Teachers Protest: राज्यातील शाळा बंद! शिक्षकांच्या संपावर प्रशासनाचा कठोर निर्णय, परिपत्रक काढले...

या आंदोलनात विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील शिक्षक आमदारांनीही पाठिंबा दर्शविल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Teachers Protest: राज्यातील शिक्षण क्षेत्रात सध्या टीईटी सक्ती आणि 2024 चे संच मान्यता धोरण या दोन प्रमुख मुद्द्यांवरून मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. शिक्षक संघटनांनी या धोरणांना विरोध दर्शवत आज( ५ डिसेंबर) राज्यभरातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित 80 हजारांहून अधिक शाळांनी बंद पुकारला आहे. शिक्षक संघटनांच्या या आंदोलनामुळे प्रशासन आणि शिक्षक आमदारांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. 

राज्यातील 80,000 शाळा बंद!

 शासनाने तात्काळ सन २०२४ चे संच मान्यता धोरण रद्द करावे आणि टीईटी परीक्षेच्या सक्तीमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी राज्यातील शिक्षकांची मागणी आहे. टीईटी सक्तीमुळे अनेक अनुभवी शिक्षकांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असा संघटनांचा दावा आहे. ​या आंदोलनात विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील शिक्षक आमदारांनीही पाठिंबा दर्शविल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे.

RTO News: दुचाकी वाहनासाठी पसंतीचा नोंदणी क्रमांक हवाय? मग RTO ने उपलब्ध करून दिलीय मोठी संधी

 केवळ अमरावती जिल्ह्यातच १२ हून अधिक संघटनांचे हजारो शिक्षक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, अमरावती शाखेकडून याबाबत निवेदनही जारी करण्यात आले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघटनांकडून निदर्शने केली जाणार आहेत.

शिक्षकांचे पगार कापले जाणार?

​दरम्यान, या आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई करण्यात येईल, असे पत्र प्रशासनाने काढले आहे. या पत्रावर शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.  हे पत्र कोणतीही चर्चा न करता काढण्यात आले आहे, असा आरोप ​शिक्षक संघटनेच्या नेत्या संगीता शिंदे यांनी केला आहे. 

दरम्यान, आंदोलन लोकशाही मार्गाने केले जात असताना वेतन कपातीची धमकी देणे ही निव्वळ दडपशाही असून ती खपवून घेतली जाणार नाही, असे म्हणत संगिता शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. 

नक्की वाचा - Shocking news: विवाहितेसोबत प्रेम संबध, तिच्या मुलीसोबत शारिरीक संबंध, प्रकरण इतकं वाढलं की शेवटी दोघींनी...