चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी एका चौकाला आपल्या आईचे नाव देण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे काँग्रेसने आज निषेध आंदोलन केले. आमदार जोरगेवार यांच्या आई अम्मा नावाने ओळखल्या जायच्या. मुलगा आमदार झाल्यावरही त्यांनी आपला बांबूच्या टोपल्या विकण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरूच ठेवला. गांधी चौकालगत असलेल्या सात मजली इमारतीबाहेर त्या बसायच्या. यामुळे या जागेला अम्मा चौक नाव द्यावे, यासाठी आमदार जोरगेवार यांनी महापालिकेत ठराव मंजूर करवून घेतला.