राहुल तपासे, सातारा: राज्यामध्ये मान्सूनची एन्ट्री होताच पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसला. पुणे, बारामतीसह सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. साताऱ्यातील माण- खटावसह फलटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला असून माणगंगा नदीसह आंधळी धरण, येरळा धरणाला पूर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात रविवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बानगंगा नदीने पूर रेषा ओलांडल्याने नदीलगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय नदी ओढे नाल्याद्वारे येणाऱ्या पाण्यामुळे 24 ठिकाणी छोट्या मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेणे सतर्कता म्हणून 10 ठिकाणचे रस्ते बंद करण्याचे लेखी आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत. फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी काही ठिकाची जाऊन स्वतः पाहणी केली.
फलटणमधील बंद झालेले रस्ते!
जिंती साखरवाडी बडेखान नांदल विवो वाघोशी ताथवडे उपळवे -दऱ्याचीवाडी वोडकेवाडी गिरवी
जिंती साखरवाडी वडेखान नांदल विवो वाघोशी ताथवडे उपळवे दऱ्याचीवाडी बोडकेवाडी गिरवी
पाडेगाव रावडी मुरूम होळ जिंती सोमंथळी सांगवी सरडे गोखळी आसू
पाडेगाव रावडी मुरूम होळ जिंती सामंथळी सांगवी सरडे गोखळी आसू
गिरवी मांडवखडक वाखरी मिरगाव निभारे फडतरवाडी जिंती को-हाळे
मुरूम पिंपळवाडी फडतरवाडी
मुरूम पिंपळवाडी फडतरवाडी
माण तालुक्यातही अनेक गावांचा संपर्क तुटला:
त्यासोबतच माण तालुक्यामध्येही अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. माण तालुक्यातील शिंगणापूर- फलटण रस्ता, दहिवडी फलटण रस्ता, आंधळी- मलवडी रस्ता, मलवडी- कुळकजाई, राजवडी- बिजवडी या गावांना जोडणारे रस्ते बंद झाले आहेत. माणमधील दहिवडी, आंधळी, शिंगणापूर तसेच खटावमधील पुसेगाव, वडूजला पावसाने झोडपून काढले असून नदी, नाले, ओढे, तलाव, बंधारे दुथडी भरुन वाहत आहेत. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबरही जारी केले आहेत.