29 minutes ago

Maharashtra Live Blog:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई पुण्यासह रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार सुरु असून धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आजही अनेक भागांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

Jul 27, 2025 17:40 (IST)

Live Update: उरणच्या मोरा जेट्टी जवळ समुद्रात बोट उलटली, एकाचा मृत्यू

उरणच्या मोरा जेट्टी जवळ 10 खलाश्याना परत घेऊन येणारी बोट उलटली आहे. त्यात  एका परप्रांतीय खलाश्याचा मृत्यू झाला आहे.  मासेमारी व प्रवासी बोटीला समुद्रात बंदी असूनही काल शनिवारी उरण मधील कारंजा येथील तुळजाई बोट अलिबाग जवळ खांदेरी किल्ल्याजवळ लाटांच्या माऱ्यामुळे उलटली. तर त्यातील पाच जण बचावले तर तीन अद्याप बेपत्ता होते.  पुन्हा उरण मधील मोरा जेट्टी जवळ 10 खलाश्याना परत घेऊन जाणारी छोटी बोट उलटून 1 पर प्रांतीय खलाश्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय अधिकारी व बंदर अधिकारी यांच्या कामकाज बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Jul 27, 2025 17:06 (IST)

Live Update: भारत इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलचे शतक

भारत इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलने शतक ठोकले आहे.  229 चेंडूत गिलने शतक केले. कसोटी सामन्याचा हा शेवटचा दिवस आहे.  इंग्लंडला विजयासाठी आणखी सात विकेट्सची गरज आहे. आजचा खेळ सुरू झाल्यानंतर के.एल राहुलला बाद करण्यात इंग्लंडला यश आलं. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. पण शुबमन गिलने आपलं शतक पूर्ण केलं. 

Jul 27, 2025 16:18 (IST)

Live Update: रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपींना घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण

रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपींना घेऊन पुणे पोलीस पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडे रवाना

७ ही आरोपींना न्यायालयात करण्यात येणार हजर

न्यायलासमोर थोड्याच वेळात होणार सुनावणी

Jul 27, 2025 11:41 (IST)

Live Updates: नाशिकमध्ये झालेल्या GST गुप्तचर विभागाच्या धाडीत सापडला मोठ घबाड

- नाशिक मध्ये झालेल्या GST गुप्तचर विभागाच्या धाडीत सापडला मोठा घबाड

- काल नाशिक रोड भागात राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंता च्या घरी gst विभागाच्या गुप्तचर खात्याकडून झाली होती छापेमारी

- याच छापेमारीत या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात रोकड अधिकाऱ्यांनी केले जप्त

- श्रीकांत परे या संशयित युवकाच्या घरी झाली होती छापेमारी

- जीएसटी विभागाचा कर चुकवल्याचा अधिकाऱ्यांना होतात संशय

- याच संशय प्रकरणी छापेमारी केला असता करोडो रुपयांचे रोकड या संशयीताकडे सापडल्याची माहिती

- 2 पेट्या भरून रोकड या युवकाकडे सापडल्याची माहिती

Advertisement
Jul 27, 2025 10:46 (IST)

Live Updates: उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, उत्तम आरोग्यासाठी मुंबादेवी मंदिरात महायज्ञ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देतायत तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करताना पाहायला मिळतायत. शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो आणि प्रकृती स्वस्थ राहो यासाठी मुंबईच्या प्रसिद्ध अश्या मुंबादेवी मंदिरात भेट नवचंडीका महायज्ञ ठेवलाय

Jul 27, 2025 10:18 (IST)

Live Updates: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, माजी आमदार रमेश थोरात करणार अजित पवार राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दौंड मध्ये मोठा धक्का 

अजित पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार रमेश थोरात करणार अजित पवार राष्ट्रवादी मध्ये प्रवेश 

एक ऑगस्ट रोजी वरवंड या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा 

त्याचबरोबर अनेक पदाधिकारी ही रमेश थोरातंबरोबर करणार राष्ट्रवादीत प्रवेश..

दौंडचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये करणार प्रवेश 

अजित पवारांच्या उपस्थितीत एक ऑगस्ट रोजी वरवंड या ठिकाणी प्रवेश 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून लोकनेते शरद पवार यांचा गट, तर दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट असे दोन गट पडले होते.

भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदांच्या निवडणुका लक्षात घेता रमेश थोरात यांचा प्रवेश राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे..

दौंड तालुक्यात कुल आणि थोरात ही ताकद नाकारून चालणार नाही.

पक्ष कुठलाही असो, त्याला पाठबळ मात्र कुल आणि थोरात यांचे असते, तेव्हा सध्या तरी कुल आणि थोरात हेच दोन गट तालुक्यात कार्यरत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला रामराम ठोकून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. परिणामी त्यांनी राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांचा काळ लोटल्यानंतर रमेश थोरात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस

Advertisement
Jul 27, 2025 10:16 (IST)

Pune News: पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

पुणे जिल्ह्यातील निरा देवघर धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत

सुमारे ४५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग निरा नदीत सुरू आहे

धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विसर्गात वाढ करण्यात आली आहे... सध्या धरण ८७ टक्के भरले असून जलसाठा वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा भोर  प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

संभाव्य धोका लक्षात घेता निरा नदीकाठी नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

Jul 27, 2025 09:25 (IST)

Live Updates: पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांची छापेमारी

पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांची छापेमारी

पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात सुरू होती रेव्ह पार्टी

पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्का चे सेवन

खराडी भागातील एका फ्लॅट मध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू होती रेव्ह पार्टी

रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त

Advertisement
Jul 27, 2025 08:00 (IST)

Live Updates: तुळजाभवानी देवीच्या मंदिरात लाडू प्रसादाच्या दरावरून भोपे पुजारी मंडळ नाराज

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात लाडू प्रसादाच्या दरावरून भोपे पुजारी मंडळ नाराज

भाविकांना चक्क सहाशे रुपये किलोने दराने खरेदी करावा लागतोय लाडू प्रसाद

लाडू प्रसाद देताना मंदिर संस्थान कडून सर्वसामान्य भाविकांचा विचार करणे अपेक्षित होतं, पण झाला नसल्याचे पुजारी मंडळाचे मत 

मोठमोठ्या देवस्थान मध्ये मोफत अन्नछत्र चालतात मग मोफत लाडू प्रसाद प्रसाद द्यायला हवा असेही व्यक्त केले मत

भक्तांना 30 रुपयात मिळतोय 50 ग्राम वजनाचा लाडू प्रसाद, मोफत परवडतच नसेल तर माफक पन्नास रुपयात दोन लाडू द्या!

भोपे पुजारी मंडळ याबाबत मंदिर संस्थानला निवेदन देऊन मागणी करणार 

Jul 27, 2025 07:39 (IST)

Live Update: मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्याच्या शिरपूर नजीक असलेल्या पळासनेर जवळ ट्रॉला आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे... महामार्गावरील स्पीड ब्रेकर जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनावरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॉला थेट सफरचंदाने भरलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला आहे, अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत... दोघंही जखमींना तत्काळ स्थानिकांच्या मदतीने शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे... सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे...

Jul 27, 2025 06:59 (IST)

Live Updates: भाटघर आणि वीर धरणातून विसर्गात वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भाटघर आणि वीर धरणातून विसर्गात वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पावसामुळे धरणांत वाढलेला जलसाठा लक्षात घेता, भाटघर व वीर धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित पाटबंधारे विभागांनी दिली आहे.

Jul 27, 2025 06:58 (IST)

Live Update: शेताच्या आखाड्यावर लुटमार करणाऱ्या टोळीतील दोघांना औंढा पोलिसांनी पकडले

 औंढा नागनाथ हद्दीमध्ये शेताच्या आखाड्यावरील शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने आणि मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली होती दरम्यान औंढा पोलिसांनी लुटमार करणाऱ्या टोळीचा शोध घेतला असता या टोळीतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या टोळीतील आणखी दोघांचा शोध सुरू आहे.. शेतशिवारातील आखाड्यांवर चोरट्यांकडून लुटमार करण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत असल्याने शेतीच्या आखाड्यावर राहणाऱ्या शेतकऱ्यांनी मौल्यवान दागिने जवळ बाळगू नये त्याचबरोबर सतर्क राहण्याचे आवाहन हिंगोली पोलिसांनी केले आहे..

Jul 27, 2025 06:57 (IST)

Live Update: नांदूरमधमेश्वर धरणातून 15 हजार 775 क्युसेक पाण्याचा विसर्ग

Anchor :- तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा आणि कादवा नदीला पूर आला आहे.त्यामुळे नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून  पाच वक्राकार गेटमधून 15 हजार 775 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रातून जायकवाडीच्या दिशेने सुरू करण्यात आला आहे.यंदाच्या पावसाच्या हंगामात आतापर्यंत नांदूरमधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 34.33 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.